Saturday, August 9, 2025

Idioms (वाक्प्रचार)

 Idioms (वाक्प्रचार)

 










Idioms सामान्यतः संदिग्ध असतात. त्यांचे शब्दशः भाषांतर करता येत नाही. त्याचा गूढार्थ समजावून घ्यावा लागतो. Phrases या Idioms सारख्या संदिग्ध नसतात. दोन्हीही phrases idioms भाषेच्या सौंदर्यात भर घालण्यात उपयुक्त ठरतात. काही महत्त्वाच्या Idioms पुढीलप्रमाणेः

 

उदा.

 

1) Problem child = समस्याप्रधान मूल

2) Facts and figures = सर्व तपशील

3) To give someone a hand = मदत करणे

4) Take a seat = खाली बसणे

5) A tall tale = अविश्वसनीय गोष्ट

6) From the bottom of one's heart = मनापासून

7) To appear on the scene = आगमन होणे

8) The peace of grave = युद्धानंतरची शांतता

9) For its own sake = स्वतःसाठी

10) To kill two birds in one stroke = एका दगडात दोन पक्षी मारणे

वरील idioms चा विचार केला असता असे लक्षात येते की idioms हा भाषेचा एक अविभाज्य घटक आहे. खालील idioms व त्यांची उदाहरणे पाहा.

 

Idioms and their meaning

1. All in all = प्रत्येक बाबतीत

2. All and sundry = प्रत्येकजण

3. To appear on the scene = आगमन होणे

4. The apple of one's eye = अतिशय प्रिय व्यक्ती

5. An early bird = लवकर उठणारी व्यक्ती

6. At arm's length = सुरक्षित अंतरावर (चार हात दूर) ठेवणे

7. At a snail's pace = अतिशय मंदगतीने

8. Bad blood = कटु भावना

9. To be all ears = ऐकण्यास उत्सुक असणे (कान एकवटणे)

10. To be at sixes and sevens = गोंधळलेल्या अवस्थेत असणे

11. To be meat and drink = खूप आनंददायी

12. To blot out = लपवणे

13. A bed of roses = सुखशय्या, आरामदायी स्थिती

14. To be waited on hand and foot = एखाद्या व्यक्तीकडून सेवा घडणे

15. In black and white = लिखित स्थितीत

17. Born with a silver spoon in one's mouth = श्रीमंताच्या घरी जन्मणे

18. To break one's heart = दुःख देणे

19. Bread and butter = चरितार्थाचे साधन

20. To build castles in the air = मनोराज्य करणे

21. A burning topic = ज्वलंत प्रश्न/मुद्दा

22. To burn one's fingers = अडचणीत येणे

23. By hook or by crook = येनकेन प्रकारे

24. A child of light = सकारात्मक गुण असलेले मूल

25. Chicken - hearted = coward भ्याड/भित्रा

26. Child's play = very easy डाव्या हाताचा मळ, अगदी सोपी गोष्ट

27. To come off with flying colours = विजयी होणे

28.To come to light = प्रकाशात येणे

29. To come to the point = मुद्दयावर / निर्णयावर येणे

30. to count one's chickens before they are hatched = खिरीच्या आधी मचमच करणे

31. Crocodile's tears = नक्राश्रू

32. To cry over spilt milk = घडून गेलेल्या गोष्टीवर आकांडतांडव करणे

33. To cut a sorry figure = खराब प्रतिमा निर्माण करणे

34. To cut one's coat according to one's cloth = अंथरूण पाहून पाय पसरणे

35.Dark horse = छुपा आव्हानवीर

36.Dog cheap = अतिशय स्वस्त

37. A dog's life = चिंताग्रस्त जीवन

38. Eagle eyed = सूक्ष्म नजरेने पाहणारी /चिकित्सक व्यक्ती

39. To enjoy a cat nap = छोट्या डुलकीचा आनंद घेणे

40. Every now and then = वारवार

41.To fall victim to = बळी पडणे

42.Far and wide = दूरवर

43. Figure something out = विचाराने निर्णय घेणे

44. Find fault with = दोष शोधणे

45. A fools' paradise = मूर्खाचे नंदनवन

46. From the bottom of one's heart = मनापासून

47. To get cracking = कष्ट करण्यास सुरूवात करणे

48. Get into a bad scrape = अडचणीत येणे

49. To get into the mess = अति समस्याग्रस्त होणे

50. To give ear to = लक्षपूर्वक ऐकणे

51. To go to the dogs = सर्वनाश होणे

52. To go the way of all flesh = मरण पावणे

53. A hard nut to crack = सोडविण्यास कठीण समस्या

54. To have a fling at = खडा टाकून पाहणे / प्रयत्न करणे

55. Herculean task = खूप प्रयत्न लागणारे अवघड काम

56. In the nick of time = योग्यवेळी

57. Ins and outs = पूर्ण माहिती

58. In vain = व्यर्थ

59. Jump to a conclusion = घाईघाईत निर्णय घेणे

60. To keep one's eye on = च्यावर नजर ठेवणे

61. Kith and kin = सगेसोयरे

62. To knit one's brow = नापंसती दर्शविणे

63. Laughing stock = चेष्टेचा विषय

64. To lead a cat-and-dog life = सतत भांडत रहाणे

65. To leave no stone unturned = सर्व त-हेचे प्रयत्न करणे

66. Lion hearted = मोठ्या मनाची व्यक्ती

67. A lion in the path = मोठा अडथळा

68. A lion's share = सर्वात मोठा हिस्सा

69. To look before you leap = विचारपूर्वक निर्णय घेणे

70. To look at the bright side = चांगली बाजू पहाणे

71. To lose one's calm = रागावणे

72. To make monkey out of someone = मूर्ख बनवणे

73. To make someone one's ape = एखाद्यास मूर्ख बनवणे

74. To make the best of = प्रतिकूल परिस्थिती जास्तीत जास्त आनंदी बनवणे

75. To make up one's mind = एखादी गोष्ट करण्याचे ठरवणे

76. Monkey business = खोडकर वर्तन असणे

77. Not to have a dog's chance = थोडीसुद्धा संधी नसणे

78. Now and then = अधून मधून

79. On both counts = दोन्ही बाजूने

80. On the verge of = च्या बेतात असणे

81. On shank's mare = पायी जाणे

82. Part and parcel = अविभाज्य घटक

83.To pick up threads = एखाद्या घटनेचे धागेदोरे जुळवणे

84.To put heads together = एकत्र येवून विचारविनिमय करणे

85. To rain cats and dogs =

86. To read between the lines = छुपा अर्थ शोधणे

87. To send shivers down one's spine = थरकाप उडवणे

88. To serve as an excuse = सबब म्हणून उपयोगी पडणे

89. To smell a rat = काहीतरी चुकीचे घडत असल्याची शंका घेणे

90. To snack one's lips = आनंद व्यक्त करण्यासाठी ओठांची उघडझाप करणे

91. A snake in the grass = मित्र असल्याचा बहाणा करणारी जुलमी व्यक्ती

92. To strain every nerve = निकराचा प्रयत्न करणे

93. To take the bull by the horns = संकटाचा धैर्याने सामना करणे

94. To talk rubbish = अर्थशून्य बडबड करणे

95. To and fro = इकडून तिकडे

96. Tooth and nail = सर्व ताकद एकवटणे

97.To treat one with kid gloves = एखाद्याला अतिशय प्रेमाने /दयाळूपणे वागवणे

98. Ups and downs = अडथळे,चढ उतार

99. To throw dust in one's eyes = एखाद्याच्या डोळ्यात धूळ फेकणे, फसवणे

100. To turn over a new leaf = नवीन पान पलटणे, मागील वागणुकीत सुधारणा करणे

101. Up to the mark = ठराविक दर्जाचा

102. Walking on air = हवेत तरंगणे इतके आनंदी होणे की जीवनातील प्रत्येक गोष्ट चांगली वाटू लागावी

 

 

 

 


No comments:

Post a Comment