Wednesday, November 5, 2025

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 16

 









चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 16 

विषय - मराठी 

घटक - मराठी व्याकरण वचन  या  घटकांवर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.


थोडे महत्वाचे मुद्दे : 

वचन : दिलेल्या शब्दावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत ते कळते त्याला वचन असे म्हणतात.

वचनाचे दोन प्रकार - 

एकवचन - वस्तू एक असेल तर त्याला एकवचन असे म्हणतात.

उदा.बैल , नदी , मुलगा , फूल , गाय , पान ई.

अनेकवचन - वस्तू अनेक असतील तर त्याला अनेकवचन म्हणतात.

उदा.विहिरी,माळा,पिशव्या,घरे,बागा ई.

काही शब्दांचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते.

एकवचनी व अनेकवचनी शब्द 

एकवचन - अनेकवचन 

फूल - फुले 

पुस्तक - पुस्तके 

दार - दारे 

मोती  - मोते/मोत्ये 

लिंबू  - लिंबे 

पाखरू  - पाखरे 

फरशी  - फरश्या 

तळे - तळी 

खेडे - खेडी 

भाजी - भाज्या 

फळ - फळे 

लेकरू - लेकरे 

डोळा - डोळे 

तोफ - तोफा 

इमारत - इमारती 

बाटली - बाटल्या 

पाल - पाली 

चित्र - चित्रे 

पिशवी - पिशव्या 

गोष्ट - गोष्टी 

विळा - विळे 

बेडी - बेड्या 

बातमी - बातम्या 

चष्मा - चष्मे 

वही - वह्या 

पिसू - पिसवा 

नदी - नद्या 

नळी - नळ्या 

लेखणी - लेखण्या 

बी - बिया 

घर - घरे 

शेत - शेते 

घड्याळ - घड्याळे 

पैसा - पैसे 

वासरू - वासरे 

तट्टू - तट्टे 

रताळे - रताळी 

गाणे - गाणी 

मडके - मडकी 

मळा - मळे 

घोडा - घोडे 

गोळी - गोळ्या 

पायरी - पायऱ्या 

पंखा - पंखे 

खोली - खोल्या 

दरवाजा - दरवाजे 

कोकरू - कोकरे 

आठवण - आठवणी 

तलवार - तलवारी 

भाषण - भाषणे 

जिना - जिने 

जंगल - जंगले 

खिडकी - खिडक्या 

चटई - चटया 

सामना - सामने 

पेटी - पेट्या 

वाद्य - वाद्ये 

नमुना - नमुने 

वारूळ - वारुळे 

घार - घारी 

दिवा - दिवे 

पत्र - पत्रे 

माळ - माळा 

कपडा - कपडे 

अडकित्ता - अडकित्ते 

कपाट - कपाटे 

आरसा - आरसे 

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 16 येथे सोडवा .


No comments:

Post a Comment