Showing posts with label Abdul Kalam. Show all posts
Showing posts with label Abdul Kalam. Show all posts

Sunday, October 9, 2022

वाचन प्रेरणा दिन Importance of Reading

 









वाचन प्रेरणा दिवस मानवी जीवनात वाचनाचे महत्व

ग्रंथ आमुचे साथी ,

ग्रंथ आमुच्या हाती ,

ग्रंथ उजळती

अज्ञानाच्या ...अंधाराच्या राती  l

या ग्रंथांच्या तेजामधुनी

 जन्मा येते क्रांती ,

ग्रंथ शिकविती माणुसकी

अन  ग्रंथ शिकविती शांती 

निराश जीवा धीर धरुनी

 पुढे घेऊनी जाती  .

ग्रंथ आमुचे साथी ,ग्रंथ आमुच्या हाती ,

ग्रंथ उजळती

अज्ञानाच्या ...अंधाराच्या राती .

                   वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे .वाचन संस्कार आणि संस्कृतीसंवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे .वाचन हा मने घडविणारा सुसंस्कार आहे .निर्मळ आनंद देणारा आनंदयोग आहे .वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे    .

                  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून ते आजोबांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शन ,मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात .तास न तास टी .व्ही .समोर बसणारी माणसं , स्वतःसाठी दररोज चार ओळी वाचायलाही तयार नाहीत .परिणामी संस्कृती अधःपतनास सुरुवात झाली . आणि मग पुन्हा सांगण्याची वेळ आली, “वाचाल तर वाचाल!


                                  मित्रहो वाचन हा फक्त विरंगुळा नाही तर अर्थपूर्ण विरंगुळा आहे . कारण मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जनाचा प्रमुख हेतू वाचनामागे असतो . आपण खरं तर वेळ जात नाही म्हणून वाचन करण्यापेक्षा वाचनासाठी वेळ काढला पाहिजे .वाचन लहानपणी ज्ञान देण्याचं काम करतं .तारुण्यात शील रक्षणासाठी विवेक आणि सद्भावना निर्माण करण्याचं काम करतं आणि वार्धक्याच्या काळात दुखः हरण करून आनंद देण्याचं काम करतं .

                  बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत म्हणजेच संपूर्ण जीवनात मानवाला साथ देण्याचे आणि संकटातून वाचवण्याचे काम वाचन करते .ज्येष्ठ साहित्यिक वि .स .खांडेकर म्हणतात ,वाचनाने माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांमध्ये अधिकच सुगंध भरला आणि दुःखाच्या वेळी संकटाशी लढण्याचे सामर्थ्य वाचनानेच दिले .वाचानासाठी आपल्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध आहे .कथा , कादंबरी ,ललितगद्य ,काव्य ,महाकाव्य ,ग्रंथ इ .

वाङ्मयचा डोंगरच आपणासमोर उभा आहे .कमी आहे ती फक्त वाचणाऱ्यांचीच आणि म्हणूनच वाचन संस्कृती मरते आहे .असे म्हणण्याची वेळ आली आहे .अगदी विद्यार्थीदेखील पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके वाचण्यास तयार नाहीत .

अभ्यासाला वेळ नाही ,

शॉर्टकटचा काळ आहे  l

पुस्तके बाजारात मिळत नाहीत ,

गाईड्सचा सुकाळ आहे 

प्रार्थना ,पसायदान पाठ नाही ,

आणि सिनेमाची गाणी

मात्र सारी तोंडपाठ आहेत l 

                           एक प्रख्यात तत्वज्ञ अनंत देसाई वृद्धापकाळात पुस्तक उचलत नाही म्हणून पुस्तकाची पाने फाडून ती हातात धरून वाचत असत .तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वयाच्या ९० व्या वर्षीही वाचन केल्याशिवाय झोपत नसत .अशा प्रकारे वाचनाच्या तपश्चर्येमुळे ही माणसं विद्वान आणि अजरामर झाली . 

                                  आज जे साक्षर आहेत ,ज्यांना चांगले वाचता येते असे लोक वाचनाकडे दुर्लक्ष करत आहेत .आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या मनात निरक्षर असल्याची उणीव भासत आहे .म्हणूनच वाचन संस्कृती जपायची असेल तर ,वाचकांचा वर्ग वाढला पाहिजे .तसेच संपूर्ण साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक साधनावर प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे .याचा उपयोग वाचकांनी केला पाहिजे . आज प्रत्येक घरात देवघर आहे तसेच ग्रंथघर ही असायलाच पाहिजे .प्रत्येक गावात मोबाईल टॉवर नसला तरी चालेल पण प्रत्येक गावात एक ग्रंथालय आणि प्रत्येक हातात मोबाईल ऐवजी एक पुस्तक असलेच पाहिजे .कारण मोबाईल आणि टॉवरमुळे अप्रत्यक्ष संपर्क साधता येईल .पण संस्कृती विसरून दूर गेलेल्या मनांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथालय ,त्यातील पुस्तके आणि त्यामार्फत होणाऱ्या संस्कारामार्फतच शक्य होईल .

शेवटी एवढेच म्हणेन ,

A room without books is a body without soul.

जय हिन्द ! 

Related Posts  - 

वाचन प्रेरणा दिवस मराठी भाषण 




तरुणाईचे प्रेरणास्थान ए.पी.जे.अब्दुल कलाम A.P.J.Abdul Kalam Speech





तरुणाईचे प्रेरणास्थान ए.पी.जे.अब्दुल कलाम  A.P.J.Abdul Kalam Speech 

                                                          'माझ्या स्वप्नातील भारत' या पुस्तकाचे लिखाण करून २०२० साली 'माझ्या कल्पनेतील भारत कसा असेल ? अशी संकल्पना सर्वसामान्य जनतेसमोर मांडणारे , 'या देशातील तरुणाईच्या उर्जेतून देशाचा विकास होऊ शकतो'ही संकल्पना ज्या महान व्यक्तीने आपल्यासमोर मांडली ,त्या व्यक्तीचे नाव आहे 'ए.पी.जे.अब्दुल कलाम'.

         कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमध्ये झाला.त्यांचे पूर्ण नाव 'अबुल पाकिर जैनुल्लब्दिन अब्दुल कलाम असे होय.रामेश्वरजवळ एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला.वडिलांचा होडीचा व्यवसाय.आपला मुलगा शिकून मोठा व्हावा , ही प्रबळ इच्छा त्यांच्या वडिलांची होती.लहानपणापासून कलाम अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होते.गणित आणि विज्ञानाची त्यांना प्रचंड आवड होती.याच दोन विषयांच्या प्रेमाने त्यांना त्यांचे नाव जागतिक किर्तीपर्यंत पोहचवता आले.

                               प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मद्रास इन्स्टिट्यूट  सेन्ट  जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली  येथे झाले. 1958  ते 1961 या कालखंडामध्ये राष्ट्रीय संरक्षण संस्था या ठिकाणी काम केले. शालेय जीवनामध्ये वर्तमानपत्रे विकली.आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'कमवा आणि शिका' या मार्गाचा स्वीकार केला. विक्रम साराभाई यांचे ते शिष्य होते.अमेरिकेमध्ये नासा या संशोधन संस्थेमध्ये 4 महिने प्रशिक्षण घेतले.

            आपल्या देशाचा विकास करायचा असेल आणि शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने सक्षम बनायचे असेल तर त्यासाठी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली पाहिजेत ,ही भूमिका कलाम सरांची होती.त्याच दृष्टीने त्यांनी संशोधनास सुरुवात केली.त्यांच्या प्रयत्नांना यश  आले.स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार केले.

              कलाम सरांचे विज्ञान क्षेत्रातले ज्ञान पाहून ,संशोधनातील दृष्टी पाहून त्यांच्यामध्ये असणारा उत्तम संशोधक ,प्रखर राष्ट्रभक्ती असणारा माणूस पाहून त्यांच्या कर्तृत्वाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने 1994 साली त्यांना भारताचा सर्वोच्च 'भारतरत्न'  हा पुरस्कार प्रदान केला.

   आयुष्यामध्ये शाकाहारी आणि अविवाहित असणऱ्या या महामानवाने देशातील सर्व तरुणांसमोर एक आदर्श विचार मांडण्याचे कार्य केले.देशभरातून कार्यक्रम ,व्याख्यानाच्या माध्यमातून फिरत असताना ,उपदेश करताना सर नेहमी सांगत ," देशाची पिढी युवा शक्तीच्या कर्तृत्वातून घडत असते.तुमचे हात देशाच्या विकासासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या कमी लावा.प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करावी .

   अशी माणसे जेव्हा देशाच्या मातीत निर्माण होतात, तेव्हाच पाय जमिनीवरती ठेऊन आकाशाला गवसणी घालणाऱ्या पिढ्या निर्माण होत असतात,तेव्हाच देशाचा विकास होत असतो.

       आपल्याला देशाचा विकास करायचा असेल व देशाला महासत्ता बनवायचे असेल तर आपण कृतीशील विचारांची जोड दिली पाहिजे.हेच विचार कलाम सरांनी माणसांच्या मनावरती बिंबवण्याचे काम केले.कलाम सरांचे हे काम पाहून देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून 2002 ते 2007 या कालखंडात त्यांची निवड झाली.

               देशातल्या लोकांना स्वप्ने दाखवणारा ,स्वप्नपूर्तीसाठी विचार रुजवणारा एक ध्येयवादी व्यक्ती म्हणून कलामसरांचा  उल्लेख केला जातो.देशाच्या विकासासाठी  शेतीबरोबर तंत्रज्ञान ,मातीबरोबर माणुसकी ,शिक्षणाबरोबर सहकाराच्या प्रगतीला गवसणी घालणारी पिढी जेव्हा निर्माण होईल तेव्हाच भारत महासत्ता बनेल .

  सामान्य कुटुंबातील तरुण ,संशोधक ,शास्त्रज्ञ ते देशाचे राष्ट्रपती.पिढी घडवणारा ,घडविण्याचे संस्कार देणारे किमयागार म्हणजेच ए.पी.जे.अब्दुल कलाम होय !



संबंधित पोस्ट्स -

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार .

अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य .

वाचन प्रेरणा दिन भाषण .

'वाचाल तर वाचाल' निबंध .


Thursday, October 6, 2022

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार A.P.J.ABDUL KALAM INSPIRATIONAL QUOTES

 

      


डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार 

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्याला स्वप्नं बघायला आणि पूर्ण करायला शिकवले.या व्हिडीओमध्ये आपण आपल्या मिसाईल मॅनचे 40 प्रेरणादायी विचार पाहूया. 

 स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता .

स्वप्नं तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत.


वाट बघणाऱ्यांना तेवढंच मिळते , जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.

ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झालात.

स्वप्नं खरं होण्याआधी तुम्हाला स्वप्नं बघावी लागतील.

 

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल.

तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही ;परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता.आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे भविष्य बदलेल.

सवयी बदला आणि भविष्य बदलेल.




प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडतं.

काय माहित लोक राग करण्यासाठी वेळ कोठून काढतात?

जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा उमटवायच्या असतील तर एकच उपाय आहे; कधीच पाऊल मागे घेऊ नका.

           

प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने  केलेले प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही.



आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.


आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.


एखाद्याला हसणे खूप सोपे आहे .

परंतु  एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.


काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या  रंगाचा फळाच विध्यार्थ्यांचे आयुष्य,

त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवतो .


यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका . त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल .अपयशी लोकांचे चरित्र वाचा - त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ;तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील;मालक नाही .

 

आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या 

 तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात ,त्या  तर तुम्हाला तुमच्या मधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात.म्हणून कठीण परिस्थितीला देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात.


मी Handsome व्यक्ती नाही आहे.पण मी माझे Hand गरजूंना मदत म्हणून देऊ शकतो.सुंदरता ही मनात असते तोंडावर नाही .


कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते .कारण आज मी मागे वळून बघतो 

तर माझे मार्क्स मला हसवत नाहीत .मित्रांसोबतच्या घालवलेल्या आठवणी मला हसवतात.


दोन परिस्थितीमध्ये नेहमी शांत राहा .

एक - जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या शब्दावरून तुमच्या भावना समजू शकणार नाहीत .

दोन - जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला तुम्ही शब्दही न बोलता समजून घेईल .


जुने मित्र सोन्यासारखे असतात .नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात.जेव्हा तुम्हाला हिऱ्यासारखे मित्र भेटतील ,तेव्हा सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका.कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून 

ठेऊ शकते.


प्रेम आंधळे असते ,हे खरे आहे. कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरु केले होते.


पहिल्या विजयानंतर थांबू नका.कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरलात तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळाले होते, हे म्हणण्यासाठी अनेकजण तयार असतात.


महान स्वप्नं पाहणाऱ्यांची महान स्वप्ने नेहमीच पूर्ण होतात.       


माणसाला समस्या ,अपयशाची आवश्यकता असते.कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते.


छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे.तुमचं ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे.


तोपर्यंत लढणे थांबवू नका,जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही.


जीवनात एकच ध्येय ठेवा.सतत ज्ञानप्राप्त करत राहा,कठोर मेहनत करा. महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत राहा.


जर आपण स्वतंत्र नसणार तर कोणीच आपला आदर करणार नाही .


आकाशाकडे बघा.आपण एकटे नाही आहोत.संपूर्ण ब्रम्हांड आपल्यासाठी अनुकूल आहे.


जे स्वप्नं  बघतात ,मेहनत करतात.त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी ब्रम्हांड नेहमी तयार असते.


तरुणांना माझा संदेश आहे की , वेगळ्या पद्धतीने विचार करा.काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा.स्वतःचा रस्ता स्वतः बनवा,आणि जे अशक्य आहे ते मिळवा.


तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला पाहिजे.


मला पूर्ण विश्वास आहे.ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल ,तो यशासाठी आवश्यक तेवढी महात्वाकांक्षा ठेऊ शकत नाही.


सर्वांकडे एकसमान Talent नसतो.परंतु Talent निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात.


सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका,कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते.


सक्रीय व्हा , जबाबदारी घ्या!त्या गोष्टीवर काम करा,ज्यावर तुमचा विश्वास आहे.जर तुम्ही हे करत नसाल ,तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात .


अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे.


देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो.


यशाचे रहस्य काय ? योग्य निर्णय घेणे .

योग्य निर्णय कसे घ्यावे ? अनुभवाने

आणि अनुभव कसे घ्यावे ? चुकीचे निर्णय घेऊन .


इंग्रजी शब्द ‘END’ चा अर्थ ‘शेवट’ असा नसून ..

Effort Never Dies” म्हणजेच

‘प्रयत्न कधीच वाया जात नाहीत’ असा होतो .


Fail चा अर्थ अपयश असा होत नाही.तर

First Attempt in  Learning’

‘शिकण्यासाठी पहिला प्रयत्न’ असा होतो.


 


Friday, November 5, 2021

डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम जीवनपरिचय

 






भारताचे माजी राष्ट्रपती व  मिसाईल मॅन

डॉ.ए.पी.जे.

अब्दुल कलाम

                                           आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने वर्तमानाबरोबरच पुढील पिढ्यांसाठीही प्रकाशवाटा निर्माण करणारी काही  माणसे भारतभूमीवर जन्माला आली .अचल ध्येयवाद आणि दीर्घ कर्मवादाने भारावलेले असामान्य माणसांचे जीवन आपल्यासाठी आदर्शवत असते. साऱ्या भारत देशातील विद्यार्थी व युवकांसाठी आदर्शाचा दीपस्तंभ ठरावा अशी अतुलनीय व्यक्ती म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम होय .

                                    डॉ.अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे एका गरीब मुस्लीम कुटुंबात झाला . त्यांचे पूर्ण नाव डॉ .अबुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम असे होते .वडिलांचा साध्या बोटी बनवण्याचा व्यवसाय होता व भावाचे पानाचे दुकान होते .त्यामुळे परिस्थिती बेताचीच होती.आपला मुलगा शिकून मोठा व्हावा ही प्रबळ इच्छा त्यांच्या वडिलांची होती .

                                                         लहानपणापासून कलाम अभ्यासात प्रचंड हुशार होते .गणित आणि विज्ञानाची त्यांना प्रचंड आवड होती . कलामांनी जिद्दीने परिस्थितीवर मात करत आपले शिक्षण चालू ठेवले .प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मद्रास इंस्टीट्यूट सेन्ट जोसेफ कॉलेज तीरुचीरापल्ली या ठिकाणी झाले .त्यांनी १९५८ ते १९६३ या कालखंडामध्ये राष्ट्रीय संरक्षण संस्था या ठिकाणी काम केले . शालेय जीवनामध्ये कलामांनी वर्तमानपत्रे विकली .आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी कमवा आणि शिका या मार्गांचा स्वीकार केला .

                                       संरक्षण संशोधन क्षेत्रातून १९५८ साली डीआरडीओया संस्थेतून कलामांनी आपल्या कार्याची सुरुवात केली .त्यानंतर इस्रोसंस्थेतून अंतराळ संशोधन कार्य सुरु केले .१९८२ मध्ये पुन्हा ‘डीआरडीओ मध्ये दाखल होऊन क्षेपणास्त्र विकासाचा नियोजीत कार्यक्रम तयार केला . त्यांच्या या अथक परिश्रमातून पृथ्वी ,नाग ,आकाश ,त्रिशूल ,  अग्नी इ . प्रक्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात भारताला यश आले .

                                    अमेरिकेने तंत्रज्ञान देणे नाकारल्यावर कलामांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्वदेशी प्रक्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी अविरत प्रयत्न केले .संरक्षण साधनांच्या बाबतीत भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी हा संशोधक अविरतपणे झटला . स्वदेशातच शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाच्या उपयोगाने देशाला स्वावलंबी बनवणारा हा संशोधक यात्री परदेशातच शिक्षण घेऊन तेथेच स्थायिक होणाऱ्या आजच्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आदर्शाचा दीपस्तंभच आहे .प्रचंड एकाग्रता ,विनयशीलता ,स्वदेशप्रेम ,साधेपणा ,शांत व नम्र स्वभाव ,कामातील सातत्य ,अचल ध्येयनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विशेष सांगता येतील .

                                     संशोधन काळात दिल्लीमध्ये राहायला मोठे निवास मिळत असताना देखील कलामांनी सरकारी गेस्ट हाउसमध्ये राहणेच पसंत केले .हाच शास्त्रज्ञ भारताच्या संरक्षण खात्याचा सल्लागार व त्यानंतर भारताचा राष्ट्रपतीसुद्धा झाला .त्यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या काळात आपला देश २०२० सालापर्यंत महासत्ता होईल असा आशावाद प्रत्येक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये निर्माण केला .अनेक नामांकित विद्यापीठांकडून सन्मानाच्या पदव्या अवार्ड्स कलामांना देण्यात आले आहेत .

व्हिडिओ  पाहण्यासाठी   येथे क्लिक करा.

                                              तसेच भारत सरकारकडून पद्मविभूषणभारतरत्न हा  सर्वोच्च सन्मानही त्यांना बहाल करण्यात आला .परंतु या साऱ्या यशाचे श्रेय डॉ .कलाम स्वतःकडे न घेता संशोधनात मदत करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना देऊन टाकतात .त्यांच्या या मनाच्या मोठेपणातून एकीतून प्रगतीकडे जाण्याचा आणि संघटनात्मक मार्गाने राष्ट्रविकास साधण्याचा आदर्श साऱ्या भारतवासियांपुढे उभा राहतो .

                                                राष्ट्रपती पदाचा कालखंड पूर्ण झाल्यावर केवळ दोन सुटकेस हातात घेऊन राष्ट्रपती भवन सोडणारा हा राष्ट्रपती साऱ्या देशवासियांना जणू आदर्श निष्काम कर्मयोगीच भासला होता.युवकांनी मोठी स्वप्ने पहावीत .त्याप्रमाणे विचार करावा व विचारांना कृतीत आणावे .आपली राष्ट्रीय दृष्टी हेच आपले जीवनकार्य आहे असे समजून कार्य करावे ,हा डॉ .कलामांचा संदेश भारतीय तरुणांनी शिरोधार्थ मानून आपले आचरण करावे व २०२० साली भारताला महासत्ता बनविण्याचे सत्यात आणावे   .

डॉ .अब्दुल कलामांचे विचार

                      युवकांना मार्गदर्शन करताना ते सांगत ...

देशाची प्रगती युवा शक्तीच्या कर्तृत्वाने घडत असते .तुमचे हात देशाच्या विकासासाठी व विकसित राष्ट्र बनविण्यासाठी झटले पाहिजेत .प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करावी .

अशी माणसे जेव्हा देशाच्या मातीत निर्माण होतात ,तेव्हाच पाय जमिनीवर ठेवून आकाशाला गवसणी घालणाऱ्या पिढ्या निर्माण होत असतात .तेव्हाच देशाचा विकास होत असतो .

अशा या महान कर्मयोगी शास्त्रज्ञाचा मृत्यू २७ जुलै २०१५ रोजी झाला

डॉ .अब्दुल कलामांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व भारतीयांनी प्रयत्न करावा , एवढीच सार्थ अपेक्षा व्यक्त करतो .

जय हिन्द !