Friday, August 22, 2025

आज्ञा , सल्ला , इशारा देताना कसे बोलावे ?

English Speaking Practice

Let's learn English! 

आज्ञा, सल्ला, इशारा देताना कसे बोलावे?

सोपी इंग्रजी वाक्ये.

Be here at 10 o’clock.

इथे दहा वाजता हजर राहा.

Be polite to all.

सर्वांशी नम्रपणे वाग.

Be courageous.

धैर्यवान हो.

Be quite.

शांत व्हा !

Be active !

कृतिशील  बन.

Be patient !

शांत राहा! धीर धर!

Be careful.

काळजी घे!

Don’t be negligent.

निष्काळजीपणा करू नकोस .

Do your own work.

स्वतःचे काम कर.

Concentrate on your work.

स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित कर.

 

Do your best!

प्रयत्नांची शिकस्त कर.

Help the needy.

गरजूंना मदत करा.

Do your homework every day.

रोज आपला गृहपाठ कर.

Remember , health is wealth.

लक्षात ठेव , आरोग्य हीच संपत्ती आहे.

Summon the doctor when necessary .

जरूर असेल तेव्हा डॉक्टरना बोलव.

Attent your office everyday .

दररोज तुझ्या कार्यालयात जात जा.

Don’t waste time as time is money.

वेळ फुकट घालवू नकोस करण वेळ म्हणजे पैसा.

Take exercise daily .

दररोज व्यायाम कर.

Have regular habits.

नियमित सवयी ठेव.

Don’t live to eat.

खाण्यासाठी जगू नकोस.

Eat to live.

जगण्यासाठी खा.

Have courage!

धैर्य असू दे!

Don’t lose your temper.

संतापू नकोस.

Don’t park your car here.

तुझी गाडी येथे उभी करू नकोस.

Meet me tomorrow.

मला उद्या भेट.

Do meet me tomorrow.

मला उद्या जरूर भेट.

Don’t fail to meet me tomorrow.

मला उद्या भेटल्याशिवाय राहू नकोस.

Assist those who need assistance.

मदतीची गरज असलेल्यांना मदत कर.

Finish this job soon.

हे काम लवकर पूर्ण कर.

Remind me of my interview.

मला माझ्या मुलाखतीची आठवण कर.

Wake them up at 6 o’clock.

त्यांना 6 वाजता उठवा.

Don’t forget to come.

यायला विसरू नकोस.

Write that letter.

ते पत्र लिही.

Don’t be angry.

रागावू नकोस.

Obey your elders.

मोठ्यांच्या आज्ञा पाळा.

Love your countrymen.

आपल्या देशबांधवांवर प्रेम करा.

Let the servent clean the room.

नोकराला खोली स्वच्छ करू दे.

Let him play cricket.

त्याला क्रिकेट खेळू दे.

Don’t kill harmless animals.

निरुपद्रवी प्राण्यांना मारू नका.

Go away!

चालता हो!

Don’t turn aside from your chosen path.

तू निवडलेल्या मार्गावरून ढळू नकोस.

Don’t get angry!

संतापू नकोस!

Don’t bother to meet him.

त्याला भेटण्याची खटपट करू नकोस.

Don’t start borrowing money.

पैसे मागायला सुरुवात करू नकोस.

Don’t give yourself airs!

उगाच आव आणू नकोस!

 

Keep your surroundings clean.

आपला परिसर स्वच्छ ठेवा.

Don’t disturb me.

मला त्रास देऊ नकोस.

Don’t worry about the child.

त्या मुलाची काळजी करू नकोस.

Discuss this point with him.

त्याच्याशी या मुद्द्यावर चर्चा कर.

Don’t accept that invitation.

ते आमंत्रण स्वीकारू नकोस.

Don’t be silly!

मूर्खपणा करू नकोस!

Send for the doctor.

डॉक्टरना बोलावणे पाठव.

Read the relevant paragraph.

संबंधित परिच्छेद वाच.

Never deceive your friend.

स्वतःच्या मित्राला कधीही फसवू नकोस.

Beware of pickpockets!

खिसेकापुंपासून सावध राहा!

Sign these papers.

या कागदावर सही करा.

Rectify this mistake at once.

ही चूक ताबडतोब दुरुस्त कर.

Handle that box carefully.

ही पेटी काळजीपूर्वक हाताळा.

Be seated , Madam.

बसा , बाईसाहेब .

Please consider my application sympathetically.

कृपया माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करा.

Be ready to start.

निघण्याची तयारी ठेव.

Make sure you are free tomorrow.

उद्या मोकळा आहेस याची खात्री करून घे.

Settle that matter without delay.

ती बाब लगेच निकालात काढ.

Show him round the exhibition.

त्याला प्रदर्शनातून हिंडवून आण.

Pay the bill.

बिल दे.

Don’t shout!

ओरडू नकोस !

Hold on!

थांब.

Feel free to say anything you like.

मनात असेल ते मोकळेपणाने बोल.

Don’t be afraid!

भिऊ नकोस !

Keep it the large safe.       

ते मोठ्या तिजोरीत ठेव.

Give up laziness.

आळशीपणा सोड.

Be proud of your family.

आपल्या कुटुंबाचा अभिमान बाळगा.

Practice what you preach.

तुम्ही जो उपदेश करता तो कृतीत आणा .

Look to your right.

तुमच्या उजवीकडे पाहा.

Look to your left.

तुमच्या डावीकडे पाहा.

Look at the blackboard.

फळ्याकडे पाहा.

Give him this message.

त्याला हा निरोप द्या.

Don’t be nervous.

नाराज होऊ नकोस.

Try again and again.

पुनःपुन्हा प्रयत्न कर.

Unlock the door.

दाराचे कुलूप काढा.

Follow my advice.

माझ्या सल्ल्याप्रमाणे वाग.

Don’t listen to him.

त्याचं ऐकू नकोस.

Stand erect!

सरळ उभा राहा.

Earn while you learn.

शिकत असतानाच कमाई करा.

Stop your prattle.

तुझी वटवट बंद कर.

Don’t involve me in that affair.

मला त्या भानगडीत गुंतवू नकोस.

Operate this machine.

हे यंत्र चालव.

Present your papers today.

तुझी कागदपत्रं आज सादर कर.

Look before you leap.

उडी मारण्यापूर्वी नीट पाहा.

Don’t make a scene here.

इथे तमाशा करू नकोस.

Please make some tea for me.

माझ्यासाठी थोडा चहा कर.

Learn some poems by heart.

काही कविता पाठ कर.

Plant trees.

झाडे लावा.

Pay the fine at once.

ताबडतोब दंड भर.

Don’t make so much noise.

इतका गोंगाट करू नकोस.

Call the first witness.

पहिल्या साक्षीदाराला बोलवा.

Don’t blame him.

त्याला दोष देऊ नकोस .

Switch on the lights.

विजेचे दिवे लाव.

Switch off the T.V.

टीव्ही बंद कर.

Switch on the fan.

पंखा चालू करा.

Turn on the radio.        

रेडीओ चालू कर.

Turn on the tap.

नळ चालू कर.

Turn off the video.

व्हिडिओ बंद कर.

Tone up the volume of the T.V.

टीव्हीचा आवाज वाढव .

Tone down the volume of the T.V.

टीव्हीचा आवाज कमी कर.

Light the fire.

विस्तव पेटव.

Don’t light the candles.

मेणबत्त्या लावू नकोस .

Light these lamps.

हे  दिवे लाव.

Phone the police at once.

पोलिसांना ताबडतोब फोन कर.

Put out the fire.

जाळ विझव.

Set off the firecrackers.

फटाके लावा.

Iron these shirts.

या शर्टांना इस्त्री कर.

Put on your shoes.

तुझे जोडे घाल.

Plug in this wire.

ही तार जोडून दे.

Plug in the T.V. set.

टीव्ही संच जोडून दे.

Bring my car here.

माझी गाडी इथे आण.

Plug up these holes.

ही छिद्रे बुजव.

Hang my coat on the peg.

माझा कोट खुंटीवर टांगून ठेव.

Pass me the jug.

ती सुरई माझ्याकडे येऊ दे .

Don’t let off firecrackers now.

आता फटाके लावू नकोस.

 

 

No comments:

Post a Comment