Showing posts with label प्रज्ञा शोध परीक्षा. Show all posts
Showing posts with label प्रज्ञा शोध परीक्षा. Show all posts

Monday, November 1, 2021

ध्वनिदर्शक शब्द

 



                     ध्वनिदर्शक शब्द

आपल्या आजूबाजूला अनेक ध्वनी निर्माण होत असतात.यांमध्ये प्राण्यांचे आवाज , पक्ष्यांचे आवाज,कीटकांचा आवाज, वाद्यांचा आवाज,वाहनांचा आवाज इत्यादींचा समावेश होतो.अशा प्रकारच्या आवाजाला विशिष्ट शब्द वापरले जातात . त्याला ‘ध्वनिदर्शक शब्द’ म्हणतात.आज आपण असेच महत्वाचे ध्वनिदर्शक शब्द अभ्यासणार आहोत .

  1. कबुतराचे- घुमणे
  2. कुत्र्याचे – भुंकणे
  3. कोल्ह्याची – कोल्हेकुई
  4. गाईचे – हंबरणे
  5. मेंढी/शेळी – बे ऽ बे
  6. बैल – डरकणे
  7. मोरांची – केकारव
  8. हंस – कलरव
  9. घोडा – खिंकळणे
  10. पाखरांची – किलबिल
  11. जात्याची – घरघर
  12. पावसाची – रिपरिप/रिमझिम
  13. थंडीची – हुडहुडी
  14. विजेचा – कडकडाट
  15. पारव्याचे – घुटर्रघुम ऽ ऽ
  16. पालीची – चुकचुक
  17. डुकराची – डूरडूर
  18. चिमणी – चिवचिव
  19. भुंग्याचा – गुंजारव
  20. डास – गुणगुण
  21. हृदयाची – धडधड
  22. ढगांचा – गडगडाट
  23. तलवारीचा – खणखणाट
  24. पानांची – सळसळ
  25. पाण्याचा – खळखळाट
  26. मांजरीचे – म्याँव ऽ  म्याँव ऽ
  27. पक्ष्यांचा मंजूळ आवाज –  किलबिल
  28. रक्ताची – भळभळ
  29. वारा – घोंगावणे
  30. कावळ्याची – कावकाव
  31. कोकिळेचे – कुहूकुहू
  32. कोंबड्याचे – आरवणे
  33. वाघाची – डरकाळी
  34. सिंहाची – गर्जना
  35. साप-फुसफुसणे
  36. म्हैस – रेकणे
  37. हत्ती – चीत्कारणे
  38. घूस – चिरचिर
  39. बेडकाचे – डराँव ऽ डराँव ऽ
  40. चांदण्यांची – चमचम
  41. घड्याळाची – टिकटिक
  42. पक्ष्यांची – किलबिल
  43. उंदराची – चिरचिर
  44. रातकिड्यांची – किरकिर
  45. माकडाचा – भुभुःकार
  46. घुबडांचा – घुत्कार
  47. माणूस – कुजबूज ,गोंगाट
  48. मधमाश्यांचा – गुंजारव
  49. पंखांची – फडफड
  50. नाण्यांचा – छनछनाट
  51. पैंजणांची – छुमछुम
  52. घंटेची – घणघण
  53. बांगड्यांची – किणकिण
  54. दिव्यांचा – लखलखाट
  55. गाढवाचे – ओरडणे
  56. पक्ष्यांचे भांडण – कलकलाट
  57. वासाचा – घमघमाट

 

 

 

  


Tuesday, October 26, 2021

शब्दसमूहाबद्दल एक शब्द


शब्दसमूहाबद्दल एक शब्द

  1. ज्याचा तळ लागत नाही असा – अथांग
  2. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
  3. ढगांनी भरलेले – ढगाळलेले , अभ्राच्छादित
  4. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा
  5. थोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट
  6. दगडावर / दगडाच्या मूर्ती घडवणारा – शिल्पकार
  7. दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
  8. अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
  9. मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
  10. योजना आखणारा – योजक
  11. रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
  12. रक्षण करणारा – रक्षक
  13. रात्रीचा पहारेकरी – जागल्या
  14. राज्यातील लोक – प्रजाजन ,रयत ,प्रजा
  15. रोग्यांची सुश्रुषा करणारी – परिचारिका
  16. लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
  17. लढण्याची विद्या – युद्धकला
  18. लाखो रुपयांचा धनी – लक्षाधीश
  19. लिहिता वाचता येणारा – साक्षर
  20. लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
  21. लोकांचा आवडता – लोकप्रिय
  22. लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
  23. लोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक
  24. वनात राहणारे प्राणी – वनचर
  25. अरण्याचा राजा – वनराज
  26. अरण्याची शोभा – वनश्री
  27. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित
  28. अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
  29. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
  30. आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र
  31. इनाम म्हणून वंशपरंपरगत मिळालेली जमीन – वतन
  32. ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
  33. ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
  34. उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
  35. ऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधीर
  36. भाषण ऐकणारे – श्रोते
  37. अंग राखून काम करणारा – अंगचोर
  38. कथा सांगणारा – कथेकरी
  39. कथा (गोष्ट) लिहिणारा – कथाकार ,कथालेखक
  40. कल्पना नसताना आलेले संकट – घाला
  41. कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
  42. कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
  43. कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
  44. कष्ट करून जगणारा – कष्टकरी
  45. श्रमांवर जगणारा – श्रमजीवी
  46. कविता करणारा /रचणारा – कवी
  47. गाणे गाणारा – गायक
  48. ज्याला लाज लाज नाही असा – निर्लज्ज
  49. कविता करणारी – कवयित्री
  50. कमी आयुष्य असलेला – अल्पायू / अल्पायुषी
  51. कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी ,क्षणभंगुर
  52. कादंबऱ्या लिहिणारा / लिहिणारी – कादंबरीकार
  53. किल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट
  54. कुस्ती खेळण्याची जागा – हौद ,आखाडा
  55. केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
  56. केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
  57. कैदी ठेवण्याची जागा – कारागृह ,बंदिशाळा,तुरुंग
  58. खूप दानधर्म करणारा – दानशूर
  59. खूप आयुष्य असलेला – दीर्घायू ,दीर्घायुषी
  60. खूप मोठा विस्तार असलेला – ऐसपैस , विस्तीर्ण
  61. खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
  62. गाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास
  63. गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ
  64. घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
  65. घोडे बांधायची जागा – पागा ,तबेला
  66. चरित्र लिहिणारा – चरित्रकार
  67. चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चवाठा
  68. अनेकांमधून निवडलेले – निवडक
  69. चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष , शुक्लपक्ष
  70. चित्रे काढणारा – चित्रकार
  71. जमिनीखालील गुप्त मार्ग – भुयार
  72. जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
  73. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी –   उभयचर
  74. जमिनीचे दान – भूदान
  75. जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
  76. ज्याला आईवडील नाहीत असा – पोरका , अनाथ
  77. ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि ,चक्रधर
  78. ज्याला मरण नाही असा – अमर
  79. ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
  80. दररोज प्रसिद्ध होणारे –दैनिक
  81. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
  82. दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
  83. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे – मासिक
  84. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
  85. दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
  86. दर वर्षाला ,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे – वार्षिक
  87. दररोजचा ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
  88. दारावरील पहारेकरी – द्वारपाल , दरवान
  89. दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
  90. दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
  91. स्वतःवर  अवलंबून असलेला  -  स्वावलंबी
  92. दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम
  93. देशाची सेवा करणारा – देशसेवक
  94. देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
  95. दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
  96. धान्य साठवण्याची जागा – कोठार
  97. नदीची सुरुवात होते ती जागा – उगम
  98. नाटक लिहिणारा – नाटककार
  99. होडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक
  100. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता
  101. नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
  102. पहाटेपूर्वीची वेळ – उषःकाल
  103. पाऊस मुळीच न पडणे – अवर्षण,अनावृष्टी
  104. पायापासून डोक्यापर्यंत – अपादमस्तक
  105. पायात जोडे न घातलेला – अनवाणी
  106. पाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक
  107. पायी जाणारा – पादचारी
  108. पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
  109. पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
  110. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक – पूरग्रस्त
  111. पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व
  112. प्रेरणा देणारा – प्रेरक
  113. फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त ,अन्नछत्र
  114. विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
  115. बसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
  116. बातमी सांगणारा /सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका
  117. बातमी आणून देणारा /देणारी – वार्ताहर
  118. भाषण करणारा – वक्ता
  119. मन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर ,चित्ताकर्षक
  120. मालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गोदाम ,कोठार ,वखार
  121. माकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी
  122. मासे पकडणारा – कोळी
  123. मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
  124. मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
  125. मूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक
  126. मोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य
  127. श्रेष्ठ (महान)ऋषी – महर्षी
  128. डोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन
  129. वाडवडिलांकडून मिळालेली – वडिलोपार्जित
  130. विमान चालवणारा – वैमानिक
  131. व्याख्यान देणारा – व्याख्याता
  132. शत्रूकडील बातमी काढणारा – हेर
  133. शत्रूला सामील झालेला – फितूर
  134. शिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण
  135. शेती करतो तो – शेतकरी
  136. शोध लावणारा – संशोधक
  137. सतत काम करणारा – दीर्घोद्योगी
  138. सतत निंदानालस्ती करणारा – निंदक
  139. समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
  140. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
  141. सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
  142. संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
  143. स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा –   
  144. सांगकाम्या
  145. सिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथालेखक
  146. सुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप
  147. स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
  148. स्वतः संपादन केलेली – स्वार्जित , स्वसंपादित
  149. स्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
  150. स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा – स्वार्थी
  151. स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
  152. स्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वभिमानशून्य
  153. दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार, दिलदार
  154. स्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी
  155. स्तुती गाणारा – भाट
  156. हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
  157. हरिणासारखे डोळे असणारी –मृगाक्षी ,हरिणाक्षी,मृगनयना,कुरंगनयना
  158. हिंडून करायचा पहारा – गस्त
  159.  हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल