Showing posts with label marathi bashane. Show all posts
Showing posts with label marathi bashane. Show all posts

Thursday, December 29, 2022

प्रजासत्ताक दिन मराठी भाषण माझा भारत महान





छोटे भाषण

माझा भारत महान


मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे.माझा भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व ज्ञानात अग्रेसर होता.

      भारतात भौगोलिक विविधता आहे.भारताच्या तीन बाजूंनी सागर व उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्य,फळे, भाज्या, फुले यांच्यात ही विविधता आढळते.

       भारत हा जसा वीरांचा, शूरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे.भारतात विविध धर्मांचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात.या सर्व भाषातील साहित्य समृद्ध आहे.

         भारताने 150 वर्षे गुलामगिरीत साहिली.तेव्हा एकजूट करून भारतीयांनी लढा दिला व 1947 साली स्वातंत्र्य मिळवले. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षात भारताने विविध क्षेत्रात विकास साधला. या विशाल देशाला अनेक नैसर्गिक आपत्तींना व मानवनिर्मित संकटांना वेळोवेळी तोंड द्यावे लागले आहे. पण सर्व भारतीय संघटित होऊन मोठ्या जिद्दीने त्यावर मात करतात.

      मनुष्यबळ ही भारताची मोठी शक्ती आहे.त्यामुळे भारत विविध क्षेत्रात सतत प्रगती साधत आहे. आज अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वावलंबी आहे. औद्योगिक, वैज्ञानिक क्षेत्रात जगात अग्रेसर बनला आहे. माझा भारत खरोखर महान आहे.

जय हिंद! जय भारत!

Wednesday, December 28, 2022

सावित्रीबाई फुले मराठी भाषण SAVITRIBAI FULE MARATHI SPEECH





सावित्रीबाई फुले मराठी भाषण 



'जिंदगी एक काँटो का सफर है ।

हौसला उसकी पहचान है ।

रास्तोंपर सभी चलते है ,

पर जो रास्ते बनाए ,

वही इन्सान है ।'



                   भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या , भारतीय शिक्षणाची ज्ञानगंगोत्री , क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना सत्यशोधक मार्गात साथ देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन ! 

          तो अठराव्या शतकाचा काल होता.स्त्रियांचे जीवन ' चूल आणि मूल ' या पर्यंतच मर्यादित होते.स्त्रियांनी शिक्षण घेणे समजले जायचे.अशा या अठराव्या शतकात ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाईंचा जन्म झाला व एका नव्या अध्यायास सुरुवात झाली. म्हणूनच तर म्हणतात..

   ' बेटीयाँ सबके नसीब में कहाँ होती है ?

     ' रब को जो घर पसंद आये , 

      वहा बेटीयाँ होती है ।

    परंतु आजचा काल बदलला.पण लोकांची मानसिकता बदलली नाही.आजही आपल्याला म्हणावे लागते , 'बेटी बचावो , बेटी पढाओ ' 

  सावित्रीआई स्वतः शिकल्या आणि त्यांनी मुलीनांही शिकवले.आज बस कंडक्टर पासून तर राष्ट्रपतीपदापर्यंत स्त्रियांनी आपले वर्चस्व गाजवले आहे.पण आज स्त्रिया शिक्षित होऊ शकल्या ते फक्त सावित्रीबाई यांच्यामुळेच .

    शेवटी भारतातल्या सर्व स्त्रियांसाठी एवढेच म्हणेन ....

   ' बोये जाते है बेटे, 

पर उग जाती है बेटीयाँ।

स्कूल जाते है बेटे पर, 

आगे बढ जाती है बेटीयाँ

मेहनत करते है बेटे पर ,

अव्वल आती है बेटीयाँ 

जब रुलाते है खूब बेटे ,

तब हँसाती  है बेटीयाँ 

नाम करे ना करे बेटे ,

पर नाम कमाती है बेटीयाँ 

आशा रहती है बेटो से ,

पर पुरी कर जाती है बेटीयाँ 

एवढे बोलून मी माझे भाषण संपविते.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !

Tuesday, December 27, 2022

स्वामी विवेकानंद मराठी भाषण Swami Vivekanand Marathi Speech





 स्वामी विवेकानंद मराठी भाषण

 'माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो'असे उद्गार काढून विश्वबंधुतेचे नाते प्रस्थापित करणारे एक थोर भारतीय युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे विषयी आज विचार मांडतोय.

    स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 या दिवशी झाला. त्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखत असलो तरी त्यांचे मूळ नाव नरेंद्र असे होते. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वर देवी व वडिलांचे नाव विश्वनाथबाबू असे होते .कोलकाता शहरातील सिमोलीया भागात मकर संक्रांतीच्या पवित्र सणादिवशी त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील होते तर आई भुवनेश्वर देवी हुशार बुद्धिमान व धार्मिक वृत्तीच्या होत्या. अशा मातापित्यांनी नरेंद्र यांना सुसंस्काराचे धडे दिले. ते सर्व प्रकारच्या खेळात तल्लख होते.त्यांची स्मरणशक्ती अजब होती.त्यामुळे ते अभ्यासात हुशार होते.त्यांच्या मनात नेहमी सद्भावना वास करीत होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना थोर समाज सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या शाळेत घातले. लहानपणापासून नरेंद्र यांना उत्तम एकाग्रतेची देणगी लाभली होती. त्यामुळे ते कोणताही विषय आत्मसात करीत होते. शालेय अभ्यासात हुशार असल्याने ते मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी आपले नाव दाखल केले. त्यांना सर्वच विषयांमध्ये गोडी होती. ते वाचनालयात जाऊन विविध विषयांचे सखोल वाचन करत असत. त्यांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचे सर्व ग्रंथ वाचून काढले.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती अधिक चिकित्सक बनली.

   नोव्हेंबर 1880 मध्ये नरेंद्रची ओळख दक्षिणेश्वरात रामकृष्ण परमहंशांशी झाली. त्यांना नरेंद्र यांचे विषयी प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण झाली. ते नरेंद्र यांचे गुरु बनले. त्याचबरोबर परमहंस आणि योग मार्गाचा आपला वसा विवेकानंद यांच्याकडे सोपवला आणि कार्यास प्रारंभ करण्यास सांगितले.

      नरेंद्र यांनी हिंदू धर्म व तत्वज्ञान यांचा सखोल अभ्यास केला.1893 मध्ये त्यांना अमेरिकेतील शिकागो येथे भरणाऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेची माहिती कळाली. या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी नरेंद्र आगबोटीने अमेरिकेला रवाना झाले. सर्व प्रकारे तयारी दर्शवून त्यांनी या परिषदेला जाण्याचा आग्रह दर्शविला आणि या परिषदेत जाण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यांनी संन्यासाचा स्वीकार अंगीकारला व स्वामी विवेकानंद नाव धारण केले. 31 मे 1893 रोजी शिकागोस गेले. त्या ठिकाणी आलेले जगभरातील नानाधर्मीय लोक स्वामी विवेकानंदांना पाहून प्रभावित झाले आणि याच ठिकाणी त्यांनी 'माझ्या बंधू भगिनींनो' असे उद्गार काढून उपस्थित रसिक श्रोत्यांची मनी जिंकली. त्यांच्या हृदयाची पकड घट्ट केली. त्यांचा संदेश हा नवजीवनाचा संदेश होता.व्याख्याने देत आणि पाश्चात्यांना भारतीय तत्त्वज्ञानाची शिकवण देत ते अमेरिकेत बरेच महिने राहिले. त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये एका धर्माचा दुसऱ्या धर्माशी झगडा असू शकत नाही, सर्वांनी एकजुटीने लढायचे आहे, क्रांती घडवायची आहे, स्नेहबंध निर्माण करणारे उद्गार त्यांनी काढले तसेच त्यांनी या परिषदेमध्ये ओघवत्या भाषेत हिंदू धर्माची श्रेष्ठता सर्वांना पटवून दिली.

        त्यांच्या भाषणामुळे स्वामी विवेकानंद यांची ओळख सर्वांनाच झाली. कोणतीही व्यक्ती त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने बोलू शकत होती. एकदा अशीच एक अमेरिकन महिला त्यांच्याजवळ येऊन त्यांच्याबरोबर संभाषण करू लागली. बोलता-बोलता विवेकानंद यांना तिने उगीचच खोदून विचारले, " स्वामीजी तुमच्या अंगावरचे कपडे भारतीय असूनही पायातील बूट मात्र परदेशी बनावटीचा आहे हा फरक कसा हो? " स्वामीजींना प्रश्न कळाला होता.त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पिकले.त्यांनी उत्तर दिले, " मी एक संन्याशी.लोकांनी जे प्रेमाने दिले ते मी घेतले. त्यात माझे तुझे असा भेदभाव नाही.मी जोपर्यंत या देशात आहे, त्याचा मी तोपर्यंत आदर्श स्वीकार करेन मात्र येथून निघून जाताना ते येथेच ठेवून जाईन!" बाई अधिक थिजल्या. एवढ्या मोठ्या माणसाला अशा एका क्षुल्लक प्रश्नाच्या मुद्द्यावरून कात्रीत धरण्याचा आपला प्रश्न मूर्खपणाचा होता,याची जाणीव झाल्याने ती क्षणभर नाराज झाली.

      अमेरिकेतील कार्य असे चालू राहील, अशी व्यवस्था करून स्वामीजी इंग्लंडला आले.त्याही ठिकाणी व्याख्याने दिली. इंग्लंडमध्येही त्यांना अनेक सहकारी मिळाले. आपल्या परदेशातील वास्तव्यात स्वामी विवेकानंदांनी आपल्या धर्म,संस्कृतीची पताका पाश्चिमात्य देशात फडकावून हिंदू धर्माचे उज्वल दर्शन घडविले.1896 च्या अखेर स्वामी विवेकानंद भारतात परतले. परदेशातील समृद्धी व सुबत्ता पाहून भारतातील गरिबी व हालाखी अधिक जाणवली.  1897 रोजी त्यांनी रामकृष्ण परिवाराची बैठक बोलावून समाजाच्या उद्धारासाठी एक सेवासेना उभारण्याचे स्वप्न त्यांनी मनी बाळगले होते. हा विचार बैठकीमध्ये मांडला आणि तो सर्वांना मान्य झाला आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. प्रत्येक धर्माच्या अनुयायांमध्ये बंधुभाव उत्पन्न व्हावा यासाठी रामकृष्ण परमहंसानी केलेल्या कार्याची धुरा या मिशनने खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेतली.राष्ट्राची उभारणी करण्याचे कार्य या मिशनने हाती घेतले.

      राष्ट्र उभारणीचे दिव्य स्वप्न उराशी धरून कार्य करीत असताना स्वामी विवेकानंदांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्यांना दम्यासारख्या विकाराने पछाडले.अशा परिस्थितीत ही त्यांचे राष्ट्र उभारणीचे व समाज प्रबोधनाच्या विचारांचा प्रसार व प्रचार अखंडपणे चालूच होता. अशा परिस्थितीतच ते पुन्हा 1899 साली परदेशाच्या प्रवासाला निघाले आणि न्यूयॉर्कमध्ये जाऊन त्यांनी वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्याचबरोबर कॅलिफोर्नियात शांती आश्रमाची स्थापना केली.पॅरिसमधील भरलेल्या धर्म उत्क्रांती परिषदेस ही उपस्थित राहिले आणि ते पुन्हा भारतात परतले आणि याच प्रवासात त्यांना दम्याच्या विकाराबरोबर मधुमेहाचा विकार जडला. मात्र त्यांचे राष्ट्र उभारणीचे कार्य युद्धपातळीवर सुरूच होते. 4 जुलै 1902 रोजी त्यांनी लवकर उठून तीन तास ध्यान केले.काही तास आश्रमवासीयांशी विविध विषयांवर चर्चा केली.नंतर शांतपणे योग मार्गाने त्यांनी देह विसर्जन केले.अवघे 39 वर्षे आयुष्य स्वामी विवेकानंदांना लाभले. मात्र अल्पावधीत त्यांनी केलेले कार्य वाखाण्याजोगे आहे.म्हणून मी राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतो. धन्यवाद!







26 जानेवारी प्रजासत्ताक दिन

                                                    



प्रजासत्ताक दिन मराठी भाषण 

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन भाषण 

                     15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांचा युनियन जॅक दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून उतरला. भारताचा तिरंगा अगदी डौलानं, अभिमानाने फडकायला लागला .त्याच वेळी या देशातल्या बुद्धिजीवी, विद्वान लोकांनी एकत्र येऊन एका घटनेची निर्मिती केली. 26 जानेवारी 1950 रोजी या देशाला घटना अर्पण केली. या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद व अशा असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन ही घटना देशाला समर्पित केली.

     स्वातंत्र्य, समता, न्यायव्यवस्था ,समाजव्यवस्था या मूलभूत विचारांवर ती घटना देशाला अर्पण केलेली आहे. यामुळे हे राज्य प्रजासत्ताक म्हणून पाहिले जाते. 'प्रजेचे राज्य ,रयतेचे राज्य' अशी संकल्पना आपणास पहावयास मिळते.  देशातील सर्व व्यक्तींना कोठेही राहण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, त्याच पद्धतीने मूलभूत हक्कांचा, कर्तव्याचा, कार्याचा अधिकार प्रत्येक भारतीयास अर्पण करण्यात आला.

                    घटना अर्पण करत असताना या देशांमध्ये सर्व व्यक्तींना समान अधिकार प्राप्त झालेले आहेत .हा देश लोकशाहीचा स्वीकार करून लोकांचा विकास करणारा देश आहे. हेच प्रजासत्ताक राष्ट्रांवरून आपणास पहावयास मिळते. आपण सर्वांनी या गोष्टीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. समतेचे ,स्वातंत्र्याचे, समानतेचे विचार आत्मसात करून लोकांना ते स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. 

           'प्रजासत्ताक दिन' हा प्रजेच्या हक्काचे ,कार्याचे, मूलभूत अधिकारांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण या दिनाच्या निमित्ताने सर्वांनी प्रजेच्या कल्याणकारी गोष्टींची जाणीव करून त्याच दिशेने घटनेचा सन्मान करून वाटचाल करणे गरजेचे आहे.

      आपण भारतीय या नात्याने प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण झाल्यानंतर त्या घटनेचा सन्मान करून, आदरपूर्वक स्वीकार गरजेचे आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीरांच्या कार्यांचा आदर्श घेऊन घटनेचा सन्मान करून प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्यासाठी 26 जानेवारी या दिनाच्या निमित्ताने प्रजेच्या कल्याणासाठी ,प्रजेच्या रक्षणासाठी ,देशाच्या विकासासाठी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी प्रयत्न करूयात ! 

 धन्यवाद!

Thursday, October 6, 2022

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार A.P.J.ABDUL KALAM INSPIRATIONAL QUOTES

 

      


डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार 

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्याला स्वप्नं बघायला आणि पूर्ण करायला शिकवले.या व्हिडीओमध्ये आपण आपल्या मिसाईल मॅनचे 40 प्रेरणादायी विचार पाहूया. 

 स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता .

स्वप्नं तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत.


वाट बघणाऱ्यांना तेवढंच मिळते , जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.

ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झालात.

स्वप्नं खरं होण्याआधी तुम्हाला स्वप्नं बघावी लागतील.

 

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल.

तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही ;परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता.आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे भविष्य बदलेल.

सवयी बदला आणि भविष्य बदलेल.




प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडतं.

काय माहित लोक राग करण्यासाठी वेळ कोठून काढतात?

जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा उमटवायच्या असतील तर एकच उपाय आहे; कधीच पाऊल मागे घेऊ नका.

           

प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने  केलेले प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही.



आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.


आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.


एखाद्याला हसणे खूप सोपे आहे .

परंतु  एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.


काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या  रंगाचा फळाच विध्यार्थ्यांचे आयुष्य,

त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवतो .


यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका . त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल .अपयशी लोकांचे चरित्र वाचा - त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ;तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील;मालक नाही .

 

आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या 

 तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात ,त्या  तर तुम्हाला तुमच्या मधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात.म्हणून कठीण परिस्थितीला देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात.


मी Handsome व्यक्ती नाही आहे.पण मी माझे Hand गरजूंना मदत म्हणून देऊ शकतो.सुंदरता ही मनात असते तोंडावर नाही .


कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते .कारण आज मी मागे वळून बघतो 

तर माझे मार्क्स मला हसवत नाहीत .मित्रांसोबतच्या घालवलेल्या आठवणी मला हसवतात.


दोन परिस्थितीमध्ये नेहमी शांत राहा .

एक - जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या शब्दावरून तुमच्या भावना समजू शकणार नाहीत .

दोन - जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला तुम्ही शब्दही न बोलता समजून घेईल .


जुने मित्र सोन्यासारखे असतात .नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात.जेव्हा तुम्हाला हिऱ्यासारखे मित्र भेटतील ,तेव्हा सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका.कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून 

ठेऊ शकते.


प्रेम आंधळे असते ,हे खरे आहे. कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरु केले होते.


पहिल्या विजयानंतर थांबू नका.कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरलात तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळाले होते, हे म्हणण्यासाठी अनेकजण तयार असतात.


महान स्वप्नं पाहणाऱ्यांची महान स्वप्ने नेहमीच पूर्ण होतात.       


माणसाला समस्या ,अपयशाची आवश्यकता असते.कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते.


छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे.तुमचं ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे.


तोपर्यंत लढणे थांबवू नका,जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही.


जीवनात एकच ध्येय ठेवा.सतत ज्ञानप्राप्त करत राहा,कठोर मेहनत करा. महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत राहा.


जर आपण स्वतंत्र नसणार तर कोणीच आपला आदर करणार नाही .


आकाशाकडे बघा.आपण एकटे नाही आहोत.संपूर्ण ब्रम्हांड आपल्यासाठी अनुकूल आहे.


जे स्वप्नं  बघतात ,मेहनत करतात.त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी ब्रम्हांड नेहमी तयार असते.


तरुणांना माझा संदेश आहे की , वेगळ्या पद्धतीने विचार करा.काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा.स्वतःचा रस्ता स्वतः बनवा,आणि जे अशक्य आहे ते मिळवा.


तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला पाहिजे.


मला पूर्ण विश्वास आहे.ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल ,तो यशासाठी आवश्यक तेवढी महात्वाकांक्षा ठेऊ शकत नाही.


सर्वांकडे एकसमान Talent नसतो.परंतु Talent निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात.


सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका,कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते.


सक्रीय व्हा , जबाबदारी घ्या!त्या गोष्टीवर काम करा,ज्यावर तुमचा विश्वास आहे.जर तुम्ही हे करत नसाल ,तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात .


अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे.


देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो.


यशाचे रहस्य काय ? योग्य निर्णय घेणे .

योग्य निर्णय कसे घ्यावे ? अनुभवाने

आणि अनुभव कसे घ्यावे ? चुकीचे निर्णय घेऊन .


इंग्रजी शब्द ‘END’ चा अर्थ ‘शेवट’ असा नसून ..

Effort Never Dies” म्हणजेच

‘प्रयत्न कधीच वाया जात नाहीत’ असा होतो .


Fail चा अर्थ अपयश असा होत नाही.तर

First Attempt in  Learning’

‘शिकण्यासाठी पहिला प्रयत्न’ असा होतो.