Wednesday, December 24, 2025

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार 










  1. शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 
  2. अंग चोरणे - फारच थोडे काम करणे.
  3. अंगाची लाहीलाही होणे - अतिशय संताप निर्माण होणे.
  4. अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे .
  5. अंगवळणी पडणे - सवय होणे.
  6. ऊर भरून येणे - गदगदून येणे.
  7. कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.
  8. कपाळमोक्ष होणे - मृत्यू येणे / अचानक झालेल्या अपघातामुळे उद्ध्वस्त होणे.
  9. कपाळाला हात लावणे - हताश होणे , नाराजी दाखवणे.
  10. काढता पाय घेणे - प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे .
  11. कानउघाडणी करणे - चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
  12. कान उपटणे - कडक शब्दात समज देणे.
  13. कान टोचणे - खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
  14. कान निवणे - ऐकून समाधान होणे.
  15. कान फुंकणे - चुगली / चहाडी करणे.
  16. कानाने हलका असणे - कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
  17. कानामागे टाकणे - दुर्लक्ष करणे.
  18. कानाला खडा लावणे - एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
  19. कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे.
  20. कानीकपाळी ओरडणे - एकसारखे बजावून सांगणे.
  21. कानांवर घालणे - लक्षात आणून देणे.
  22. कानोसा घेणे - अंदाज घेणे , चाहूल घेणे .
  23. केसाने गळा कापणे - घात करणे .
  24. कंठ दाटून येणे - गहिवरून येणे.
  25. कंठस्नान घालणे - शिरच्छेद करणे.
  26. कंठाशी प्राण येणे - खूप कासावीस होणे.
  27. कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे.
  28. कंबर खचणे - धीर सुटणे .
  29. खांद्याला खांदा भिडवणे - सहकार्याने , एकजुटीने काम करणे.
  30. गळा काढणे - मोठ्याने रडणे.
  31. गळा गुंतणे - अडचणीत सापडणे.
  32. गळ्यात गळा घालणे - खूप मैत्री करणे.
  33. गळ्यातला ताईत होणे - अत्यंत आवडता होणे.
  34. गळ्यापर्यंत बुडणे - डबघाईला येणे,कर्जबाजारी होणे.
  35. चेहरा खुलणे - आनंद होणे.
  36. चेहरा पडणे - लाज वाटणे, खजील होणे, शरम वाटणे.
  37. छाती दडपणे - घाबरून जाणे , भीती वाटणे.
  38. जिभेला हाड नसणे - अद्वातद्वा बोलणे, वाटेल ते बोलणे .
  39. जीभ सैल सोडणे - वाटेल तसे/ ते बोलणे.
  40. जीव की प्राण असणे - खूप आवडणे.
  41. डोक्यावर खापर फोडणे - निर्दोष माणसावर दोष टाकणे.
  42. डोक्यावर बसवणे - फाजील / कमालीचे लाड करणे.
  43. डोळा असणे - पाळत ठेवणे.
  44. डोळा लागणे - झोप येणे.
  45. डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे.
  46. डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे.
  47. डोळे निवणे - समाधान होणे , पाहून बरे वाटणे.
  48. डोळे पांढरे होणे - मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
  49. डोळ्यांत अंजन घालणे - चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
  50. डोळ्यांत खुपणे - मत्सर करणे , सहन न  होणे.
  51. डोळ्यांत धूळ फेकणे - हातोहात / डोळ्यांदेखत / खोटेनाटे सांगून फसवणे .
  52. डोळ्याला डोळा न लागणे - झोप न येणे.
  53. डोळ्यांचे पारणे फिटणे - समाधान होणे , पाहून आनंदित होणे.
  54. डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे.
  55. डोळ्यांतून थेंब न काढणे - (आघात, दुःख होऊनही ) न रडणे.
  56. तळपायाची आग मस्तकी जाणे - अतिशय संतापणे.
  57. तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे .
  58. तोंडघशी पडणे - विश्वासघात होणे , अडचणीत येणे.
  59. तोंडघशी पाडणे - विश्वासघात करणे .
  60. तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे.
  61. तोंड देणे - सामना करणे, ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे.
  62. तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे.
  63. तोंड भरून बोलणे - मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
  64. तोंड वेंगाडणे - याचना करणे.
  65. तोंड सांभाळून बोलणे - जपून बोलणे.
  66. तोंडसुख घेणे - दोष देताना वाटेल तसे बोलणे.
  67. तोंडाची वाफ दवडणे - वायफळ बडबड करणे.
  68. तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.
  69. तोंडात शेण घालणे - पराकोटीची निंदा करणे .
  70. तोंडाला कुलूप घालणे - गप्प बसणे , तोंडातून ब्र सुद्धा न काढणे.
  71. तोंडाला तोंड देणे - भांडणे.
  72. तोंडाला पाणी सुटणे - हाव निर्माण होणे.
  73. दातओठ खाणे - चीड व्यक्त करणे.
  74. दात धरणे - सूड घेण्याची भावना बाळगणे.
  75. दात विचकणे - निर्लज्जपणे हसणे, वेंगाडणे , चिडवणे.
  76. दाताच्या कण्या करणे - वारंवार विनंती करणे.
  77. दाटी तृण  धरणे - सर्वार्थाने शरण जाणे.
  78. नजर चुकवणे - न दिसेल अशी हालचाल करणे , फसवणे .
  79. नवल वाटणे - आश्चर्य वाटणे , चकित होणे .
  80. नाक उडवणे - थट्टा / उपहास करणे.
  81. नाक कापणे - घोर अपमान करणे .
  82. नाक खुपसणे - नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे.
  83. नाक घासणे - लाचार होऊन माफी मागणे.
  84. नाक मुरडणे - नापसंती दाखवणे , उपहास व्यक्त करणे .
  85. नाकाने कांदे सोलणे - आगाऊपणे  शहाणपणा दाखवणे.
  86. नाकी नऊ येणे - फार दगदग होणे , दमणे.
  87. पाठ थोपटणे - शाबासकी देणे , कौतुक करणे .
  88. पाठ दाखवणे - समोरून पळून जाणे.
  89. पाठ पुरवणे - सारखे मागे लागणे , पिच्छा पुरवणे .
  90. पाठबळ असणे - आधार असणे .
  91. पाठीला पोट लागणे - उपाशी राहिल्याने हडकुळा होणे.
  92. पाय काढणे - प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे.
  93. पाय घसरणे - तोल जाणे , मोहात फसणे .
  94. पाय धरणे - शरण जाणे , माफी मागणे.
  95. पायबंद घालणे - आळा घालणे.
  96. पाय मोकळे करणे - फिरायला जाणे.
  97. स्वतःच्या पायावर उभे राहणे - स्वतंत्र होणे , स्वावलंबी होणे.
  98. (हसून हसून ) पोट दुखणे - खूप हसणे .
  99. पोटात आग पडणे - खूप भूक लागणे.
  100. पोटात कावळे कोकलणे - खूप भूक लागणे.
  101. पोटात ठेवणे - काहीही उघड न करणे , गुपित सांभाळणे.
  102.  पोटात शिरणे - मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे.
  103. पोटाला चिमटा घेणे - अत्यंत काटकसरीने राहणे.
  104. पोटावर पाय देणे - रोजंदारी बंद करणे.
  105. पोटाशी धरणे - माया करणे , कुशीत घेणे.
  106. प्राणापेक्षा जपणे - स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे.
  107. बोटावर नाचवणे - हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे.
  108. मांडीवर घेणे - दत्तक घेणे.
  109. मुठीत असणे - ताब्यात असणे.
  110. रक्त आटवणे - अतिकष्ट करणे.
  111. रक्ताचे पाणी करणे - अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे.
  112. हाडाची काडे करणे - अतिकष्ट करणे,अतिशय मेहनत करणे.
  113. हाडे खिळखिळी करणे - भरपूर चोप देणे.
  114. हात आखडणे - देण्याची क्षमता असूतानाही कमी देणे.
  115. हातघाईवर येणे - मारामारीची पाळी येणे.
  116. हातचा मळ असणे - एखादी गोष्ट सहज करता येणे.
  117. हात झटकणे - नामानिराळा होणे.
  118. हात टेकणे - नाईलाजाने शरण येणे .
  119. हात दाखवणे - मार देणे , फसवणे .
  120. हात देणे - मदत करणे.
  121. हात मारणे - ताव मारणे , भरपूर खाणे.
  122. हातातोंडाशी गाठ पडणे - जेमतेम खाण्यास मिळणे.
  123. हातापाया पडणे - लाचारीने विनवण्या करणे.
  124. हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून पळणे.
  125. (दोन)  हात करणे -  सामना करणे, टक्कर देणे .
  126. हृदय भरून येणे - गदगदून येणे, गहिवरून येणे.
  127. अभय देणे - भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे.
  128. अन्नान्न दशा येणे - अत्यंत दारिद्रयामुळे खायला न मिळणे.
  129. अन्नाला मोताद होणे - खायला न मिळणे.अन्नास जागणे - उपकार स्मरणे.
  130. आकाशपाताळ एक करणे - प्रयत्नांची परिसीमा गाठणे .
  131. आग पाखडणे - अतोनात संतापणे.
  132. आगीत उडी घेणे - स्वतःहून संकटात पडणे.
  133. आगीत तेल ओतणे - आधीच्या भांडणात आणखी भर घालणे.
  134. आभाळ कोसळणे - मोठे संकट येणे.
  135. आभाळ फाटणे - सर्व बाजूंनी संकटे येणे.
  136. आगेकूच करणे - निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे.
  137. आडवे होणे - झोपणे.
  138. आढेवेढे घेणे - इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे.
  139. उंटावरून शेळ्या हाकणे - प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे.
  140. आहुती देणे - बलिदान देणे.
  141. ओहोटी लागणे - उतरती कळा लागणे.
  142. अंत पाहणे - अखेरची ,मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे, सतत त्रास देऊन हैराण करणे.
  143. कणीक तिंबणे - खूप मारपीट करणे.
  144. कळ लावणे - भांडण लावणे.
  145. कचाट्यात सापडणे - तावडीत सापडणे.
  146. कडेलोट करणे - त्रास देण्याची परिसीमा गाठणे.
  147. करामत करणे - चमत्कार करणे.
  148. काट्याने काटा काढणे - दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे.
  149. कुरघोडी करणे- दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे .
  150. कुंपणाने शेत खाणे - ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे.
  151. कोंड्याचा मांडा करणे - हालाखीच्या परिस्थितीतही काटकसरीने ; समाधानाने राहणे.
  152. खजील होणे - केलेल्या चुकीची लाज वाटणे, शरम वाटणे.
  153. खडे चारणे - पराभव करणे.
  154. खडे फोडणे - दुसऱ्याला दोष देत राहणे.
  155. खळगी भरणे - पोट भरणे.
  156. खाजवून खरुज काढणे - भांडण उकरून काढणे.
  157. खो घालणे - एखाद्या कामात विघ्न आणणे.
  158. खोड मोडणे - अद्दल घडवणे.
  159. 'ग' ची बाधा होणे - गर्व होणे.
  160. गंध नसणे - अजिबात ज्ञान / माहिती नसणे.
  161. गर्क असणे - गुंतून राहणे,मन रंगाने, मग्न राहणे.
  162. गट्टी जमणे - मैत्री होणे.
  163. गहिवरून जाणे -  मनातून गलबलून जाणे.
  164. घर चालणे - कुटुंबाचा निर्वाह होणे.
  165. घरोबा असणे - जिव्हाळ्याचे संबंध असणे.
  166. घर डोक्यावर घेणे - खूप गोंगाट करणे.
  167. घाम जिरवणे - खूप कष्ट करणे, घाम गाळणे.
  168. घोकंपट्टी करणे - पाठांतर करणे, तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणणे.
  169. चाल करून येणे - हल्ला करणे.
  170. चाहूल घेणे - अंदाज घेणे,लक्ष देऊन ऐकणे,कानोसा घेणे.
  171. चीज होणे- घेतलेली मेहनत सफल होणे.
  172. चुळबूळ करणे -अस्वस्थ होऊन हालचाल करणे.
  173. चंग बांधणे - निश्चय करणे.
  174. जीवाचे रान  करणे - प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.
  175. जीवात जीव येणे - हायसे वाटणे, सुटकेची भावना निर्माण होणे.
  176. जिवाला जीव देणे - वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे.
  177. जीव तिळतीळ तुटणे - खूप हळहळणे .
  178. जीव भांड्यात पडणे - सुटकेची भावना निर्माण होणे.
  179. जंग जंग पछाडणे - कसून शोध घेणे.
  180. जळून खाक होणे - पूर्ण जळणे , राख होणे.
  181. झुंबड उडणे - गर्दी होणे .
  182. टेंभा मिरवणे - ऐट दाखवणे.
  183. टोमणा मारणे - खोचक बोलणे.
  184. टंगळमंगळ करणे - काम टाळणे,चालढकल करणे.
  185. डाव साधणे - संधी मिळताच जिंकणे,मतलब साधणे.
  186. डाल न शिजणे - काम न साधणे .
  187. तणतणत निघून जाणे - रागाने निघून जाणे.
  188. तमा नसणे - पर्वा नसणे.
  189. तावडीतून सुटणे - कचाट्यातून सुटणे.
  190. ताकास तूर लागू न देणे - थांगपत्ता लागू न देणे.
  191. तिखट बोलणे - जहाल बोलणे.
  192. तिळपापड होणे - अतिशय संताप होणे.
  193. तोड नसणे - योग्यतेचे दुसरे नसणे.
  194. दवंडी पिटणे - जाहीर करणे, सर्वांना सांगणे.
  195. दिवस पालटणे - परिस्थिती बदलणे.
  196. दिवस फिरणे - वाईट दिवस येणे.
  197. दुथडी भरून वाहणे - मोठ्या प्रमाणात विपुलता असणे.
  198. धडकी भरणे - खूप भीती वाटणे.
  199. धडगत नसणे -  संकटातून सुटण्याची आशा न उरणे.
  200. धाबे दणाणणे - खूप घाबरणे.
  201. धारातीर्थी पडणे - लढता लढता वीरमरण येणे.
  202. धुळीला मिळणे - नाश होणे, दुर्दशा होणे.
  203. धूम ठोकणे - पळून जाणे.
  204. धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.
  205. नाव मिळवणे - कीर्ती मिळवणे.
  206. नाव सोनेरी अक्षरात उमटवणे - चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे,अजरामर होणे,नाव कायमचे कोरले जाणे.
  207. निपचित पडणे - स्थिर,हालचाल न करता पडलेले राहणे.
  208. पदरमोड करणे - स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे.
  209. पराचा कावळा करणे - अतिशयोक्ती करणे.
  210. पसार होणे - पळून जाणे ,गायब होणे.
  211. पाचावर धारण बसणे - भयभीत होणे.
  212. पाणी पडणे - वाया जाणे.
  213. पाणी पाजणे - पराजित करणे.
  214. पाणी सोडणे - त्याग करणे.
  215. पाण्यात पाहणे - द्वेष करणे.
  216. पारडे फिरणे - परिस्थिती एकदम बदलणे.
  217. पारा चढणे - संताप होणे.
  218. पित्त खवळणे - खूप राग येणे.
  219. पोपटपंची करणे - अर्थ न समजता पाठ करणे.
  220. पोबारा करणे - पळून जाणे.
  221. पोरका / पोरकी होणे - अनाथ होणे.
  222. पैसे झाडाला लागणे - सहजपणे अतोनात पैसे मिळत राहणे.
  223. फडशा पाडणे - खाऊन टाकणे , ठार मारणे,नाश करणे.
  224. बस्तान बसवणे - स्थिरस्थावर होणे.
  225. बाजी मारणे - विजयी होणे, यशस्वी होणे.
  226. बुचकळ्यात पडणे - गोंधळ होणे,गोंधळून जाणे.
  227. भान हरपणे - गुंगून जाणे , तल्लीन होणे.
  228. भीतीने थरथर कापणे - खूप घाबरणे , थरकाप होणे.
  229. भंडावून सोडणे - गोंधळून टाकणे , सतावून सोडणे.
  230. मरणाला मिठी मारणे - स्वतःहून मरण ओढवून घेणे.
  231. माशी शिंकणे -  कामात विघ्न येणे.
  232. माश्या मारणे - काहीही न करता वेळ घालवणे.
  233. माग काढणे - शोध घेणे.
  234. मागावर असणे - शोधत असणे , पाळतीवर असणे.
  235. मात करणे - विजय मिळवणे.
  236. मात्रा न चालणे - इलाज न चालणे .
  237. मूग गिळणे - दुर्लक्ष करून गप्प बसणे.
  238. मेतकूट जमणे - खूप मैत्री होणे.
  239. रंगत येणे - खूप मजा येणे.
  240. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे - निष्कारण नको त्या उठाठेवी करणे.
  241. लालूच दाखवणे - मोहात पाडणे.
  242. वचपा काढणे - बदला घेणे , सूड घेणे.
  243. वाट लागणे - नष्ट होणे , नुकसान होणे.
  244. वाटेस जाणे - खोडी काढणे.
  245. वाकुल्या दाखवणे - चिडवणे.
  246. वाली भेटणे - आधार देणारा माणूस भेटणे.
  247. वीरश्री संचारणे - विजयाची उमेद निर्माण होणे.
  248. शोभा करणे - वाभाडे काढणे , निर्भर्त्सना करणे.
  249. शोभा होणे - नाचक्की होणे.
  250. शंख करणे - आरडाओरडा करणे.
  251. सळो की पळो करणे - सतावून सोडणे.
  252. सवड मिळणे - मोकळा वेळ मिळणे.
  253. सुसाट पळणे - वेगात पळणे , जोरात पळणे.
  254. सुळसुळाट होणे - अमर्याद वाढ होणे.
  255. सुळावर चढवणे - फाशी देणे.
  256. सैरावैरा पळणे - वाट मिळेल तिकडे पळणे.
  257. हट्टास पेटणे - स्वतःचे खरे करण्यासाठी वाट्टेल ते करणे .
  258. हमरीतुमरीवर येणे - वादाला भांडणाचे स्वरूप येणे.
  259. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करणे.
  260. हाती काही न लागणे - काहीच फायदा न होणे.
  261. हाय खाणे - धास्ती घेणे, मोठ्या दुःखामुळे मन खचत जाणे .
  262. हां हां म्हणता पसरणे - अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे.
  263. हुलकावणी देणे - फसवणे , चकवणे .
  264. हेळसांड करणे - आबाळ करणे. 
  265. होळी करणे  - चांगल्या गोष्टींचा नाश करणे .












Friday, November 21, 2025

पारिभाषिक शब्द

 पारिभाषिक शब्द 









पारिभाषिक शब्द  - पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी किंवा  इतर भाषांतून मराठी भाषेत वापरले जाणारे शब्द होय.




  • ड्रायव्हर - चालक 
  • कॉम्प्युटर - संगणक 
  • पेन - लेखणी 
  • डॉक्टर - वैद्य 
  • कॅमेरा - छायाचित्रक 
  • ग्राउंड - मैदान 
  • फंक्शन - कार्य 
  • फोर्क - काटेचामचा
  • बकेट - बादली 
  • पार्लमेंट - संसद 
  • पिक्चर - चित्रपट 
  • पेशंट - रुग्ण 
  • एक्सरे - क्ष -किरण 
  • बॅट - चेंडूफळी 
  • डिस्क - तबकडी 
  • अंपायर - पंच 
  • फॅन - पंखा 
  • थ्री डी - त्रिमिती 
  • ऑडिओ - ध्वनिक्षेपक 
  • करिक्युलम - अभ्यासक्रम 
  • रेंज - टप्पा 
  • एक्सिबिशन - प्रदर्शन 
  • मॉनिटर - दृश्यपटल 
  • रॉकेट - अग्निबाण 
  • लाईट - प्रकाश 
  • व्हिडिओ - चित्र - ध्वनिक्षेपक 
  • स्ट्रेचर - रुग्णशिबिका 
  • स्क्रीन - पडदा 
  • विंडो - खिडकी 
  • स्पून - चमचा 
  • शेअर - वाटा 
  • लँप - दिवा 
  • हॉस्पिटल - रुग्णालय 
  • टेलिव्हिजन - दूरदर्शन 
  • नर्स - परिचारिका 
  • पेन्शन - निवृत्तीवेतन 
  • कम्युनिकेशन - संवाद 
  • क्लॉक - घड्याळ 
  • गेम्स - खेळ 
  • चाट - गप्पा 
  • ऑफिस - कार्यालय 
  • प्रिंट - ठसा 
  • ऑईल - तेल 
  • मेसेज - संदेश 
  • कॅण्डल - मेणबत्ती 
  • केव्हज - गुहा 
  • बॉलर - गोलंदाज 
  • नॅशनल - राष्ट्रीय 
  •  पासवर्ड - सांकेतिक शब्द 
  • अप्लिकेशन - अर्ज 
  • कॅश - रोकड 
  • केबल - तार 
  • इंटरनेट - आंतरजाल 
  • कॅप्टन - कर्णधार 
  • बेसिक - मुलभूत 
  • प्रोसेस - प्रक्रिया 
  • प्रिंटर - मुद्रक 
  • ई-मेल - संगणकीय पत्र 
  • गव्हर्न्मेंट - शासन
  • रोबो - यंत्रमानव 
  • टेबल - मेज 
  • हार्डवेअर - धातूपासून बनवलेले साहित्य
  • सॉफ्टवेअर - संगणकाची आज्ञावली 
  • झेरॉक्स - प्रतिमुद्रा
  • मॅच - सामना  
  • गिफ्ट - भेटवस्तू 
  • कोर्ट - न्यायालय 
  • सेंटर - केंद्र                                                                                                                                                                                                         इतर भाषेतून मराठीत आलेले पारिभाषिक शब्द 
  • हिंदी - बात,दिल , भाई ,दाम ,बच्चा , और,  करोड , मिठाई,बेटा इत्यादी.
  • अरबी - इनाम,अर्ज,जाहीर,उर्फ,मंजूर,मेहनत,खर्च,हुकूम इत्यादी.
  • कानडी - (कन्नड)- कुंची,भाकरी,तूप,गाजर,खलबत्ता,ताई,अडकित्ता ,गुढी ,विळी,खिंड,बाबू इत्यादी.
  • तेलुगु - अनारसा , चेंडू,गदारोळ , ताळा .
  • फारसी - खाना,पोशाख,हकीकत,पेशवा,अत्तर,सामना,कामगार,इ.
  • गुजराती-दादर,डबा,घी,दलाल,रिकामटेकडा ,शेट ई.
  • पोर्तुगीज - तंबाखू,कोबी,चावी,बटाटा,पगार,हापूस,मेज,पेरू इत्यादी . 

 



सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 05 7th standard scholarship exam guess paper

 सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 05









विषय - मराठी 

घटक - पारिभाषिक शब्द 

या  घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.


सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 05

Tuesday, November 18, 2025

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 04 7th standard scholarship exam guess paper

 सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 04










विषय - मराठी 

घटक - मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 

या  घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 04


Friday, November 14, 2025

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 03 7th standard scholarship guess paper

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 03









 विषय - मराठी 

घटक - मराठी व्याकरण 

          अलंकारिक शब्द 

या  घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 03

Wednesday, November 12, 2025

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 02 7th Standard Scholarship Guess Paper

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 02








विषय - मराठी 

घटक - मराठी व्याकरण 

    विरुद्धार्थी शब्द 

या  घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 02 



सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 01 7th Standard Scholarship Exam guess paper

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 01 








विषय - मराठी 

घटक - मराठी व्याकरण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ  

या  घटकावर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

सातवी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 01 

Wednesday, November 5, 2025

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 16

 









चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 16 

विषय - मराठी 

घटक - मराठी व्याकरण वचन  या  घटकांवर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.


थोडे महत्वाचे मुद्दे : 

वचन : दिलेल्या शब्दावरून वस्तू एक आहे की अनेक आहेत ते कळते त्याला वचन असे म्हणतात.

वचनाचे दोन प्रकार - 

एकवचन - वस्तू एक असेल तर त्याला एकवचन असे म्हणतात.

उदा.बैल , नदी , मुलगा , फूल , गाय , पान ई.

अनेकवचन - वस्तू अनेक असतील तर त्याला अनेकवचन म्हणतात.

उदा.विहिरी,माळा,पिशव्या,घरे,बागा ई.

काही शब्दांचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते.

एकवचनी व अनेकवचनी शब्द 

एकवचन - अनेकवचन 

फूल - फुले 

पुस्तक - पुस्तके 

दार - दारे 

मोती  - मोते/मोत्ये 

लिंबू  - लिंबे 

पाखरू  - पाखरे 

फरशी  - फरश्या 

तळे - तळी 

खेडे - खेडी 

भाजी - भाज्या 

फळ - फळे 

लेकरू - लेकरे 

डोळा - डोळे 

तोफ - तोफा 

इमारत - इमारती 

बाटली - बाटल्या 

पाल - पाली 

चित्र - चित्रे 

पिशवी - पिशव्या 

गोष्ट - गोष्टी 

विळा - विळे 

बेडी - बेड्या 

बातमी - बातम्या 

चष्मा - चष्मे 

वही - वह्या 

पिसू - पिसवा 

नदी - नद्या 

नळी - नळ्या 

लेखणी - लेखण्या 

बी - बिया 

घर - घरे 

शेत - शेते 

घड्याळ - घड्याळे 

पैसा - पैसे 

वासरू - वासरे 

तट्टू - तट्टे 

रताळे - रताळी 

गाणे - गाणी 

मडके - मडकी 

मळा - मळे 

घोडा - घोडे 

गोळी - गोळ्या 

पायरी - पायऱ्या 

पंखा - पंखे 

खोली - खोल्या 

दरवाजा - दरवाजे 

कोकरू - कोकरे 

आठवण - आठवणी 

तलवार - तलवारी 

भाषण - भाषणे 

जिना - जिने 

जंगल - जंगले 

खिडकी - खिडक्या 

चटई - चटया 

सामना - सामने 

पेटी - पेट्या 

वाद्य - वाद्ये 

नमुना - नमुने 

वारूळ - वारुळे 

घार - घारी 

दिवा - दिवे 

पत्र - पत्रे 

माळ - माळा 

कपडा - कपडे 

अडकित्ता - अडकित्ते 

कपाट - कपाटे 

आरसा - आरसे 

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 16 येथे सोडवा .


Tuesday, November 4, 2025

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 15

 








चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 15 

विषय - मराठी 

घटक - लिंग  या  घटकांवर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

मराठी व्याकरण लिंग

लिंग या घटकाविषयी महत्वाचे मुद्दे :-

मराठी भाषेमध्ये पुल्लिंग,स्त्रीलिंग व नपुसकलिंग असे तीन प्रकार पडतात.

पुल्लिंग : यावरून पुरुषजातीचा बोध होतो.उदा.तो बैल , तो समुद्र , तो बोका ,तो भाऊ ,तो हत्ती , तो राजा .

स्त्रीलिंग: यावरून स्त्रीजातीचा बोध होतो .उदा.ती गाय , ती भाटी , ती बहीण,ती राणी, ती गवळण , ती देवी.

नपुसकलिंग : यावरून स्त्री व पुरुष अशा कोणत्याही जातीचा बोध होत नाही.उदा. ते वासरू,ते मूल,ते पुस्तक , ते रेडकू,ते पान , ते फुल .

लिंग ओळखताना शब्दाच्या पाठीमागे तो,ती, ते यापैकी योग्य प्रत्यय लावावा व लिंग ओळखावे.


 चाचणी क्रमांक  - 15 येथे सोडवा.


Monday, October 27, 2025

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 14

 







चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 14 

विषय - मराठी

घटक - माहिती तंत्रज्ञानविषक शब्द  या  घटकांवर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

 चाचणी क्रमांक  - 14 येथे सोडवा.


Monday, September 1, 2025

190+ Important English Words Starts with ‘C’









 190+ Important English

Words Starts with ‘C’

Cabbage - कोबी, पानकोबी

Cage - पिंजरा

Cake - केक , खाण्याचा एक गोड पदार्थ

Cake - केक , खाण्याचा एक गोड पदार्थ

Calendar - दिनदर्शिका

Call - बोलावणे , हाक मारणे

Call - हाक,साद,विशिष्ट आवाज

Calm - शांत , स्थिर

Camel - उंट

Camera - कॅमेरा , फोटो काढण्याचे यंत्र , छायाचित्रक

Camp - शिबीर

Can - शक्य असणे

Cancel - रद्द करणे , रद्द होणे

Candle - मेणबत्ती

Candy - गोळी,चॉकलेट इ.

Cane - काठी,छडी,बांबू

Cap - टोपी

Capital - मोठ्या लिपीतील

Captain - संघनायक , कर्णधार , कप्तान

Caption - चित्रे किंवा आकृत्यांबरोबर दिलेला मजकूर

Car - मोटार , मोटारगाडी

Card - जाड कागद , जाड,ताठ कागदाचा तुकडा

Care - काळजी , निगा

Care - काळजी किंवा पर्वा असणे , फिकीर वाटणे

Careful - काळजीपूर्वक,नीट काम करणारा , सावध 

Careless - निष्काळजी , कसेतरी काम करणारा

Carom - एक प्रकारचा बैठा खेळ

Carpenter - सुतार

Carrot - गाजर

Carry -एखादी गोष्ट धरून,उचलून दुसरीकडे नेणे ,वाहून नेणे

Cart - घोडा ,बैल वगैरे ओढतात ती दोन किंवा चार चाकांची गाडी

Cartoon - गंमतीशीर चित्र , व्यंगचित्र , चालत्या बोलत्या चित्रांचा चित्रपट

Cassette - ध्वनिफीत

Castle - किल्ला

Cat - मांजर

Catch - धरणे , पकडणे , झेलणे

Caterpillar - सुरवंट

Cauliflower - फुलकोबी

Cave - गुहा

Ceiling - आढे ,छत

Cell - विजेवर चालणाऱ्या उपकरणात वीज तयार करण्यासाठी ठेवले जाणारे छोटेसे साधन

Centre - केंद्र , मध्य ,मुख्य जागा , एखाद्या कामासाठी खास जागा

Century - शंभर धावा , शतक

Chain - साखळी

Chair - खुर्ची

Chalk - खडू , खडूची कांडी

Chat - गप्पा मारणे

Change - बदलणे , बदल करणे

Change - बदल

Channel T.V. - कार्यक्रमांची वाहिनी

Chapter - प्रकरण , धडा

Chart -तक्ता

Chase - पाठलाग करणे

Cheap - स्वस्त

Cheat - फसवणे , लबाडी करणे

Check - तपासणे , तपासून पाहणे

Cheek - गाल

Chemist - औषधे वगैरे विकणारा दुकानदार

Chew - चघळणे , चावून खाणे

Chicken - कोंबडी

Chief - मुख्य , प्रमुख

Child - लहान मूल

Chilli - मिरची

Chin- हनुवटी

Chirp - किलबिल करणे, चिवचिवाट करणे

Chocolate - कोकोच्या बियांपासून बनवला जाणारा एक गोड पदार्थ

Choice - निवड , पसंती

Chomp - कचाकच खाणे

Choose - आपल्या पसंतीने निवडणे , पसंत करणे

Christmas - नाताळ

Church - ख्रिस्ती प्रार्थनास्थळ

Cinema - चित्रपट

Circle - वर्तुळ , गोल

Circle - कशाच्या तरी भोवती गोल काढणे , गोल, गोल फिरणे 

Circus- कसरतीच्या खेळांचा कार्यक्रम 

City - शहर , मोठे नगर

Clap - टाळ्या वाजवणे

Clap - टाळी

Class - इयत्ता

Classroom - एखादा वर्ग ज्या ठिकाणी भरवला जातो ती जागा किंवा खोली, वर्ग  

Claw - प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे नख / नख्या

Clean - स्वच्छ , निर्मळ

Clean - एखादी गोष्ट स्वच्छ करणे, साफसफाई करणे

Clear - स्वच्छ , स्पष्ट

Clever - हुशार , चतुर

Climb - चढणे

Clip - चाप , क्लिप

Clock- घड्याळ

Close - मिटणे, बंद होणे , बंद करणे

Close - जवळ , शेजारी

Cloth - कापड

Clothes - कपडे

Cloud - ढग

Cluck - कोंबडीचा आवाज

Coal - कोळसा

Coat - कोट( कोट बहुधा इतर कपड्यांवर घालतात.)

Cock - कोंबडा

Cockroach - झुरळ

Coconut - नारळ

Coffee - कॉफीच्या बियांची पावडर / ती घालून केलेले पेय

Coin - नाणे

Cold - गार , थंड

Collage - विविध आकारांचे तुकडे चिकटवून बनवलेले चित्र / आकृती

Collar - शर्ट/ फ्रॉक वगैरेच्या गळ्याभोवती असलेली पट्टी

Collect - गोळा करणे ,जमा करणे

College - महाविद्यालय

Colony - वसाहत , एकत्र घरे करून राहणाऱ्या लोकांची वस्ती

Colour - रंग

Colourful - रंगीबेरंगी , उठावदार

Comb - कंगवा , फणी

Come - येणे

Compare - तुलना करणे , दोन गोष्टीतील सारखेपणा व फरक पाहणे

Competition - स्पर्धा

Complain - तक्रार करणे, कुरकुरणे

Complete - पूर्ण करणे

Complete - पूर्ण ,संपूर्ण

Computer - संगणक

Conductor - वाहक

Congratulations - अभिनंदन

Contain - आत काहीतरी असणे

Cook - शिजवणे , स्वयंपाक करणे

Cooker - वाफेवर पदार्थ शिजवण्यासाठी झाकण असलेले भांडे

Cool - थंडगार

Copy - अगदी हुबेहूब कशासारखी तरी दिसणारी गोष्ट ,  प्रत,नक्कल

Copy - पाहून तसेच्या तसे लिहिणे , तसेच्या तसे उतरवून घेणे

Corn - मका , गहू इ.

Corner - कोपरा

Correct - बरोबर , योग्य , खरे

Correct - दुरुस्त करणे , चूक सुधारणे ,तपासणे

Cost - एखादी गोष्टीची ठराविक किंमत असणे

Cot - पलंग, बाज , खाट

Cotton - कापूस

Cough - खोकला

Cough - खोकणे

Count - मोजणे

Country - देश

Court - न्यायालय , दरबार , एखाद्या खेळाचे मैदान

Cousin - चुलत , मावस, मामे किंवा आतेभावंड , नात्यातील व्यक्ती

Cover - वेष्टन किंवा आवरण घालणे , झाकणे, लपवणे

Cover - आवरण,आच्छादन ,पुस्तक किंवा वहीचे मुख्य पृष्ठ

Cow - गाय

Coward - भित्रा

Crab - खेकडा

Cracker - आवाजाचा फटाका

Cradle - पाळणा

Crane - करकोचा

Crawl - रांगणे

Crayon- रंगीत खडू , तेली खडू

Cream - मलई , साय

Creature - कोणताही लहान मोठा प्राणी विशेषतः वेगळ्या प्रकारचा , विचित्र प्राणी

Creep - आवाज न करता सावकाश पुढे सरकणे

Cricket - क्रिकेटचा खेळ

Crocodile - मगर , सुसर

Crooked - वेडावाकडा , वाकडातिकडा

Crop - पीक

Cross - ओलांडणे , ओलांडून जाणे , एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाणे

Cross - रागावलेला , चिडलेला

Cross - फुली , गुणाकाराचे चिन्ह

Crossing - रेल्वे,रस्ता ओलांडण्याची ठराविक जागा

Crossword - शब्दकोडे

Crow - कावळा

Crowd - गर्दी , जमाव

Crown - मुकुट

Cruel - क्रूर ,दुष्ट

Crunch - कुरकुरीत पदार्थ खाताना येणारा आवाज ,कुरुम कुरुम

Cry - रडणे

Crystal - स्फटिक, उत्तम प्रकारची काच , बिलोरी काच

Cub - छावा ,बछडा ,वाघ,  सिंह ,अस्वल ,लांडगा किंवा कोल्हा अशा प्राण्यांचे पिल्लू

Cuckoo - कोकिळा

Cucumber - काकडी

Cunning - धूर्त,लबाड, लुच्चा, कावेबाज

Cup - कप

Cupboard - कपाट

Curl -एखाद्या गोष्टीला गोल आकार देणे, गोल आकारात वाकवणे

Curtain -पडदा

Cut -कापणे , चिरणे

Custard apple - सिताफळ

Cute - दिसायला गोड, एकदम आवडेल असे

Cycle - सायकल