इयत्ता दुसरी व इयत्ता तिसरी पाठ्यपुस्तकातील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
दंग होणे - गुंग होणे, मग्न होणे
उगम होणे-सुरुवात होणे, आरंभ होणे
छंद असणे- आवड असणे
सुखावणे- आनंद होणे
अलगद उचलणे -हळुवार उचलणे
मुग्ध होणे - गुंग होणे, लुब्ध होणे
संकल्प करणे-निश्चय करणे, पक्के करणे
भेट होणे-भेटायला जाणे
स्वागत करणे -सन्मानाने
बोलावणे
अभिनंदन करणे-कौतुक करणे
पार पडणे-नीट पूर्ण करणे
ओळख करुन देणे-परिचय करुन
देणे
मन लावून ऐकणे-लक्षपूर्वक
ऐकणे
पोट धरुन हसणे-मनमुराद हसणे, खूप हसणे
छंद लागणे-आवड निर्माण होणे
नजरेत येणे-लक्षात येणे
प्रोत्साहन मिळणे-उत्तेजन
मिळणे
बिल थकणे-पैसे देता न येणे
त्याग करणे-सर्व सोडून देणे
वंदन करणे- नमन करणे, नमस्कार करणे
करुणा करणे-दया दाखविणे
कुजबुजणे-हळू बोलणे
सामसूम होणे-शांतता पसरणे
सफल होणे-यशस्वी होणे
फस्त करणे-खाऊन संपवणे
आश्चर्य वाटणे-नवल वाटणे
कपाळावर हात मारणे-निराश
होणे, हताश होणे
काबाडकष्ट करणे-खूप मेहनत
करणे
जीव तुटणे-प्राण कळवळणे
तडाखा देणे-मार देणे
पळ काढणे-पळून जाणे
झिम्मड उडणे-गर्दी उसळणे
पायावर डोके ठेवणे- नमस्कार
करणे
पसार होणे- जागेवरुन निघुन
जाणे, पळ काढणे.
दंड भोगणे-शिक्षा भोगणे
घाम गाळणे-कष्ट करणे
भान सुटणे-लक्ष विचलीत होणे, जाणीव नसो
निरोप घेणे-निघून जाणे
पार करणे-पलिकडे जाणे
थक्क होणे-आश्चर्यचकित होणे
आभार मानणे-कृतज्ञता व्यक्त
होणे
भारावून जाणे-प्रभावित होणे
गलका करणे-आरडा ओरडा करणे
थंडीने काकडणे-थंडीमुळे अंग
कापणे
थरकाप उडणे-भीतीने अंग
थरथरणे
आरोप करणे-आळ घेणे, तक्रार करणे
कमी लेखणे-कमी महत्त्व देणे
मनाला लागणे-वाईट वाटणे
विलंब करणे-उशीर करणे
जीव गुंतणे- मन एखाद्या
गोष्टीत अडकून राहणे
धुंडाळणे- शोध घेणे
वाया जाणे- व्यर्थ जाणे, फुकट जाणे
कुरकुरणे- तक्रार करणे
चेहरा उतरणे- नाराज होणे, वाईट वाटणे
पालन पोषण करणे-संगोपन करणे
आडवे होणे-झोपणे
नियंत्रण ठेवणे-ताबा असणे
झडप घालणे-पकडण्यासाठी उडी
घेणे
आकाश ठेंगणे वाटणे- खूप
आनंद होणे
घाबरगुंडी उडणे-खूप घाबरणे
विचारपूस करणे-चौकशी करणे
संमती दर्शविणे-मान्यता
देणे
घाम गाळणे-कष्ट करणे
पिंगा घालण-फेर धरुन नाचणे, गोल फिरणे
धूम ठोकणे-वेगाने धावणे
शरण येणे-आश्रय मागणे
दृष्टिस पडणे-दिसणे
गळा भरुन येणे-रडायला येणे
कुरवाळणे-प्रेमाने हात
फिरवणे
उधळणे-बेफाम होऊन पळणे
गोडी लावणे-आवड निर्माण करणे
रडू येणे-डोळ्यात पाणी येणे
स्वार होणे-वर बसणे
हिरमुसणे-दुःखी होणे
भानावर येणे-शुद्धिवर येणे, सावध होणे, शांत स्थितीत येणे
घर चालवणे-पोट भरणे
आराम करणे-विश्रांती घेणे
कौतुक करणे-शाबासकी देणे
डोळे पाणावणे-वाईट वाटणे
पाळत ठेवणे-लक्ष ठेवणे
पाठलाग करणे- मागे मागे
जाणे
दंगा करणे-गोंधळ करणे
झोपमोड करणे-जाग येणे
छाती काढणे- हिम्मत दाखवणे
राम नसणे- अर्थ नसणे
हस्तगत करणे-ताब्यात घेणे
तल्लीन होणे-भान हरपणे
बळजबरी करणे-सक्ती करणे
भेदरुन जाणे-घाबरणे
धूम पळणे-जोरात पळणे
काटकसर करणे- बचत करणे
कष्टाचे खाणे-कष्ट करुन पोट
भरणे
हुरहुर लागणे- काळजीने
अस्वस्थ होणे
शीण निघून जाणे- थकवा निघून
जाणे
वैतागून जाणे- त्रासणे
डाव उलटणे- हार मानणे
फज्जा उडणे- फजिती होणे
धमाल करणे-गमतीजमती करणे
कानी न पडणे- ऐकू न येणे
माया करणे -प्रेम करणे
डोळा लागणे- झोप लागणे
तोंडसुख घेणे -भांडणे
पाय काढणे- निघून जाणे
टंगळमंगळ करणे- टाळाटाळ
करणे
आहुती देणे- प्राण देणे
तारीफ करणे -कौतुक करणे
मनाई करणे -बंदी असणे
रक्षण करणे -सांभाळ करणे
मोलमजुरी करणे -कष्ट करणे
रणशिंग फुंकणे- सुरुवात
करणे
लाभ होणे फायदा होणे
वाया जाणे- नुकसान होणे
भाग पाडणे-एखादी गोष्ट
करायला लावणे
खाली मान घालणे -
अपमानामुळे लज्जित होणे, खजिल होणे
प्राणाहून प्रिय असणे- खूप
प्रिय असणे
दोष दिसणे-दुर्गुण दिसणे
No comments:
Post a Comment