Showing posts with label Scholarship. Show all posts
Showing posts with label Scholarship. Show all posts

Thursday, November 4, 2021

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

 




मराठी म्हणी व त्यांचा अर्थ

 

1.खाण तशी माती -जसे आईबाप तसे मूल .

2.खायला काळ , भुईला भार - ज्याचा कोणाला काही उपयोग नाही असा माणूस .

3.खुट्याची सोडली अन झाडाले बांधली - कुठेही शेवटी बंधनातच असणे .

4.खरा मोती गागऱ्यात लपला - खऱ्याची पारख नसणे .

5.खातो दोन आन्याचं , अंगात सतरा आन्याचं - केवळ बढाया मारणे .

6.खाटिकाला शेळी धार्जिणी - कठोर व्यक्तीला घाबरून सारे त्याच्या इच्छेनुसार काम करतात .

7.खिळ्यासाठी नाल गेला , नालासाठी घोडा गेला  - लहानश्या गोष्टीची उपेक्षा केल्यास भयानक परिणाम .

8.गर्जेल तो वर्षेल काय ? - जो वटवट करतो त्याचे हातून प्रत्यक्ष काय कार्य घडेल .

9.गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाला अखेर लज्जित व्हावे लागते .

10.गाढवाच्या पाठीवर साखरेची गोणी - एखाद्या गोष्टीची अनुकूलता असून उपयोग होत नाही .त्याचा फायदा करून घेतला पाहिजे  .

11.गाढवाला गुळाची चव काय ? - गार पारख्याला रत्नाची परीक्षा कशी

 काय करता येईल .

12.गाढवापुढे वाचली गीता , कालचा गोंधळ बरा होता - मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा काहीच परिणाम होत नाही .

13.गाव करी ते राव न करी - समुदायाने जे काम होईल ते राजाच्या हातूनही होणार नाही .

14.गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तम नाहीतर तिचा उपयोग अन्य तऱ्हेने करता येईल .

15.गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्या लोकांबरोबर आश्रितांचाही फायदा होतो .

16.गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य - एखाद्याचे घ्यावयाचे आणि त्यालाच द्यावयाचे .

17.गोरा गोमटा कपाळकरंटा - दिसण्यात सुंदर पण नशिबाने दुर्दैवी .

18.गोष्ट लहान सांगणं महान - क्षुल्लक गोष्टीचा उदोउदो करणे .

19.गरिबी हरिबी काही हातची नाही - काळ काही आपल्या हातचा नाही .

20.गरिबानं खपावं ,धनिकानं चाखावं - गरिबानं कष्ट करावेत श्रीमंतानं माल खावा .

21.गोष्टी गोष्टी अन मेला कोष्टी - लांबलचक गोष्टी केल्यास मूळ कामधंदा बाजूला राहून नुकसान होते .

22.गोफण गेली तिकडे गोटा पडला इकडे  - कोणत्याही कामात ताळमेळ नसणे .

23.गाव सगळा मामाचा एक नाही कामाचा - अनेक सगेसोयरे असूनही प्रसंगी कुणीच मदत करीत नाही .

24.गरज सरो , वैद्य मरो - गरज असेपर्यंत पुढे पुढे करणे मग न विचारणे .

25.गरिबाच्या दाराला सावकाराची कडी - गरिबांवर सावकाराचा अंमल .

26.घरोघरी मातीच्या चुली - जिकडे तिकडे सारखीच परिस्थिती असणे .

27.घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - प्रतिकूल परिस्थिती आल्यास सर्वच उलटे वागतात .

28.घर बांधून पाहावे , लग्न करून पाहावे - घर बांधायला अथवा लग्न करायला अंदाजापेक्षा अधिक खर्च येतो .

29.घरची ओस अंगण सांगते - घरात किती टापटीप आहे हे त्याच्या अंगणावरून समजते .

30.घर ना दार देवळी बिऱ्हाड - फकीरासारखे जीवन जगणे .

31.घुगऱ्या मूठभर सारी रात मरमर - कमाई थोडी पण खर्चच फार .

32.घरात नाही कौल , रिकामा डौल - घरात गरिबी पण रिकामीच ऐट .

33.घडाईत परीस मढाईत जास्त  - बनविण्यापेक्षा दुरुस्तीचाच अधिक खर्च .

34.घोड्यावर हौदा , हत्तीवर खोगीर - एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे .

35.घोडी मेली ओझ्याने , शिंगरू मेले हेलपाट्याने - आई काम करून थकते आणि तिचे मूल तिच्या मागे फिरून फिरून थकून जाते .

36.चार दिवस सासूचे ,चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला काही दिवस अधिकार मिळतो .

37.चोरावर मोर - एकापेक्षा एक सवाई अपराध करणारा .

38.घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे - स्वतःचा खर्च करून इतरांची कामे करणे .

39.चोराची पावले चोरास ठाऊक - चोराची कृत्ये , लबाड्या चोरालाच माहित .

40.घरासारखा गुण , सासू तशी सून - लहान मोठ्यांचे अनुकरण करत असतात .

41.चमत्कारावाचून नमस्कार नाही व पराक्रमावाचून पोवाडा नाही  - काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत .

42.चांदणे चोराला , ऊन घुबडाला   - चांगल्या गोष्टी दुर्जनाला आवडत नाहीत .

43.चालत्या गाड्याला वंगण कोणीही घालील - ज्याच्याजवळ सर्व काही आहे त्याला मदत करण्यास कोणीही तयार असते .

44.चिंता करी ते येई घरा - दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली की आपलेच वाईट होते .

45.चोर तो चोर वर शिरजोर - चोरी तर केली आणि वर आणखी शिरजोरी .

46.जळत्या घरचा पळता वासा - दिवाळखोर गृहस्थाच्या इस्टेटीतून जे काय हाती लागेल तेवढेच .

47.जन्मा घालील तो भाकर देईलच - जो आपणास जन्म देतो तो आपले पालनपोषण करतोच करतो  .

48.जळात राहून माशाशी वैर करू नये - जेथे आपण राहतो तेथे सलोख्याने राहावे .

49.जशी देणावळ तशी धुणावळ - आपण जसे दुसऱ्याच्या उपयोगी पडतो तसे दुसरे आपल्या उपयोगी पडतात .

50.जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - माणसाला ज्या सवयी लागतात ,त्या शेवटच्या क्षणापर्यंत असतात .

51.जनात एक मनात एक  - दुटप्पी वर्तनाचा मनुष्य .

52.जनात बुवा आणि मनात कावा  - बाह्य जगात बुवा पण मनात कपट .

53.जन्मा आला हेला ,पाणी वाहता वाहता मेला - निर्बुद्ध लोक कष्ट करता करताच मारतात .

54.जशास तसे - एकाने केले त्याचप्रमाणे दुसऱ्याने वागावे .

55.जसा भाव तसा देव - ज्याप्रमाणे देवाची भक्ती असते त्याप्रमाणेच फळ मिळते .

56.जसा राजा तशी प्रजा - ज्याप्रमाणे राजाचे वर्तन असते , तसेच प्रजेचे .

57.जसे करावे तसे भरावे - जसे कर्म करावे तसे फळ मिळते .

58.टाकीचे घाव सोसल्यावाचून देवपण येत नाही  - अपार कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होत असते .

59.झाडाला कान्हवले आणि आडात गुळवणी - ज्या गोष्टी शक्य नाहीत अशा गोष्टी करणे .

60.झोपेला धोंडा ,भुकेला कोंडा - भूक लागली की कण्या-कोंडाही

चालतो ,थकल्यावर कोठेही झोप येते .

61.हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये - दूरचे मिळण्याच्या आशेने जवळचे गमावू नये .

62.झाकली मूठ सव्वा लाखाची - आपल्याजवळ जे आहे त्याविषयी न सांगितलेलेच बरे  .

63.डाळ शिजत नाही आणि वरण उकळत नाही - कोणतीच गोष्ट साध्य होत नाही .

64.डोंगर पोखरून उंदीर काढणे - मोठ्या प्रमाणावर कष्ट करून हाती अत्यल्पच यश  लागणे  .

65.तन खाई धन - शेतात तनकट असेल तर पीक वाढत नाही .

66.ताकापुरती आजी - ज्याच्याकडून काम करून घ्यावयाचे असते त्याची प्रशंसा करतात  .

67.ताकापुरते रामायण - काम साधण्यापुरते आर्जव .

68.ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या पूर्ण अधीन असणे .

69.तुझे माझे जमेना , तुझ्यावाचून करमेना - एकमेकाशी झगडत राहणे , पण एकमेकांखेरीज न करमणे .

70.तेल गेले ,तूप गेले हाती धुपाटणे राहिले - दोन्हीकडून फायदा व्हावा म्हणून प्रयत्न करणे पण शेवटी दोन्हीकडून निराशाच पदरी पडणे .

71.तोंड दाबून बुक्क्यांचा मार - आपले नुकसान होत आहे तरीही लाचारीने शांत राहणे अशी परिस्थिती .

72.थेंबे थेंबे तळे साचे - एका एका वस्तूचाही हळूहळू संग्रह केला असता कालांतराने मोठा संचय होतो .

73.थोडे बोलणे , बहुत करणे - बोलावे थोडे पण कृतीच पुष्कळ करावी .

74.दमडीची कोंबडी रुपयांचा मसाला - क्षुल्लक गोष्टीसाठी अधिक खर्च .

75.दहा गेले पाच राहिले - आयुष्याची बरीच वर्षे निघून गेली आता फार थोडी राहिली .

76.दही खाऊ की मही खाऊ - हे करू की ते करू .

77.दळील तो भरील , करील तो पावेल - जो कष्ट करील त्याला त्याचे फळ मिळेल .

78.दात आहेत तर चणे नाहीत ,चणे आहेत तर दात नाहीत - पूर्ण सुखसमाधान,शांती कधीच लाभत नसते .प्रत्येकवेळी काही ना काही कमतरता असतेच  .

 

 

Monday, November 1, 2021

ध्वनिदर्शक शब्द

 



                     ध्वनिदर्शक शब्द

आपल्या आजूबाजूला अनेक ध्वनी निर्माण होत असतात.यांमध्ये प्राण्यांचे आवाज , पक्ष्यांचे आवाज,कीटकांचा आवाज, वाद्यांचा आवाज,वाहनांचा आवाज इत्यादींचा समावेश होतो.अशा प्रकारच्या आवाजाला विशिष्ट शब्द वापरले जातात . त्याला ‘ध्वनिदर्शक शब्द’ म्हणतात.आज आपण असेच महत्वाचे ध्वनिदर्शक शब्द अभ्यासणार आहोत .

  1. कबुतराचे- घुमणे
  2. कुत्र्याचे – भुंकणे
  3. कोल्ह्याची – कोल्हेकुई
  4. गाईचे – हंबरणे
  5. मेंढी/शेळी – बे ऽ बे
  6. बैल – डरकणे
  7. मोरांची – केकारव
  8. हंस – कलरव
  9. घोडा – खिंकळणे
  10. पाखरांची – किलबिल
  11. जात्याची – घरघर
  12. पावसाची – रिपरिप/रिमझिम
  13. थंडीची – हुडहुडी
  14. विजेचा – कडकडाट
  15. पारव्याचे – घुटर्रघुम ऽ ऽ
  16. पालीची – चुकचुक
  17. डुकराची – डूरडूर
  18. चिमणी – चिवचिव
  19. भुंग्याचा – गुंजारव
  20. डास – गुणगुण
  21. हृदयाची – धडधड
  22. ढगांचा – गडगडाट
  23. तलवारीचा – खणखणाट
  24. पानांची – सळसळ
  25. पाण्याचा – खळखळाट
  26. मांजरीचे – म्याँव ऽ  म्याँव ऽ
  27. पक्ष्यांचा मंजूळ आवाज –  किलबिल
  28. रक्ताची – भळभळ
  29. वारा – घोंगावणे
  30. कावळ्याची – कावकाव
  31. कोकिळेचे – कुहूकुहू
  32. कोंबड्याचे – आरवणे
  33. वाघाची – डरकाळी
  34. सिंहाची – गर्जना
  35. साप-फुसफुसणे
  36. म्हैस – रेकणे
  37. हत्ती – चीत्कारणे
  38. घूस – चिरचिर
  39. बेडकाचे – डराँव ऽ डराँव ऽ
  40. चांदण्यांची – चमचम
  41. घड्याळाची – टिकटिक
  42. पक्ष्यांची – किलबिल
  43. उंदराची – चिरचिर
  44. रातकिड्यांची – किरकिर
  45. माकडाचा – भुभुःकार
  46. घुबडांचा – घुत्कार
  47. माणूस – कुजबूज ,गोंगाट
  48. मधमाश्यांचा – गुंजारव
  49. पंखांची – फडफड
  50. नाण्यांचा – छनछनाट
  51. पैंजणांची – छुमछुम
  52. घंटेची – घणघण
  53. बांगड्यांची – किणकिण
  54. दिव्यांचा – लखलखाट
  55. गाढवाचे – ओरडणे
  56. पक्ष्यांचे भांडण – कलकलाट
  57. वासाचा – घमघमाट

 

 

 

  


Tuesday, October 26, 2021

शब्दसमूहाबद्दल एक शब्द


शब्दसमूहाबद्दल एक शब्द

  1. ज्याचा तळ लागत नाही असा – अथांग
  2. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
  3. ढगांनी भरलेले – ढगाळलेले , अभ्राच्छादित
  4. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा
  5. थोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट
  6. दगडावर / दगडाच्या मूर्ती घडवणारा – शिल्पकार
  7. दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
  8. अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
  9. मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
  10. योजना आखणारा – योजक
  11. रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
  12. रक्षण करणारा – रक्षक
  13. रात्रीचा पहारेकरी – जागल्या
  14. राज्यातील लोक – प्रजाजन ,रयत ,प्रजा
  15. रोग्यांची सुश्रुषा करणारी – परिचारिका
  16. लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
  17. लढण्याची विद्या – युद्धकला
  18. लाखो रुपयांचा धनी – लक्षाधीश
  19. लिहिता वाचता येणारा – साक्षर
  20. लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
  21. लोकांचा आवडता – लोकप्रिय
  22. लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
  23. लोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक
  24. वनात राहणारे प्राणी – वनचर
  25. अरण्याचा राजा – वनराज
  26. अरण्याची शोभा – वनश्री
  27. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित
  28. अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
  29. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
  30. आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र
  31. इनाम म्हणून वंशपरंपरगत मिळालेली जमीन – वतन
  32. ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
  33. ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
  34. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
  35. ऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधीर
  36. भाषण ऐकणारे – श्रोते
  37. अंग राखून काम करणारा – अंगचोर
  38. कथा सांगणारा – कथेकरी
  39. कथा (गोष्ट) लिहिणारा – कथाकार ,कथालेखक
  40. कल्पना नसताना आलेले संकट – घाला
  41. कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
  42. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
  43. कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
  44. कष्ट करून जगणारा – कष्टकरी
  45. श्रमांवर जगणारा – श्रमजीवी
  46. कविता करणारा /रचणारा – कवी
  47. गाणे गाणारा – गायक
  48. ज्याला लाज लाज नाही असा – निर्लज्ज
  49. कविता करणारी – कवयित्री
  50. कमी आयुष्य असलेला – अल्पायू / अल्पायुषी
  51. कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी ,क्षणभंगुर
  52. कादंबऱ्या लिहिणारा / लिहिणारी – कादंबरीकार
  53. किल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट
  54. कुस्ती खेळण्याची जागा – हौद ,आखाडा
  55. केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
  56. केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
  57. कैदी ठेवण्याची जागा – कारागृह ,बंदिशाळा,तुरुंग
  58. खूप दानधर्म करणारा – दानशूर
  59. खूप आयुष्य असलेला – दीर्घायू ,दीर्घायुषी
  60. खूप मोठा विस्तार असलेला – ऐसपैस , विस्तीर्ण
  61. खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  62. गाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास
  63. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ
  64. घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
  65. घोडे बांधायची जागा – पागा ,तबेला
  66. चरित्र लिहिणारा – चरित्रकार
  67. चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चवाठा
  68. अनेकांमधून निवडलेले – निवडक
  69. चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष , शुक्लपक्ष
  70. चित्रे काढणारा – चित्रकार
  71. जमिनीखालील गुप्त मार्ग – भुयार
  72. जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
  73. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी –   उभयचर
  74. जमिनीचे दान – भूदान
  75. जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
  76. ज्याला आईवडील नाहीत असा – पोरका , अनाथ
  77. ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि ,चक्रधर
  78. ज्याला मरण नाही असा – अमर
  79. ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
  80. दररोज प्रसिद्ध होणारे –दैनिक
  81. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
  82. दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
  83. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे – मासिक
  84. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
  85. दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
  86. दर वर्षाला ,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे – वार्षिक
  87. दररोजचा ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
  88. दारावरील पहारेकरी – द्वारपाल , दरवान
  89. दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
  90. दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
  91. स्वतःवर  अवलंबून असलेला  -  स्वावलंबी
  92. दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम
  93. देशाची सेवा करणारा – देशसेवक
  94. देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
  95. दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
  96. धान्य साठवण्याची जागा – कोठार
  97. नदीची सुरुवात होते ती जागा – उगम
  98. नाटक लिहिणारा – नाटककार
  99. होडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक
  100. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता
  101. नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
  102. पहाटेपूर्वीची वेळ – उषःकाल
  103. पाऊस मुळीच न पडणे – अवर्षण,अनावृष्टी
  104. पायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक
  105. पायात जोडे न घातलेला – अनवाणी
  106. पाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक
  107. पायी जाणारा – पादचारी
  108. पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
  109. पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
  110. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक – पूरग्रस्त
  111. पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व
  112. प्रेरणा देणारा – प्रेरक
  113. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त ,अन्नछत्र
  114. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
  115. बसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
  116. बातमी सांगणारा /सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका
  117. बातमी आणून देणारा /देणारी – वार्ताहर
  118. भाषण करणारा – वक्ता
  119. मन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर ,चित्ताकर्षक
  120. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गोदाम ,कोठार ,वखार
  121. माकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी
  122. मासे पकडणारा – कोळी
  123. मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
  124. मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
  125. मूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक
  126. मोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य
  127. श्रेष्ठ (महान)ऋषी – महर्षी
  128. डोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन
  129. वाडवडिलांकडून मिळालेली – वडिलोपार्जित
  130. विमान चालवणारा – वैमानिक
  131. व्याख्यान देणारा – व्याख्याता
  132. शत्रूकडील बातमी काढणारा – हेर
  133. शत्रूला सामील झालेला – फितूर
  134. शिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण
  135. शेती करतो तो – शेतकरी
  136. शोध लावणारा – संशोधक
  137. सतत काम करणारा – दीर्घोद्योगी
  138. सतत निंदानालस्ती करणारा – निंदक
  139. समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
  140. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
  141. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
  142. संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
  143. स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा –   
  144. सांगकाम्या
  145. सिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथालेखक
  146. सुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप
  147. स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
  148. स्वतः संपादन केलेली – स्वार्जित , स्वसंपादित
  149. स्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
  150. स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा – स्वार्थी
  151. स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
  152. स्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वभिमानशून्य
  153. दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार, दिलदार
  154. स्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी
  155. स्तुती गाणारा – भाट
  156. हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
  157. हरिणासारखे डोळे असणारी –मृगाक्षी ,हरिणाक्षी,मृगनयना,कुरंगनयना
  158. हिंडून करायचा पहारा – गस्त
  159.  हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल