Tuesday, November 4, 2025

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 15

 








चौथी शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन टेस्ट - 15 

विषय - मराठी 

घटक - लिंग  या  घटकांवर आधारित महत्वाचे प्रश्न.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.

मराठी व्याकरण लिंग

लिंग या घटकाविषयी महत्वाचे मुद्दे :-

मराठी भाषेमध्ये पुल्लिंग,स्त्रीलिंग व नपुसकलिंग असे तीन प्रकार पडतात.

पुल्लिंग : यावरून पुरुषजातीचा बोध होतो.उदा.तो बैल , तो समुद्र , तो बोका ,तो भाऊ ,तो हत्ती , तो राजा .

स्त्रीलिंग: यावरून स्त्रीजातीचा बोध होतो .उदा.ती गाय , ती भाटी , ती बहीण,ती राणी, ती गवळण , ती देवी.

नपुसकलिंग : यावरून स्त्री व पुरुष अशा कोणत्याही जातीचा बोध होत नाही.उदा. ते वासरू,ते मूल,ते पुस्तक , ते रेडकू,ते पान , ते फुल .

लिंग ओळखताना शब्दाच्या पाठीमागे तो,ती, ते यापैकी योग्य प्रत्यय लावावा व लिंग ओळखावे.


 चाचणी क्रमांक  - 15 येथे सोडवा.


No comments:

Post a Comment