WISE SAYINGS (सुप्रसिद्ध म्हणी)
1. Actions speak louder than words.
उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ.
2. After clouds comes clear weather OR After a storm comes calm.
दुःखानंतर सुखाचे आगमन होते.
3. Ask and it shall be given to you.
दार ठोठावल्याशिवाय ते
उघडणार नाही.
4. All that glitters is not gold.
चकाकणारे सर्व सोनेच असते
असे नाही.
5. All work and no play makes Jack a dull boy.
विश्रांती न घेता काम केल्यास काम करणारा व त्याचे काम दोघांचेही
नुकसान होते.
6. All is well that ends well.
ज्याचा शेवट गोड ते सारेच
गोड.
7. An apple a day keeps the doctor away.
दररोज खावे एक सफरचंद, होतील दवाखान्याचे मार्ग बंद.
8. An empty vessel makes much noise.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
9. Anger of a friend is better than a fool's smile.
मूर्खाच्या हास्यापेक्षा मित्राचा राग बरा.
10. As you make the bed, so you must lie in it.
करावे तसे भरावे. किंवा करणी तशी भरणी. किंवा जशी कृती तसे फळ.
11. As the king, so are the subjects.
यथा राजा, तथा प्रजा.
12. As you sow, so shall you reap,
पेरावे तसे उगवते.
13. As a man lives so shall he die.
करावे तसे भरावे.
14. Appearances are often deceptive.
दिसते तसे नसते.
15. A bad workman quarrels with his tools.
नाचता येईना अंगण वाकडे, किंवा स्वंयपाक येईना ओली
लाकडे.
16. A bad news travels fast.
वाईट गोष्टींचा प्रसार जलद
होतो.
17. A barking dog never bites.
गर्जेल तो बरसेल काय ?
18. Beauty is only skin deep.
सौंदर्यापेक्षा चारित्र्य
श्रेष्ठ.
19. Beggars are not choosers.
मागणा-याला पसंतीची सवलत नसते.
20. Better be alone than in ill company.
वाईट संगतीपेक्षा एकटं असणं
परवडलं.
21. Better late than never.
उशीरा का होईना एखादे काम
करणे बरे.
22. Birds of the same feather flock together.
एकाच माळेचे मणी एकत्र राहतात.
23. A bird in hand is worth two in the bush.
हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे धावू नये.
24. Blood is thicker than water.
कातड्यापेक्षा आतड्याची ओढ
अधिक असते.
25. Bones for late comers.
हाजीर तो वजीर.
26. Character is the best ornament.
चारित्र्य हाच सर्वश्रेष्ठ
दागिना.
27. Charity begins at home.
उदारपणाची सुरूवात घरातूनच
होते.
28. A chip of the block.
बाप तसा बेटा.
29. The child is father of the man.
मुलाचे पाय पाळण्यात
दिसतात.
30. Cleanliness is next to Godliness.
स्वच्छता करणे म्हणजे
देवाची सेवा केल्याप्रमाणे.
31. A closed mouth catches no fly.
मागितल्याशिवाय कधीही मिळत
नाही.
32. Contenment is happiness.
संतोष हेच परमसुख.
33. Contenment is real wealth.
समाधान हीच खरी संपत्ती.
34. Courtsey costs nothing.
चांगलं वागायला पैसे मोजावे
लागत नाहीत
35. Cowards die many a time before their death.
भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
36. Cut your coat according to your cloth.
अंथरूण पाहून पाय पसरावे.
37. Do in Rome as the Romans do.
देश तसा वेष असावा.
38. Don't put all eggs in one basket.
एकाच गोष्टीवर विसंबून राहू
नये.
39. Don't count your chickens before they are hatched.
खिरीच्या अगोदर मचमच काय उपयोगाची ?
40. Don't cross the bridge until you come to it.
चिंता करीत बसू नका.
41. A drowning man catches at a straw.
बुडत्याला काडीचा आधार.
42. The early bird catches the worm.
हाजीर तो वजीर.
43. Easier said than done.
बोलणे सोपे करणे कठीण.
44. An empty mind is the devil's workshop.
निरूद्योगी माणसाला नसत्या उचापती सुचतात. रिकामा न्हावी भिंतीला
तुंबड्या लावी.
45. Eat to live, do not live to eat.
जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका.
46. Empty words break no bone.
क्रियेविना वाचाळता व्यर्थ
आहे.
47. To err is human, to forgive divine.
चुकणे हा मनुष्यधर्म आहे तर
क्षमा करणे हा दैवी गुण आहे.
48. Every cloud has a silver lining.
रात्रीच्या गर्भात उद्याचा
असे उषःकाल.
49. Every dog has his days.
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
50. Every house has its skeleton.
घरोघरी मातीच्या चुली.
51. Everyone knows best where the shoe pinches.
आपली अडचण काय आहे हे ज्याचे त्यालाच चांगले समजते.
52. Example is better than precept.
केवळ उपदेशापेक्षा कृती
अधिक महत्त्वाची.
53. Experience is the best teacher.
अनुभव हाच सर्वश्रेष्ठ गुरु
होय.
54. Familiarity breeds contempt.
अतिपरिचयात् अवज्ञा.
55. Failure is the stepping stone to success.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
56. A figure among ciphers.
वासरात लंगडी गाय शहाणी.
57. Fine feathers make fine birds.
खाण तशी माती.
58. First come first served.
हाजीर तो वजीर.
59. To forget a wrong is the best revenge.
अन्यायाचा विसर पडणे हाच बदला घेण्याचा उत्तम मार्ग होय.
60. Fortune favours the brave.
साहसाच्या घरी लक्ष्मी पाणी
भरी.
61. A friend's frown is better than a fools smile.
मूर्खाच्या हास्यापेक्षा मित्राचा राग परवडला.
62. A friend in need is a friend indeed.
अडचणीच्या वेळी मदत करतो
तोच खरा मित्र.
63. Give everyone his due.
ज्याचे त्याला श्रेय
द्यावे.
64. God helps those who help themselves.
स्वावलंबी लोकांना देव मदत
करतो.
65. A good appetite needs no sauce.
भुकेला कोंडासुद्धा चालतो.
66. Good wine needs no bush.
चांगल्या गोष्टीची जाहिरात
करण्याची गरज नसते.
67. Great profits, great risks.
मोठा फायदा मोठी जोखीम.
68. Great talkers are not great doers.
बडबडणारे कृती करतीलच असे नाही.
69. Handsome is that handsome does.
ज्याची कृती सुंदर तो
सुंदर.
70. Haste makes waste.
अति घाई संकटात नेई.
71. He is the richest who has fewest wants.
गरजा कमी तोच श्रीमंत.
72. Health is wealth.
आरोग्य हीच संपत्ती.
73. Honesty is the best policy,
सचोटी हा उत्तम मार्ग होय.
74. Ill got, ill spent. हपापाचा माल गपापाला.
75. It is folly to live in Rome and strive with the Pope.
पाण्यात राहून मगरीबरोबर वैर.
76. It is no use crying over spilt milk.
घडून गेलेल्या गोष्टीवर शोक
करण्यात काहीच अर्थ नाही.
77. It never rains, but it pours.
संकटे ही एकटीदुकटी येत
नसतात.
78. It takes two to make a quarrel.
एका हाताने टाळी वाजत नाही.
79. Jack of all trades and master of none.
एक ना धड भाराभर चिंध्या.
80. Kill two birds with one stone.
एका दगडात दोन पक्षी.
81. Kind words are worth much and cost little.
गोड बोलायला काय जातं?
82. Knowledge is power.
ज्ञान म्हणजेच सामर्थ्य.
83. Least said soonest mended.
जास्त बोलल्याने माणूस
कोडगा बनतो.
84. Let bygones be bygones.
झालं गेलं विसरून जा.
85. Listen to many but obey your conscience.
ऐकावे जनाचे करावे मनाचे,
86. Little things please little minds.
कोल्हा काकडीला राजी.
87. Love conquers all.
प्रेमाने जग जिंकता येते.
88. Love is blind.
प्रेम आंधळं असतं,
89. Lovers think others are blind.
प्रेमवीरांना इतर आंधळेच
वाटतात.
90. Look before you leap.
पूर्ण विचार करून कृती
करावी.
91. Make hay while the sun shines.
मिळालेल्या संधीचा चांगला
उपयोग करून घ्यावा.
92. Man is the architect of his destiny.
माणूस स्वतःच्या नशिबाचा
शिल्पकार असतो.
93. Man proposes, God disposes.
माणूस योजतो एक आणि देव
करतो भलतेच.
94. Many a little makes a mickle.
थेंबे थेंबे तळे साचे.
95. Might is right.
बळी तो कान पिळी.
96. Money is not everything.
पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे.
97. Money makes the mare go.
दाम करी काम.
98. Mother is the first and the best teacher.
आई हा पहिला आणि सर्वात चांगला गुरू आहे.
99. Necessity is the mother of invention.
गरज ही शोधाची जननी असते.
100. Never a rose without thorns.
काट्याविना गुलाब नाही.
101. Never put off till tomorrow what you can do today.
आजचे काम उद्यावर टाकू नका.
102. Nothing succeeds like success.
यशासारखं दुसरं काही नाही.
103. No pains, no gains.
कष्टाविना फळ नाही.
104. No time like the present.
आज नाही तर कधीही नाही.
105. Old wine in a new bottle.
जुनीच गोष्ट नव्याने
मांडणे.
106. One good turn deserves another.
उपकाराची फेड उपकाराने करावी.
107. One man's fault is another man's lesson.
पुढच्याला ठेच,
मागचा शहाणा.
108. Out of sight, out of mind.
दृष्टीआड ते सृष्टीआड.
109. The pen is mightier than the sword.
लेखणी तलवारीपेक्षा धारदार
असते.
110. Penny penny makes money.
थेंबे थेंबे तळे साचे.
111. Practice makes a man perfect.
सरावाने परिपूर्णता येते.
112. Prevention is better than cure.
अगोदरच काळजी घ्यावी. प्रतिबंध हाच इलाज.
113. Rome was not built in a day.
महत्त्वाची कार्ये तडकाफडकी
होत नसतात.
114. Service to man is service to God.
मानव सेवा हीच खरी ईश्वर
सेवा.
115. Seeing is believing.
हातच्या काकणाला आरसा कशाला
?
116. Simple living and high thinking
साधी राहणी आणि उच्च
विचारसरणी.
117. Slow and steady wins the race.
धीमेपणाने केलेले काम
यशस्वी होते.
118. Spare the rod and spoil the child.
छडी लागे छम् छम् विद्या
येई घम् घम्.
119. Still water runs deep.
न बोलणाऱ्याच्या मनाचा थांग
लागत नाही.
120. A stitch in time saves nine.
वेळीच काळजी घेतली तर पुढचे
संकट टळते.
121. Success comes to those who dare and act.
धाडस आणि कृती करणा-यांनाच यश प्राप्त होते.
122. There is many a lip between the cup and the lip.
हातातले तोंडात पडेलच असे नाही.
123. Time and tide wait for none.
काळ व निसर्ग कोणासाठी
थांबत नाही.
124. Too many cooks spoil the broth.
अनेकांनी केली शेती, मोत्याऐवजी पिकली माती.
125. Train a tree when it is young.
लहाणपणीच संस्कार करायला हवेत.
126. Truth will come out.
सत्य कधी ना कधी बाहेर
पडते.
127. Union is strength.
एकी हेच बळ,
128. Walls have ears.
भिंतीला कान असतात.
129. Well begun is half done.
चांगली सुरुवात म्हणजे
अर्धे काम झाल्यात जमा.
130. What is done cannot be undone.
एकदा जे घडले ते घडले.
131. When poverty comes at the door, love flies out of the window.
घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात.
132. Where there is a will, there is a way.
इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
133. A will will find a way.
इच्छा असेल तर मार्ग दिसेल.
134. A wonder lasts for nine days.
नव्याचे नऊ दिवस.
135. A word is enough for the wise.
शहाण्याला शब्दाचा मार.
136. You scratch my back, I will scratch yours.
एकमेका सहाय्य करू,
अवघे धरू सुपंथ.
No comments:
Post a Comment