Tuesday, August 1, 2023

स्वातंत्र्य दिन मराठी भाषण ll भारत देश महान

 



                               आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज आपल्या देशाचा 76 वा  स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत.

                                  15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्र्यातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकारकांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्षे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकारकांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्यांच्या संघर्षांचा आपल्याला विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो.

                            या शुभ दिनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करतात. ही गाणी ऐकून देशभक्ती आणि राष्ट्र प्रेमाच्या भावनेने आपले हृदय भरून येते. सरकारी कार्यालयांमध्ये हा दिवस सुट्टीचा असतो परंतु तरीही सर्वच कर्मचारी आणि अधिकारी देशाच्या तिरंगी ध्वजाला मानवंदना देण्यासाठी एकत्रित येतात.

        आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यात केशरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग आहेत. केशरी रंग ,त्याग आणि शौर्याचे प्रतीक आहे. पांढरा रंग सत्य, शांती आणि पवित्रता दर्शवतो. तसेच हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक म्हणून मानला जातो. याचबरोबर तिरंग्यामध्ये एक अशोक चक्र सुद्धा आहे, ज्यात  24 आरे असतात. स्वातंत्र्यदिनी शाळा कॉलेज शासकीय आणि प्रशासकीय अशा सर्वच ठीक ठिकाणी तिरंगी ध्वज फडकवला जातो.

 याशिवाय विविध कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी स्वातंत्र्य लढ्याबद्दल लोकांना प्रबोधन करण्यासाठी भाषणे व माहिती देतात.

         देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ती आपल्या देशातील तरुण पिढीत आहे. कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य आहे.

     स्वातंत्र्यदिनी दरवर्षी नवी दिल्लीत राजपथ येथे मोठा उत्सव असतो. जिथे पंतप्रधानांनी ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गायले जाते. तसेच राष्ट्रगीतासह 21 तोफा डागून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येते आणि हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टीही करण्यात येते. सर्व सेना स्वतंत्र दिनाच्या परेडमध्ये भाग घेतात आणि आपल्या महान भारत देशाला वंदन करतात.

      आपला भारत महान का आहे? पुढच्या काही वर्षात आपण लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकणार आहोत म्हणून ? की आपल्या देशात सामाजिक समस्या, गरिबी, निरक्षरता,दहशतवाद अजूनही मोठ्या प्रमाणात आहे यामुळे ? तर नाही! आपला देश महान आहे कारण "वसुधैव कुटुंबकम" अर्थात 'संपूर्ण जग एक कुटुंब आहे ' अशी संस्कृती असणारा आपला देश आहे. " सर्वे भवन्तु सुखी नहा सर्वे संतु निरामया " ही आपल्या देशाची शिकवण आहे

.    पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत एकमेव देश आहे. एक तो दिवस होता जेव्हा 1963 मध्ये आपले पहिले रॉकेट एका सायकलीवर आणण्यात आले होते आणि आज तीच 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ' म्हणजेच 'इस्रो ' जगातल्या सर्वात यशस्वी अंतराळ संस्थांपैकी एक आहे.

 नुकतेच भारताने चंद्रयान मोहीम फत्ते केलेली आहे.

 "There is no country more diverse than India. " रंगांचा देश-  जिथे रोज एक नवीन सण असतो.आपली कला,संस्कृती,सभ्यता इतकी समृद्धशाली आहे की 5000 वर्षांपूर्वी जेव्हा जगभरात लोक उपासमारीने मरत होते तेव्हा भारतात हडप्पा आणि सिंधू सभ्यता उन्नतीच्या शिखरावर होत्या. ऋग्वेद जगातला सर्वात प्राचीन लिखित ग्रंथ आहे. भारतीय संस्कृती आणि वेदांनी हजारो वर्षांपूर्वीच बिंदू,शून्य संख्याप्रणाली, नौकानयनशास्त्र, दिनदर्शिकेपासून नृत्य, गायन, वादन आणि सर्व कलांसोबतच अध्यात्म, खगोलशास्त्र, साहित्य विज्ञान,अभियांत्रिकी,गणित,शेती व्यवसाय,वैद्यकीय विज्ञान तसेच अंतराळ विज्ञानापर्यंतचे लिखित प्रमाणित ज्ञान दिले आहे.

    विश्वातील सर्वाधिक प्राचीन शहरे भारतात आहेत. भारतातील सुवर्ण मंदिर जगभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी जात, धर्म, वर्ग, वय या गोष्टी न बघता दररोज जवळपास एक लाख लोकांना श्रद्धेने जेवण दिले जाते. असा देश जिथे जगातील सर्वाधिक अशा तीन लाखांपेक्षा जास्त मशिदी आहेत. कुंभमेळ्यात एका वेळी पंधरा कोटींपेक्षा जास्त भक्त असतात. भारतात मनाला शांती देणारे बुद्धांचे विचार आहेत. अनेकतेमध्ये एकतेची यापेक्षा सुंदर कल्पना जगात कुठेच नसेल.

    जगातले 75 टक्के वाघ भारतात आहे. त्याचबरोबर भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा नर्मदा नदीच्या लहानशा तीरावर बनवलेला जगातील सर्वात उंच पुतळा, जगातील सर्वात मोठी शाळा, सर्वात उंच क्रिकेटचे मैदान, तरंगते पोस्ट कार्यालय, जगातील सर्वात स्वस्त चार चाकी, जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल, जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन भारताची शोभा वाढवत आहेत. भारतात जेवढे लोक दररोज ट्रेनने प्रवास करतात तेवढी तर ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या आहे. जगभरात जेवढे सोने आहे त्यातले 11 टक्के भारतीय महिलांकडे आहे. जगात सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात आहेत. सर्वांना आपल्या देशात त्यांचा हक्क मिळतात. जगातील सर्वात मोठा मसाल्यांचा उत्पादक देश भारत जिथे जगातील 25% डाळींचे उत्पादन केले जाते. कित्येक मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत.

    मायक्रोप्रोसेसर, पेंटियम चीफ,ऑप्टिक फायबर,रेडिओ वायरलेस, कम्युनिकेशन तसेच जगातील सर्वात लहान सॅटेलाइट भारताने बनवली आहे


 या सर्व गोष्टी त्या देशाची देन आहेत,जिथे जात, धर्म,भाषा, बोली वेगवेगळे आहे.तरीही आहे सर्वांचा सन्मान. उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण एकच हिंदुस्तान. जगातील सर्वात जलद सुपरसोनिक मिसाईल ब्रह्मोस आणि न्यूक्लिअर ताकद असलेला देश ज्याने त्याच्या एक लाख वर्षाच्या इतिहासात कधीच कोणावर पहिला हल्ला केला नाही, तो इतिहास आहे भारत. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जिथे जगातील सर्वात मोठी तरुणाई राहते. त्या तरुणांच्या रक्तात वाहणारा लाल रंग आहे भारत. जगातील सर्वात मोठी लोकशाही जिथे देव फक्त आकाशात राहत नाहीत  तर सीमेवर राहतात, ज्यांना आपण जवान म्हणतो. जे 53 अंश सेल्सिअस थंडीत आणि 52 अंश सेल्सिअस गरमीत ही सीमेवर तैनात राहून देशाचे रक्षण करतात आणि आपल्या देशासाठी हसत हसत प्राणांचे बलिदान देतात. ते जवान हे सैनिक आहेत भारत. असा देश जिथे देशाला देव नाही तर माता- भारतमाता म्हटले जाते.

 अशा महान देशात आपण राहतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे.

 हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे 

 आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

 कर्तव्यदक्ष भूमी, सीता रघुतमाची

 रामायणे घडावी, येथे पराक्रमाची

 शिर उंच उंच व्हावे,  हिमवंत पर्वताचे

 आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे

 जय हिंद!भारत माता की जय!





Sunday, July 30, 2023

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध

 


मराठी निबंध

माझा आवडता महिना श्रावण

 ऋतुच्या चक्रांनी निसर्ग आपली विविध रूपे या सृष्टीला दाखवीत असतो. सृष्टीवर विविध बदल होणे हा कालचक्राचा नियम आहे. या कालचक्रात बारा महिन्यांचे नानाविध रंग आपणास दिसून येतात. चैत्रात वृक्षांना पालवी फुटते आणि त्या नव्या बदलाची लोकांना मोहिनी पडते, कुणाला वैशाख वनवा आवडतो कुणाला मेघ शाम आषाढ हवाहवासा वाटतो तर कोणी सोनेरी अश्विनसाठी झुरतात.

        मला मात्र हिरव्या रंगाच्या विविध छटा उधळणारा श्रावण मासच आवडतो. किती ते रंग,! कधी दाट हिरव्या रंगात रंगलेली छटा तर कधी हिरवी ते कधी पोपटी हिरव्या रंगाची सृष्टी, जिला बघून बालकवी म्हणतात,

 श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे

 क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे l

      खरंच ऊन पावसाचा हा पाठ शिवनीचा खेळ नाचरे मोर कोणाला बरे आवडणार नाहीत? आणि यावर कळस म्हणजे आकाशात सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य. ज्याला बघून कुसुमाग्रज म्हणतात,

 हसरा नाचरा

 जरासा लाजरा

सुंदर साजरा

 श्रावण आला l

 श्रावणात माणसांनाच काय पण पशुपक्ष्यांना पाना फुलांना एका नव्या हर्षाने मोहित केलेले असते. शेतातील वाऱ्यावर डोलणारी पिके पाहून शेतकरी आनंदाने नव्या भविष्यांची स्वप्न पाहत आपल्या सुखमय जीवनाची कल्पना रचताना त्या भगवान शंकराची मनोभावे पूजा करतो. श्रावणात विविध धार्मिक प्रथा पाळल्या जातात. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक वाराचे महत्त्व वेगळे मग तो सोमवार महादेवाचे आराधना करून तर मंगळवारी मंगळागौरीची पूजा मांडतात. एकीकडे निसर्ग आपले सौंदर्य बरसवत असतो. आपली कोळी बांधव श्रावणात निसर्गाचा आदर राखत प्रचंड लाटांनी खवळलेल्या सागराला नारळी पौर्णिमेला नारळ वाहून शांत करतात. बहिण भावाला राखीच्या पवित्र बंधनाने बांधून आजन्म आपल्या रक्षणाची ओवाळणी मागते, नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते.

      असा हा आनंदाची चौफेर उधळण करणारा बारा मासातील पाचवा मास श्रावण मास प्रत्येकाच्या आयुष्यात नव्या सुख स्वप्नांची नांदी घेऊन येतो. अवघी सृष्टीचे रूपच बदलून टाकतो. ज्याला पाहून नव्या उमेदीने आणि चैतन्याने उभे राहण्याची स्फूर्ती मिळते. प्रत्येक जीवाला दिलासा मिळत असतो. सर्वसृष्टी सुंदर हिरव्या गालीच्याने नटलेली दिसते, म्हणून मला हा श्रावण महिना खूप आवडतो.

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

-------------------------------------

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

-------------------------------------

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा यांसाठी उपयुक्त माहिती. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे.

           शब्द एकच मात्र त्याचे वेगवेगळे अर्थ असणे ही एक भाषेतील गंमतच म्हणावी लागेल. खालील शब्द व त्याचे भिन्न अर्थ समजून घ्या व वाक्यरचनेनुसार शब्दांचे योग्य अर्थ लावा.

-------------------------------------

 शब्द  - वेगवेगळे अर्थ

-------------------------------------

अनंत - अमर्याद,परमेश्वर

अभंग-  न भंगलेला,काव्यरचनेचा एक प्रकार

आस - इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा

अक्षर - पूर्ण उच्चाराचा वर्ण, अविनाशी

अंग - शरीर,भाग,बाजू.

कर - हात,किरण,एक क्रियापद

कसर - सूट,कमीपणा,एक किडा

कोळी - मासे पकडणारा,जाळे विणणारा किडा

काळ - मृत्यू, वेळ

कर्ण - कान, महाभारतातील योद्धा,त्रिकोणातील काटकोना समोरील बाजू

काप - तुकडा, कंप

खडा - उभा, लहानसा दगड

खोड  - मस्ती,झाडाचा बुंधा

गुण  - चांगल्या सवयी, दोरी

घाट - नदीवर बांधलेल्या पायऱ्या, डोंगरातील रस्ता

चिरंजीव - मुलगा,दीर्घायुषी

जलद - ढग,त्वरेने

जीव  - प्राणी,प्राण

तीर - नदीचा काठ, बाण

अंतर - लांबी,मन,भेद

ओढा - मनाचा कल,पाण्याचा लहान ओघ

अर्थ - पैसा,आशय

अंक - मांडी,आकडा(संख्या)

अंबर - आकाश,वस्त्र

काच - जाच,पारदर्शक पदार्थ

काम - इच्छा, कर्तव्य

कोरडा - सुका,चाबकाचा फटकारा

कळ - भांडणाचे कारण, गुप्त किल्ली, वेदना

खोड - सवय, झाडाचा बुंधा

खल - दुष्ट , कुटण्याचे  साधन

गदा - संकट, शस्त्र

गंध - वास,कपाळावरील टिळा

चपला - वीज, वाहाणा

जीवन -  आयुष्य,पाणी

जागा -  ठिकाण,जागृत

डाव -  कारस्थान,कपट,खेळी

तळी-  तलाव,ताम्हण

तट - कडा,किनारा,किल्ल्याची भिंत

दल - पाकळी, संघटना 

ध्यान - मनन,चिंतन, भोळसट व्यक्ती

नाव  - होडी,कशाचेही नाव

पात्र - भांडे, नदीचे पात्र, नाटकातील पात्र

पार - झाडाच्या भोवतालची जागा, पलीकडे

पत्र - चिठ्ठी,पान

पक्ष - भाग,श्राद्ध,बाजू,राजकीय संघटना

पट - वस्त्र, कुस्तीतला एक डाव

भेट - भेटणे,नजराणा

माया - धन,ममता

मान - शरीराचा एक भाग, मोठेपणा

वर - श्रेष्ठ,पती,आशीर्वाद

वाणी -  वाचा, व्यापारी

वल्ली - स्वच्छंदी,व्यक्ती,वेल

वाली - वानराचे नाव,रक्षणकर्ता

शिळा - जुना, मोठा दगड

सूत्र - दोरी,धोरण

सूत - धागा, सारथी

किताब - पदवी,पुस्तक

हवा - वारा,पाहिजे

द्विज - पक्षी,ब्राह्मण

दंड - शरीराचा भाग,शिक्षा, काठी

धड - अखंड, माने खालील शरीराचा भाग

नाद-  छंद,आवाज

पूर - पाण्याचा पूर, नगर

नाग - सापाची जात,हत्ती

पय - पाणी, दूध

पर - परका,पीस, परंतु

भाव - भक्ती,किंमत,भावना

माळ - फुलांची माळ,ओसाड  जमीन 

मात्रा - उपाय, औषध, गोळी

माठ - पाण्याचे भांडे,एक प्रकारची भाजी

 वजन-  तराजूचे वजन,वचक

 वात - वारा, दिव्यातील वात

 वारी - पाणी, यात्रा

 विभूती -  अंगारा, रक्षा, भस्म

 शृंग -  डोळे, शिंग, शिखर 

 सुमन -  पवित्र मन, फूल

 हार -  पराभव, फुलांचा हार

 कोट - किल्ला,अंगरखा

-------------------------------------

             धन्यवाद !

-------------------------------------


Wednesday, July 5, 2023

शिष्यवृत्ती परीक्षेच्या रकमेत वाढ आजचा शासन निर्णय



उच्च प्राथमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये करण्याबाबत... वाढ

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक:-- प्रमाशि- २०२०/प्र.क्र.३१/ एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

संदर्भ :-

दिनांक :- ०३ जुलै २०२३१)

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. एसएसजी/१३५३. दि.२.०४.१९५४ २) शासन निर्णय क्रमांक एससीएच-१०९५ (८४/९५)/माशि -८, दि. २.८.१९९५

३) शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००५/१३९/०५)/केपयो, दि. १४.०२.२००७

४) शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००९/ (९०/०९)/केपुयो, दि. २२.७.२०१०


(५) शासन निर्णय क्रमांक एफईडी- ४०१४/६४३/प्र.क्र. ४ / एसडी-५, दि. २९.६.२०१५ ६) शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र. ४ / एसडी-५, दि. १५.११.२०१६ ७) शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दि.२२.०४.२०२०

रोजीचे पत्र क्रमांक शिसमा / इ. ५ वी व इ. ८ वी / शिसंच.ए-४/१३८१

प्रस्तावना :-

राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहीत करणे हा शिष्यवृत्ती परीक्षेचा मुळ गाभा आहे. राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला विशिष्ट असा दर्जा आहे. शिष्यवृत्ती मिळविणे ही विद्यार्थ्यांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जाते. राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरीता अधिकाधिक प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने दि. २.४.१९५४ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात येते. २. शालेय शिक्षण विभागाच्या दि.०२.०८.१९९५ रोजीच्या शासन निर्णयानुसार उच्च प्राथमिक करीता ३९५४ व माध्यमिक करीता ३८१४ संच मंजुर होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. १४.०२.२००७ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिष्यवृत्तीच्या दरामध्ये व संचामध्ये वाढ करून, उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे ७९०८ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे ७६२८ इतके संच मंजूर करण्यात आले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २००९-२०१० या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीच्या दरामध्ये व संचामध्ये वाढ करण्यात आली आहे.

उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीचे १६६८३ व माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६२५८ संच मंजूर करण्यात आले आहेत.

३. सद्यस्थितीत एते के या संचानुसार उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती करीता १६६८३ संच मंजुर असून यांकरीता संचनिहाय किमान रु. २५०/- प्रतिवर्ष ते कमाल रू. १०००/- प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते. तसेच माध्यमिक शिष्यवृत्तीचे १६२५८ संच मंजुर असून यांकरीता संचनिहाय किमान रु. ३००/- ते कमाल रू. १५००/- प्रतिवर्ष एवढी शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात येते.

४. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून ३ वर्षाकरीता व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी पास झाल्यानंतरच्या वर्षापासून २ वर्षाकरीता शिष्यवृत्ती देण्यात येते. तथापि, विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम कमी असल्याने तसेच सदर शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये गेल्या १३ वर्षांच्या कालावधीमध्ये वाढ करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


१. "उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेमध्ये वाढ करून ती उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५ वी) सर्व संचांकरीता रु. ५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु. ५०००/- प्रतिवर्ष) व माध्यमिक शाळा (इयत्ता ८ वी) सर्व संचाकरीता रू. ७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु. ७५००/- प्रतिवर्ष इतकी निश्चित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. शिष्यवृत्तीचे सुधारीत दर सन २०२३-२४ पासून लागू राहातील.

३. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजना" या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल करण्यात येत नसून केवळ शिष्यवृत्तीची रक्कम वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक २२.०७.२०१० रोजीच्या शासन निर्णयाचे सहपत्र ई व एफ मध्ये नमूद संच एच (H) व संच आय ) करीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात येत आहे.

५. सदर योजनेकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यास तसेच लेखाधिकारी (लेखा), शिक्षण संचालनालय योजना, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ६. या बाबींवर होणारा खर्च त्या त्या शिष्यवृत्त्यांखाली दर्शविण्यात आलेल्या लेखाशिर्षाखाली मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०१)

माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या (०१) (०१) ग्रामीण भागातील प्रज्ञावंत

विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्ती (२२०२०३४२).


२२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२ माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या (०३) शिष्यवृत्त्या, (०३) (०२) प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना सहाय्य (२२०२०३८९). २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०२) (०१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने (उच्च माध्यमिक शाळा ) (२२०२२३१८) 间

शासन निर्णय क्रमांक: प्रमाशि- २०२० / प्र.क्र.३१/ एसडी-५


iv) २२०२, सर्वसाधारण शिक्षण, ०२, माध्यमिक शिक्षण १०७, शिष्यवृत्त्या, (०१) माध्यमिक शाळांमधील शिष्यवृत्त्या (०१) (०२) खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती. (पुर्व माध्यमिक शाळा) (२२०२०३५१)


19. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दि. १३ जून २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या


मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. ८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७०३१७०७०६२६२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Saturday, July 1, 2023

गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर आणि सोपे भाषण

 गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय सुंदर भाषण






             माननीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो,आज आपण "गुरुपौर्णिमा " साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत .त्याविषयी मी तुम्हाला काही दोन शब्द सांगत आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे,अशी मी नम्र विनंती करतो.

 " गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा,

 गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः! "

      ' आषाढ शुद्ध पौर्णिमा'  हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करतात. हाच दिवस "व्यासपौर्णिमा " म्हणूनही ओळखला जातो.कारण याच दिवशी 'व्यास ऋषींनी'  महाभारताचे लेखन केले होते.पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु ज्ञान देतात.ते ज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतात. म्हणून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

             माणूस हा सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ समजला जातो. कारण माणसाजवळ विद्या आहे.ही विद्या देण्याचे काम गुरुच करतात. आपला पहिला गुरु म्हणजे आपले आईवडील.आणि दुसरा गुरु म्हणजे शाळेतील शिक्षक. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देतात,हीच भूमिका शिक्षक शाळेत पार पाडतात. गुरु शाश्वत ज्ञान व कीर्ती देतात.

        आईच्या शब्दाप्रमाणे 'गुरु ' या शब्दालाही मर्यादा नाहीत. गुरु शिवाय तरणोपाय नाही. ज्याप्रमाणे सागराच्या गलबताला योग्य दिशा दाखवण्यासाठी होकायंत्र हवे.ते नसेल तर गलबत भरकटेल.तसेच या मायावी जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मानवास योग्य दिशा दाखवण्यासाठी गुरु हवाच नाहीतर माणूस भरकटेल. त्याचा जन्म वाया जाईल.

        संत ज्ञानेश्वर,संत कबीर यांसारख्या थोर संतांनीही आपल्या कर्तृत्वाचे श्रेय आपल्या गुरूंना दिले आहे.वाल्मिकींचा आदर्शवाद, व्यासांचा व्यवहारवाद द्रोणाचार्य यांची कर्तव्यनिष्ठा आजही गौरवली जाते.

         छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु त्यांच्या आई  जिजाऊ,सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर,लता मंगेशकर यांचे गुरु दिनानाथ मंगेशकर अशी भारतीय संस्कृतीतील गुरु शिष्य परंपरा आजही पाहायला मिळते.

       भारतीय संस्कृतीत गुरूला अतिशय महत्त्व दिले आहे गुरु म्हणजे निष्ठा,

गुरु म्हणजे श्रद्धा,

गुरु म्हणजे भक्ती, 

गुरु म्हणजे विश्वास,

गुरु म्हणजे वात्सल्य,

गुरु म्हणजे आदर्श,

गुरु म्हणजे अमर्याद ज्ञान.

हेच ज्ञान आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच गुरुऋण फेडण्याचा मार्ग आहे.

            आज पर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन!

 एवढे बोलून मी माझी भाषण संपवतो

 धन्यवाद!




*पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा *
संख्याज्ञान :
आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे
देवनागरी संख्याचिन्हे
रोमन संख्याचिन्हे
संपूर्ण स्पष्टीकरणासहित 



            








Thursday, June 29, 2023

Creative Thinking क्रिएटिव्ह थिंकिंग

 Advertisements motos and messages

 Mottos ( ब्रीदवाक्ये )

One team,one dream. - एक संघ,एक स्वप्न 

Work is worship.- श्रम हीच पूजा 

Earn and learn.- कमवा आणि शिका 

Health is wealth.- आरोग्य हीच संपत्ती 

Save Water. - पाणी वाचवा

Save earth. - पृथ्वी वाचवा 

Protect all plants. - झाडांचे रक्षण करा.

Grow plants not garbage. - झाडे वाढवा कचरा नाही.

Stop pollution. - प्रदूषण थांबवा.

Union is strength. - एकी हेच बळ 

No gain without pain. - कष्टाशिवाय फळ  नाही


Honesty is the best policy. - प्रामाणिकपणा हा सर्वोत्तम गुण आहे.

Save girls. - मुली वाचवा.

Each one teach one plant one. - प्रत्येकाने एकाला एक झाड लावायला शिकवा.

An education for life - शिक्षण म्हणजे जीवन.

My life is my message - माझे जीवन हा एक संदेश आहे.

Knowledge Is Power - ज्ञान हीच संपत्ती.

Each one plant one - प्रत्येकाने एक झाड लावा.

Protect all animals. -- सर्व प्राण्यांचे रक्षण करा.

We love books - पुस्तकांवर प्रेम करा.

Be kind to animals - प्राणीमात्रांवर जीव लावा 

Be polite - नम्रपणे वागा.

Never tell lies - खोटे बोलू नका.

Save electricity - विजेची बचत करा.

Save trees save future - झाडे वाचवा भविष्य उज्वल करा.

Live and let live - जगा आणि जगू द्या!

Books are our friends - पुस्तके आपले मित्र आहेत.

Little drop make an ocean - लहान थेंबापासून समुद्र तयार होतो.

Practice makes perfect - सरावाने सर्व शक्य होते.

TRUTH - सत्य 

Honesty - प्रामाणिकपणा 

Humanity is the real religion. - ' मानवता हाच खरा धर्म आहे.'

Haste makes waste! - अति घाई संकटात नेई.

" Satyamev Jayate !" "सत्यमेव जयते!"

  " Jay Hind ! "  - "जय हिंद!"

Education to all - सर्वांसाठी शिक्षण.

Silence is Golden - मौनं सर्वार्थ साधनंम!

 Messages - ( संदेश )

Welcome - सुस्वागतम 

Hi - हाय

Happy New Year - नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

Happy birthday - वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Merry Christmas - मेरी ख्रिसमस!

Get well soon - लवकर बरा हो.

Thank you! - आभारी आहोत!

Eat at regular time - वेळेवर जेवण करा!

Don't over eat - अति खाऊ नका.

Eat well - चांगले खा.

Wear clean clothes - चांगले कपडे घाला.

Cut our nails regularly - नखे वेळेत कापा.

Wish you all the best - तुम्हाला शुभेच्छा!

Best of luck - शुभेच्छा!

Get enough sleep - पुरेशी झोप घ्या!

Use bicycle - सायकलचा वापर करा.

Exercise everyday - नियमित व्यायाम करा!

You are welcome - आपले स्वागत आहे.

Don't worry - काळजी करू नका.

Avoid plastic bag - प्लास्टिक पिशवी टाळा.

Sound mind in a sound body - निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.

Please turn off the tap - कृपया तोटी बंद करा.

Good is gold - चांगले ते सोने.

Don't rush - गर्दी करू नका.









Thursday, January 19, 2023

Names of birds and animals and their living places

Tiger - Cave / Den

Hyena - Cave / Den

Cock - Coop

Bull, Ox - Cattle / Shade

Cow - Shade

Dog - Kennel

Dear - Grasslands

Pig - Sty

Eagle - Eyrie

Goat - Ship - Pen

Owl - Tree /Barn

Pigeon - Cote

Spider - Web

Wolf - Cave/ Den

Lion - Cave / Den

Hen - Coop

Bee - Hive

Camel - Desert

Crow - Nest

Dove - Cote

Donkey - Stable

Duck - Water

Fox - Jungle

Horse - Stable

Snail - Shell

Sparrow - Nest

Tiger- Lair

Bear - Cave/Den

Raccoon - Cave / Den

Pig - Sty

Bird - Nest

Man - House

Mouse - Hole

Parrot - Cage

Rabbit - Burrow

Snake - Hole

Ship - Pen

Monkey - Trees

Squirrel - Drey

Zebra - Zoo





Sunday, January 15, 2023

'माझी आई 'मराठी भाषण / निबंध





"स्वामी तिन्ही जगाचा,

आईविना भिकारी"

       सुवासिकता,सुंदरता आणि सु कोमलता या गुणांनी गुलाबाला मनोवेधकता प्राप्त होते.ध्रुवाची निश्चलता, निर्धारितता आणि नेत्रदीपकता त्याला अढळ स्थान मिळवून देत असते. गंगेचे पावित्र्य, परंपरा व परोपकारिता तिच्या पदरी पुण्याई बांधीत असते. आईचेही अगदी तसेच आहे.

 "आई तुझी माया आभाळाएवढी, तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी."

 आईविना मन छिन्न आहे, जीवन सुन्न आहे आणि गजांत लक्ष्मी असलेले वैभव देखील शून्य आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणतात... "स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी".

 आई एक विद्यापीठ आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे या जन्मदेपुढे कनिष्ठ आहेत.म्हणून तर जगतज्जेत्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. कुणापुढेही न वाकलेला,न झुकलेला व जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असणारा सिकंदर आई पुढे नतमस्तक झाला होता. हिंदवी स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराजांच्या जीवनात आईला सर्वश्रेष्ठ स्थान आहे.

 आई मुलाला जन्म देते.सर्वस्वी परावलंबी असणाऱ्या बाळाला नयनांचा दिवा आणि हाताचा पाळणा करून वाढवते. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करते. चार घर हिंडून भाकर तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण सुद्धा स्वतः उपाशी राहते व आपल्या लेकराला ओला-कोरडा घास भरवते. आई आपल्या बाळासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावते,हे आपल्याला इतिहासातील हिरकणीने दाखवून दिले आहे. कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून निर्जीव मूर्ती घडवतो. पण आई मात्र जिवंत गोळ्याला आकार देऊन त्याच्या कोऱ्या पाठीसारख्या संवेदनशील मनावर सुसंस्कार करते.म्हणूनच महात्मा गांधीजी म्हणत की,'एक माता शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.' आईचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच असतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ- कनिष्ठ असा भेदभाव नसतो. मातेच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणी नसतात.आईच्या महतीचे वर्णन इंद्रदेवही करू शकत नाही.

 "शब्द शोधण्यास निरोप स्वर्गात धाडले,

नाही सापडत म्हणून देवेंद्रानेही कर जोडले."

 मातेमुळे आपणास विश्वाचे दर्शन घडते.तिच्याशिवाय या जगात माझे, आपले म्हणावे असे कोणीच नाही.आईचे हृदय सागरासारखे विशाल असते. आपल्या चिमण्या पाखरांसाठी ती अपार कष्ट घेते आणि आपल्या बाळांच्या मधून एक संस्कारक्षम पिढी निर्माण करते.

      जगाच्या पाठीवर एकच न्यायाचे महान मंदिर आहे ते म्हणजे आई. जेथे मुलाचे सर्व दुर्गुण माफ होतात. म्हणूनच 'आई' या दोन अक्षरी शब्दाने संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. आईसारखे दुसरे दैवत नाही. म्हणून कुंतीपुत्र कर्णाला राधेने आपलेसे केले.देवकी पुत्र श्रीकृष्णाला यशोदेने ममता दिली व आपल्या देवत्वाची प्रचिती आणून दिली.

 आई खरंच काय असते याचे यथार्थ वर्णन करताना कवी फ. मु. शिंदे म्हणतात...

 "आई खरंच काय असते?

 लेकराची माय असते,

 वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

 लंगड्याचा पाय असते.

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही अन उरत ही नाही.

 शेवटी मी एवढेच म्हणेन....

 "रक्ताच्या नात्यापेक्षा दुधाचे नातं महान असतं.

म्हणून आई या शब्दापुढे सारं जग लहान असतं!"

धन्यवाद!




Thursday, January 12, 2023

मकर संक्रांत सणाविषयी मराठी माहिती / निबंध




 मकर संक्रांत

या सणाविषयी मराठी निबंध / मराठी माहिती


     'तिळगुळ घ्या, गोड बोला' असे म्हणून एकमेकांच्यातील भांडण, कटूता विसरण्याचा सण म्हणजे,मित्रांनो, तुमच्या लक्षात आलेच असेल. होय, तो सण म्हणजे 'मकर संक्रांत'. इंग्रजी वर्षाप्रमाणे जानेवारी महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. याच महिन्यात येणारा हा सण. सूर्य या दिवशी मकरवृत्तात प्रवेश करतो. म्हणून या सणाला 'मकर संक्रांत' हे नाव पडले. आर्यांच्या काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जात आहे.

      प्रत्येक सणामागे काही ना काही पौराणिक कथा असतातच. तशीच या सणाबाबतही कथा सांगितली जाते. संक्रांती नावाची देवी होती. तिने या दिवशी शंकासुराचा वध केला.ही देवी लांब ओठ, मोठे नाक,नऊ हात असलेली. ही देवी प्रसन्न नाही की, मंगलदायक नाही. तिचे वाहन, वस्त्र व अलंकार वेगवेगळे असतात.या वस्त्र व अलंकारांच्या माध्यमातून ती पुढे येणारे संकट सुचवत असते.ती ज्या दिशेने येते त्या ठिकाणी समृद्धी येते आणि ती जिकडे  जाते तिकडे संकट कोसळते. यावरून 'संकट येणे' या अर्थाने 'संक्रांत येणे' हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.

   या सणानिमित्त तिळगुळ देण्याची पद्धत आहे. काळी वस्त्रे  घालण्याची प्रथा आहे. यामागे विज्ञान दडलेले आहे.हा सण येतो थंडीच्या दिवसात.त्यामुळे शरीराला स्निग्ध व उष्ण पदार्थांची गरज असते.म्हणून तिळगुळ खाण्याची पद्धत आहे.काळे वस्त्र थंडीपासून रक्षण करते म्हणून काळे वस्त्र शुभ मानले आहे.

         या सणाच्या निमित्ताने आपण आपली संस्कृती जपत असतो. सुवासिनी सुगडात बोरे, हरभरा,ऊस,गहू घालून वाणवसा करतात. हळदीकुंकू समारंभ साजरा करून काहीतरी वस्तू भेट देतात.लहान मुलांचे बोरनहान करतात. या साऱ्या निमित्ताने लोक एकत्र येतात.

        दक्षिण भारतात या सणाला 'पोंगल' म्हणतात.आपण संक्रातीच्या आदल्या दिवसाला 'भोगी' म्हणतो. त्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी, लेकुरवाळी भाजी, कढी,मुगाच्या डाळीची खिचडी असा मस्त बेत करतो. संक्रातीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणतात. हा दिवस अशुभ मानतात.

     तेव्हा मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी खूप विचार करूनच या सर्व सणांची योजना केली आहे. म्हणून सण साजरा करताना जाणून घ्या आपल्या सणांचे महत्त्व.

Tuesday, January 10, 2023

प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे संस्कार कथा




 संस्कार कथा

 प्रेम द्यावे व प्रेम घ्यावे 

              महात्मा बुद्ध लोकांना उपदेश करण्यासाठी गावोगावी जात असत. एके दिवशी ते एका गावात गेले. तेथील बहुतेक सर्वच लोक भांडखोर आणि व्यसनी होते. तेथे जागोजागी दारूचे आणि जुगाराचे अड्डे होते. बुद्धांनी त्या गावात जाऊन लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " बंधूंनो वाईटाला वाईटाने उत्तर देऊ नका. त्याने काहीही साध्य होत नाही. एखादा  दुष्टपणाने वागत असेल तरी तुम्ही त्याच्याशी दुष्टपणा करू नका. कारण चिखलाने  चिखल धुतला  जात नाही. जो तुमच्याशी वाईट वागतो,त्याचेही तुम्ही भले करा. जशास तसे न वागता त्याचाही आदर करा. तेव्हाच तो मनुष्य सुधारू शकेल. "

    लोकांमध्ये बसलेला एक गुंड प्रवृत्तीचा मनुष्य बुद्धांचे भाषण ऐकत होता.त्यांचे बोलणे संपतात तो तावातवाने बोलू लागला, "अरे पाखंड्या, तू येथे कशासाठी आला आहेस? तुझी व्यर्थ बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाही."  तेव्हा बुद्ध शांतपणे म्हणाले, " तुला आणखी काही सांगायचे आहे काय? "  तेव्हा उत्तरादाखल तो अधम त्यांच्यावर थुंकला. पण बुद्ध शांतच राहिले. त्यांनी वस्त्राने आपला चेहरा पुसला व पुन्हा म्हणाले, "  तुला आणखी काही सांगायचे आहे काय? " तेव्हा तो मनुष्य म्हणाला, " तू ढोंगी, मतलबी, कावेबाज आणि खोटारडा आहेस. " तेवढ्यात दुसरा मनुष्य उभा राहिला आणि त्वेषाने म्हणाला,  " लोकांनो पाहता काय? याला मारा.हा महात्मा बुद्धांना अपशब्द बोलत आहे."

   तेव्हा महात्मा बुद्धांनी त्याला शांत केले व म्हणाले, "तू याच्यावर रागावू नकोस.कोणी आपल्याला शिवी जरी दिली तरी आपण प्रत्युत्तर देऊ नये."  नंतर ते त्या गुंडाला उद्देशून म्हणाले, "मी तुझे म्हणणे  ऐकले. आता मलाही काही सांगायचे आहे. समज तुझ्याकडे एक भाकरी आहे आणि तुला ती मला द्यायची आहे.पण मी ती घेतलीच नाही तर ती कोणाकडे राहील? " तो मनुष्य म्हणाला,"त्यात काय विशेष? ती माझ्याकडेच राहील. बुद्ध म्हणाले, " बरोबर बोललास!आतापर्यंत तू मला जेवढ्या शिव्या दिल्यास,त्या मी घेतल्याच नाहीत.म्हणून त्या तुझ्याकडेच राहिल्या आहेत. " ते ऐकून तो मनुष्य सर्दच झाला.

 दुसऱ्या दिवशी तो मनुष्य महात्मा बुद्धांना भेटण्यासाठी दुसऱ्या गावी गेला व त्यांचे पाय धरून म्हणाला, " हे महात्मन,काल मी आपला अपमान केला. त्याबद्दल मला क्षमा करा.आपण थोर आहात. " तेव्हा बुद्ध म्हणाले, "अरे अजून तू कालचा विचार करीत आहेस?  विसरून जा ते सगळे.

'प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे'  हाच खरा धर्म आहे.




Sunday, January 8, 2023

English Proverbs with Marathi meaning

In this post, we are going to learn some important English proverbs and their Marathi meaning.

-----------------------------------

Let's learn some important english proverbs with their marathi meaning.

-----------------------------

Action speak louder than wordplay

उक्तीपेक्षा  कृती श्रेष्ठ.

A bad workman quarrels with his tools.

नाचता येईना अंगण वाकडे.

The bird in hand is what two in the bush.

हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.

Drowning man catches at a straw.

बुडत्याला काडीचा आधार.

A friend in need is a friend indeed.

गरजेला हात देतो तोच खरा मित्र.

A penny saved is a penny gained.

वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा.

A rolling Stone gathers no moss.

अस्थिर मनुष्य यशस्वी होत नाही.

A stitch  in time saves nine.

वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते.

A word is enough for the wise.

शहाण्याला शब्दाचा मार.

All is fair in love and war.

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते.

All is well that ends well.

ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.

All that glitters is not gold.

जे चकाकते ते सर्व सोनेच नसते.

All work and no play makes jack a dull boy.

योग्य विश्रांती वाचून सतत काम केल्यास काम करणारा व त्याचे काम या दोघांचेही नुकसान होते.

An apple a day keeps the doctor away.

दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा.

An empty vessel makes much noise.

उथळ पाण्याला खळखळाट फार.

Barking dogs seldom bite.

भुंकणारी कुत्रे चावत नसतात.

Beggars cannot be choosers.

भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी का?

Better late than never.

कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना करणे श्रेयस्कर. 

Birds of feather flock together.

एकाच माळेचे मणी.

Blood is thicker than water.

कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते.

Bones for latecomers.

हाजीर तो वजीर.

Charity begins at home.

औदार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी.

Contentment is happiness.

संतोष हेच परमसुख.

Cut your coat according to your cloth .

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

Don't count your chickens before they are hatched.

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.

Don't cross a bridge until you come to it.

संकटे येण्यापूर्वीच त्यांची चिंता करीत बसू नका.

Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.

लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य,संपत्ती भेटे.

Every cloud has a silver lining.

संकटांच्या सागराला सुखाचा किनारा असतोच.

 किंवा

प्रत्येक काळया ढगाला सोनेरी किनार असते.

Every dog has its day.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

Every house has its skeleton.

घरोघरी मातीच्या चुली.

Example is better than precept.

प्रत्यक्ष कृती ही केवळ उक्तीपेक्षा श्रेयस्कर होय.

Experience is the best teacher.

अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय.

Familiarity breeds contempt.

अतिपरिचयात अवज्ञा.

First Come First served.

हाजीर तो वजीर.

Fortune favours the Brave.

साहसे श्री: प्रतिवसति. 

God helps those who helps themselves.

जे स्वतः कष्ट करतात, त्यांना परमेश्वर सहाय्य करतो.

Half loaf is better than none.

उपास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी.

Health is wealth.

आरोग्य हीच संपत्ती.

Honesty is the best policy.

प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण.

It is never too late to mend.

उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले.

It is no use crying over spilt milk.

गतकाळाचा शोध फुकाचा.

It never rain but it pours.

संकटे ही एकटीदुकटी  येत नसतात.

It takes two  to make a quarrel.

टाळी एका हाताने वाजत नाही.

Laugh and grow fat.

हसा आणि लठ्ठ व्हा.

Listen to people but obey your conscience.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

Little things please little minds.

कोल्हा काकडीला राजी.

Look before you leap.

पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नका.

Make hey while the sun shines.

तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या.

Man proposes  God disposes.

मनुष्य योजतो एक, देवाच्या मनात असते निराळेच.

Many hands make light work.

अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते.

Might is right.

बळी तो कान पिळी.

Money bigets money. 

पैशापाशी पैसा जातो.

Money makes the mare go.

दाम करी काम.

More haste less speed.

फार घाई कमी वेग.

Necessity is the mother of invention.

गरज ही शोधाची जननी आहे.

No pains no gains.

कष्टाशिवाय फळ नाही.

No rose without thorn.

काट्या वाचून गुलाब नाही.

No smoke without fire.

विस्तवाशिवाय धूर नाही.

One good turn deserves another.

उपकाराची फेड उपकारानेच करावी.

One swallow does not make a summer.

एखाद्या उदाहरणावरून नियम सिद्ध होत नाही.

Out of site out of mind.

दृष्टिआड सृष्टी.

Out of the frying pan, into the fire.

आगीतून फुफाट्यात.

Penny wise pound foolish.

बारीकसारीक बाबतीत काटकसर, मोठ्या बाबतीत उधळ्या.

Practice makes perfect.

सरावाने पूर्णत्व येते.

Prevention is better than cure.

उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला.

Reap as you sow.

पेरावे तसे उगवते./ करावे तसे भरावे.

Rome was not built in a day.

महत्त्वाची कार्यें तडकाफडकी होत नसतात. 

Set a thief to catch a thief.

चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

Slow and steady wins the race.

सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते.

Spare the rod and spoil the child.

छडी लागे छम छम,विद्या येई घमघम.

Strike while the iron is hot.

तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या.

The child is father of the man.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

The wearer knows where the shoe pinches.

ज्याचे जळते त्यालाच कळते.

Tit for tat.

जशास तसे.

To err is human.

चुकणे हा मनुष्यधर्म आहे.

Too many cooks spoil the broth.

पाच-पन्नास आचारी,वरणामध्ये मीठ भारी.

Truth will be out.

सत्याला वाचा फुटतेच.

Two hands are better than one.

एक से दो भले.

Union is strength.

एकी हेच बळ./ ऐक्य हेच सामर्थ्य.

When the cats away the mice will play.

मांजरीच्या अनुपस्थितीत उंदीर बिनधास्त खेळतात.


 

Thursday, January 5, 2023

मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेसाठी उपयुक्त वाक्प्रचार व त्यांचे अर्थ.  आपल्याला ही माहिती नक्की आवडेल.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :-

परवानगी मिळणे - मोकळीक मिळणे, सवलत मिळणे.

शाळा बुडवणे - शाळेला दांडी मारणे.

नवल वाटणे - आश्चर्य वाटणे.

खोडी उलटणे - आपण केलेली खोडी अंगाशी येणे.

बदला घेणे - वचपा काढणे.

निर्धार करणे - ठाम निश्चय करणे.

भूमिगत होणे - लपून राहणे.

अटक करणे - कैद करणे.

बाळकडू मिळणे - लहानपणापासून संस्कार होणे.

प्रभाव असणे - ठसा असणे, छाप पडणे.

सुगावा लागणे - माग मिळणे, पत्ता कळणे.

पाळत ठेवणे -मुद्दाम नजर ठेवणे.

दीक्षा मिळणे - संस्कार मिळणे.

अवगत होणे - माहित होणे.

सहभाग घेणे - सामील होणे.

स्थापन करणे - निर्माण करणे, स्थायी स्वरूप देणे.

धमाकावणे -धमकी देणे.

प्रोत्साहित करणे - उत्तेजन देणे.

अवलंब करणे - अंगीकारणे, स्वीकारणे.

प्रत्यय येणे - अनुभवास येणे.

प्रणांची आहुती देणे - बलिदान करणे.

अजरामर होणे - कायम स्मरणात राहणे.

अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे.

कपाळाला आठ्या घालणे - नाराजी व्यक्त करणे.

चेहरा कसनुसा होणे -अपराधी भावना होणे.

नजर चुकवणे -डोळ्याला डोळा न देणे,शरम वाटणे.

पोटात खड्डा पडणे - भीती वाटणे.

पाय लटलटू लागणे -घाबरून पाय थरथरणे.

पोटात बकबुक होणे - खूप घाबरणे.

कबूल करणे - मान्य करणे.

जीव भांड्यात पडणे - दिलासा मिळणे.

चलबिचल होणे - जीवाची घालमेल होणे.

डोक्यावरून हात फिरवणे - माया करणे.

ठणकावून सांगणे - ठामपणे सांगणे.

ऐपत नसणे - कुवत नसणे.

ढसाढसा रडणे - खूप रडणे.

धूम ठोकणे - जोराने पळणे.

भरून येणे - गहिवरणे.

चकित करणे - आश्चर्य वाटायला लागणे.

पाठलाग करणे - पाठोपाठ जाणे.

 देहभान विसरणे - स्वतःची जाणीव विसरणे,गुंग होणे.

शोध घेणे - ओळखणे.

काळजी वाटणे - खंत वाटणे.

बाद करणे - आऊट करणे.

घामाघुम होणे -  खूप घाम येणे.

पाठ थोपटणे -  शाबासकी देणे.  

नावाचा जप चालणे - सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे.

धुडकावून लावणे - नकार देणे. 

मनावर ताबा मिळवणे - संयम बाळगणे.

गायब होणे -  नाहीसे होणे.

मन लालचावणे - एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे.

मन भरून येणे - भावना दाटून येणे.

पदर पसरणे - दुवा मागणे.

गायब होणे - अदृश्य होणे.

गौरव करणे - सन्मान करणे.

वावर असणे - हिंडणे-फिरणे.

खडानखडा माहिती असणे- संपूर्ण माहिती असणे.

संवर्धन करणे - काळजीपूर्वक वाढवणे.

झुंज देणे -  लढणे.

धाडस दाखवणे - हिम्मत दाखवणे.

मोलमजुरी करणे - कष्टाची कामे करून पैसे मिळवणे.

गाल फुगवणे - रुसून बसणे.

टिंगल करणे -  मस्करी करणे. खोडी करणे -चेष्टा करणे.

अर्ज करणे - विनंती करणे, विनवणी करणे.

छाती धडधडणे - जीव घाबरा घुबरा होणे.

गलबलून येणे - गहिवरणे,मन भरून येणे.

आग्रह करणे-  हट्ट धरणे.

खुशीत मान डोलावणे-  आनंदाने होकार देणे.

रस्ता पार करणे - रस्ता ओलांडणे.

डोळे टिपणे - अश्रू पुसणे.

कुतूहल वाटणे- उत्सुकता निर्माण होणे.

निरीक्षण करणे - नीट पाहणे.

अंगाला झोंबणे - अंगाला चुरचुरणे.

आधार देणे - आश्रय देणे, संरक्षण देणे.

फस्त करणे- सगळे खाऊन संपवणे.

रुंजी घालणे - गोल फेर धरणे.

फन्ना उडवणे - पदार्थ खाऊन लगेच संपवणे.

कानकीट्ट करणे - बोलून बोलून किंवा सततच्या एकाच आवाजाने कान किटवणे.

सुळकी मारणे - सूर मारणे, झेप घेणे.

निगा राखणे -  काळजी घेणे. 

मनमोहीत करणे - मन गुंग करणे.

पाळत ठेवणे - नीट लक्ष ठेवणे.

जोपासणे - निगा राखणे, काळजी घेणे.

कानोसा घेणे - कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे,अंदाज घेणे.

भरारी घेणे - झेप घेणे.

प्रसार होणे - पळून जाणे.

उधळून देणे - विखरून टाकणे.

रस घेणे - विशेष आवड असणे.

असंतोष निर्माण होणे - प्रचंड नाराजी निर्माण होणे,चीड येणे.

संकल्प करणे - दृढनिश्चय करणे.

जेरीस आणणे - हैराण करणे.

टिकव लागणे - निभाव लागणे, टिकणे.

बंड पुकारणे - विरोधात उठाव करणे.

रवानगी करणे - पाठवणे.

वीरगती प्राप्त होणे - वीरमरण येणे.

अमर होणे -  नाव चिरकाल राहणे.

उरात धडधडणे - भीती वाटणे.

मंडळ धरणे - फेर धरणे.

 







Wednesday, January 4, 2023

6 जानेवारी - पत्रकार दिन




 6 जानेवारी -  पत्रकार दिन

" ना खीचो कमान को

  ना तलवार निकालो

  जब तोप मुकाबिल हो

  तो अखबार  निकालो  "

       6 जानेवारी हा 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो. समाजातील ज्वलंत प्रश्नावर सडेतोडपणे लिखाण करून समाजात जनजागृती करणारा दूत म्हणून वर्तमानपत्राकडे पाहिले जाते. आज पत्रकार दिन साजरा करत असताना त्या वृत्तपत्रांचा इतिहास सुद्धा पाहणे तितकेच गरजेचे आहे. दर्पण,केसरी, मराठा समाचार जागरण,बंगाल,केसरी, प्रबोधन यासारख्या वर्तमानपत्रांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये लोकांच्या मनामध्ये जागृती केली होती व यातूनच स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहू लागले.

     देशाची सेवा करण्यासाठी सीमेवरती सैनिकांची आवश्यकता असते तितकीच गरज देशातील अंतर्गत विभागाचे रक्षण करण्यासाठी उत्तम पत्रकाराची आवश्यकता असते. बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखमालेपासून ते नवाकाळच्या खाडीलकरापर्यंत सर्व समकालीन व्यक्तींनी वर्तमानपत्रातून लिखाण करून जनतेपर्यंत उत्तम संदेश पोहोचविण्याचे कार्य केले. पत्रकार दिन साजरा करत असताना आज चांगल्या,उज्वल भविष्य असणारे,जनतेच्या प्रश्नांचा ठाव घेणाऱ्या उत्तम पत्रकारांची निर्मिती होणे गरजेचे आहे.आज ही आम्हाला निर्भीडपणे लिखाण करणारी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारी व उपेक्षित व वंचितांना मुख्य प्रवाहात आणणारे प्रामाणिक पत्रकार पहावयास मिळतात.

    उत्तम पत्रकार हा समाजाचा दिशादर्शक असतो.वास्तववादी चित्र आपल्या प्रकट लेखणीतून वस्तुस्थिती त्रयस्थपणे मांडण्याचे कार्य करतो. अशाच पत्रकारांची निर्मिती झाली तर यशाचे शिखर गाठता येईल व राष्ट्राच्या जडणघडणीस मदत होऊ शकते.

जय हिंद ! जय भारत !



Tuesday, January 3, 2023

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज मराठी भाषण





 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

 महाराष्ट्रातील विजयनगरचे साम्राज्य नष्ट झाल्यापासून महाराष्ट्राच्या क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्य उगवलाच नव्हता. महाराष्ट्राची भूमी 300 वर्षे गुलामगिरीच्या अंधारात खितपत पडली होती. अशावेळी शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून महाराष्ट्राच्या इतिहासात नवा अध्याय निर्माण केला.

      युगपुरुष शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. वडील शहाजीराजे यांच्याकडून शौर्याचा वारसा आणि माता जिजाबाईंकडून सुसंस्काराचा अलौकिक वसा शिवबांना लहानपणापासूनच मिळाला. जिजाबाईंनी शिवबांना लहानपणी रामायण महाभारतातील शिवरायांच्या कथा सांगितल्या. म्हणूनच स्वराज्याच्या रूपाने या भूमीवर शिवभारत घडले. आजच्या मातांनी आपल्या मुलांना हे शिवभारत सांगितले तर निश्चितच डॉक्टर कलामांच्या स्वप्नातील व्हिजन भारत साकार झाल्याशिवाय राहणार नाही.

      वयाच्या सोळाव्या वर्षी शिवबांनी रायरेश्वराच्या शिवाला साक्षी ठेवून आपल्या तरुण मित्रांच्या सोबतीने स्वराज्याची शपथ घेतली.अत्यंत कमी वयात शिवबांनी हे अग्नी दिव्य हाती घेण्याचे धाडस केले आणि ते पूर्णत्वास नेले. त्यासाठी त्यांनी पुणे, सुपे, मावळ यासारख्या प्रांतात स्वतः फिरून लोकांची परिस्थिती,त्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि हळूहळू लोकांच्या मनामध्ये स्वधर्म आणि स्वराज्य याबद्दल आस्था निर्माण केली.एक कवी म्हणतो...

' माणसांना अस्मितेचे भान यावे लागते,

पाय चाटू श्वापदांनी इन्सान व्हावे लागते.'

या युक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील माणसांना स्वतःच्या अस्मितेचे भान करून देण्याचे काम शिवरायांनी केले. त्यामुळेच इथल्या माणसांना स्वराज्याचे महत्त्व पटले आणि त्यातूनच तानाजी मालुसरे,येसाजी कंक, बाजी पासलकर,नेताजी पालकर यांसारखी अनेक तरुण मंडळी शिवबांभोवती जमा झाली, आणि याच मावळ्यांनी पुढे स्वराज्याचा गोवर्धन स्वतःच्या हातावर पेलला.

      रणांगणावर योद्धा लढत नसतो,

 त्याचे हात किंवा हातातील समशेर ही लढत नसते,

लढत असते ते फक्त त्याचे मन,

 शिवरायांनी हीच लढणारी मनं घडविण्याचे महान कार्य केले. परकीयांशी लढण्या अगोदर त्यांनी स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून स्वराज्याची पायवाट मोकळी केली.

      अफजलखानाचा प्रतापगडावर वध करून स्वराज्यावरील पहिले मोठे संकट शिवरायांनी सहज धुळीस मिळवले.पन्हाळगडावरून केलेली सुटका आणि शाहिस्तेखानाची केलेली फटफजिती यातून शिवाजींनी स्वतःची आणि आपल्या सहकारी मावळ्यांची योजनाबद्धता काळालाही सिद्ध करून दाखवली.औरंगजेब बादशहाच्या कैदेतून अद्भुत सुटका करून घेऊन संपूर्ण भारत वर्षाला हिंदवी स्वराज्याच्या सामर्थ्याची प्रचिती आणून दिली. या आणि अशा अनेक संकटांशी सामना करत करत शिवरायांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व दैदिप्यमान बनत गेले.

      शिवरायांनी उभे केलेले स्वराज्य कुणा एकट्या दुकट्याचे नव्हते तर ते संपूर्ण रयतेचे होते. स्वराज्यात सर्व जाती-धर्मातील माणसांना स्थान होते.ब्राह्मण, भोळ्या समजुती आणि परंपरांचे मात्र तेथे उच्चाटन होते.आणि म्हणूनच ते स्वराज्य म्हणजे एक प्रकारचे समाज परिवर्तनच होते.

    समाज परिवर्तनाच्या पायावर उभे असलेले हे राज्य न्यायाचे, नीतीचे, जनतेच्या कल्याणाचे राज्य होते आणि असे राज्य उभे करणारे शिवछत्रपती हे रयतेचे राजे होते.

 धन्यवाद!

Monday, January 2, 2023

छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj apratim bhashan






 युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज

  श्रीपती, भूपती,नृपती,अधिपती, पृथ्वीपती, छत्रपती, कुलवंत, जयवंत,यशवंत,किर्तीवंत, धैर्यशील, सतशील, धर्मशील, प्रजादक्ष, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज छत्रपती  शिवरायांच्या चरणी मानाचा मुजरा!

   नमस्कार, व्यासपीठावरील मान्यवर,व्यासपीठासमोरील तुम्ही सर्व सन्माननीय ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो! माझ्या भाषणाचा विषय लक्षात आला असेल. विषय मांडतोय 'युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज'.

 'झाले बहु, होतील बहु,

 परंतु यासम हा!'

 हे वर्णन ज्यांना अगदी तंतोतंत लागू पडते, ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज.आणि म्हणूनच रसिकहो... शेकडो वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान आढळ आहे. छत्रपती शिवाजी राजांचे 'राजा आणि व्यक्ती' म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चरित्र अत्युच्च होते. म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कालशिलावर अखंड आहेत.म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात'

 "निश्चयाचा महामेरू

 बहुत जनासी आधारू

 अखंड स्थितीचा निर्धारू

 श्रीमंत योगी

धीर उदार सुंदर

 शूर प्रियसी तत्पर

सावधपणे नृपवर

तुच्छ केले

यशवंत किर्तीवंत सामर्थ्यवंत वरदवंत  पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा

     शिवाजी महाराजांना हे जाणतेपण लाभले ते त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्यामुळेच.

    शिवरायांचा जन्म 1630 मध्ये झाला 1680 साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे 50 वर्षांचे आयुष्य. पण या अल्पकाळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे.या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या कर्तृत्वात आणि महान चारित्र्यात दडलेले आहे.

    शिवनेरी किल्ल्यावर शहाजीराजे भोसले व मासाहेब जिजाऊ यांच्या पोटी या सुपुत्राचा जन्म झाला. मासाहेब जिजाऊंनी या आपल्या असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिपक्व केले. शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे व पिता शहाजीराजे हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला.

    महाराजांना मराठा तितुका मिळवून महाराष्ट्र धर्म वाढवायचा होता आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची होती.हिंदूंच्या सार्वभौम स्वराज्याची अपेक्षा केली आणि '  हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे! '  या विचाराने प्रेरित होऊन हिंदवी राज्याच्या स्थापनेचा पाया त्यांनी घातला. हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ जाणतेपण.

 शिवाजी राजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजविण्यास प्रारंभ केला. स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली आणि या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले. पण राजांनी कधी माघार घेतली नाही. आदिलशाही निजाम यांच्याबरोबर काही वेळेला स्वकीयांचाही विरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. महाराजांचे नाव ऐकताच शत्रूच्या गोटात भंबेरी उठत असे.

" या भूमंडळीच्या ठायी

धर्मरक्षी ऐसी नाही

महाराष्ट्र धर्म उरला नाही

 तुम्हाकरिता " 

 या समर्थ रामदास स्वामींच्या वचनात महाराजांच्या पराक्रमाची, अवतार कार्याची माहिती आहे. म्हणूनच अनेक इतिहासकारांनी देखील महाराजांची तुलना अलेक्झांडर, सिझर, नेपोलियन अशा जगप्रसिद्ध सेनानींशी केली आहे. पण महाराज नुसतेच सेनानी नव्हते ते थोर मुत्सद्दी होते. राजकारणाचे रबर तुटेपर्यंत ताणायचे नसते, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच जयसिंगाचे सामर्थ्य लक्षात येताच महाराजांनी माघार घेतली. पण स्वराज्यातील बारा किल्ले व एक लाख होनाचा मुलुख स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाले. खरा यशस्वी कोण तर, जो विजयाचे फलित अधिकाधिक पदरात पाडून घेतो तो व वेळप्रसंगी चार पावले मागे सरतो आणि संधी मिळताच दहा पावले पुढे टाकतो. पराभवात ही आपल्या राज्याचे नुकसान कमीत कमी कसे होईल?  हे पाहतो तो खरा मुत्सद्दी.

   शिवाजी राजे यांचा राजकारणातील जरब पहाल तर आश्चर्याने थक्क व्हाल. आरमारातील दौलतखान व दर्यासारंग यांनी हयगय केल्याचे लक्षात येताच महाराज कठोरपणे लिहितात, " असे नादान थोडे असतील,ऐवज न पाठवून तुम्ही आरमार खोळंबून पाडाल,

एवढी हरामखोरी तुम्ही कराल

 न कळेल तरी ऐसे चाकर आज ठीक केले पाहिजे.

नेमून दिलेल्या कामात कामचुकारपणा करणारा मग तो ब्राह्मण जरी असला तरी महाराज रोखठोकपणे विचारतात, " ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा धरू पाहतो!"

    स्त्रीच्या अब्रूला हात घालणाऱ्याचे हात तोडणारे राजे एकटेच. लाच खाऊन ही जिने जगविता? थू तुमच्या जिनगाणीला!  असे प्रत्यक्ष मामाला उद्देशून म्हणणारे व प्रसंगी त्यांना कैद करणारे देखील महाराज एकटेच. ब्रिटिशांच्या सारखी महासत्ता देखील त्यांच्यापुढे नतमस्तक झालेली दिसते असे.  महाराज म्हणजेच राजे शिवछत्रपती होय.

 महाराजांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मातेचा होता. म्हणूनच स्वकीयांची असो वा परकियांची असो. स्त्रीच्या शिलाचे रक्षण करणे व तिला मातेचे स्थान देणे राजे सर्वश्रेष्ठ कर्तव्य मानतात. म्हणूनच सुभेदाराची सून लूट म्हणून समोर उभी असताना...

 " अशीच आमुची आई असती,

 सुंदर,रूपवती,

 आम्हीही सुंदर झालो असतो!

 वदले छत्रपती!"

 अशा नीतिमान युगपुरुषासमोर शतदा नतमस्तक व्हावे.

   रयत म्हणजे आपली प्रजा. हिचा सांभाळ पुत्रवत केला पाहिजे. हीच तळमळ महाराजांच्या ठाई होती. झुंडशाही नष्ट करून राजांनी अशी शिस्त लावली की लुटीतील एखादा सुतळीचा तोडा देखील लपवून ठेवण्याचे धाडस देखील कोण करत नसेल.जुन्या वतनदारांची वतने खालसा करून नवीन ही कोणास देऊ नयेत असे सक्त दंडक राजांनी घातले. सरंजामशाही नष्ट करून, गुणवत्तेप्रमाणे राज्यकारभारात स्थान देऊन,आपले प्रशासन विलक्षण कार्यक्षम ठेवले.या थोर मानवाच्या जीवन चरित्राकडे पाहताना  एवढेच म्हणावेसे वाटते...

" गीतेचा संदेश तू!

आणि क्रांतीचा आदेश तू!

 संस्कृतीचा मान तू!

आणि आमचा अभिमान तू!

 जय हिंद ! जय शिवराय!






Friday, December 30, 2022

Idiomatic comparisons

As Black as coal

 कोळशासारखा काळा 

As blind as a bat

 वटवाघळासारखा आंधळा 

As blithe as a lark

चंडोल  पक्षासारखा आनंदी 

As a brave as a lion

 सिंहासारखा शूर 

As bright as day 

दिवसासारखा तेजस्वी 

As brisk as a बटरफ्लाय

 फुलपाखरासारखा चपळ 

As brittle as glass

 काचेसारखा ठिसूळ 

As busy as a bee

 मधमाशीसारखा उद्योगी



As cold as ice

 बर्फासारखा थंडगार 

As cunning as a fox

 कोल्ह्यासारखा धूर्त 

As dark as midnight

 मध्यरात्रीसारखा काळाकुट्ट 

As dark as pitch

 डांबरासारखा काळाकुट्ट 

As deaf as a post

 खांबासारखा बहिरा 

As deep as a well

 विहिरीसारखा खोल 

As dirty as a pig

 डुकरासारखा घाणेरडा 

As dumb as a statue

 पुतळ्यासारखा स्तब्ध 

As easy as ABC

 मुळाक्षरांइतके सोपे 

As fair as a rose

 गुलाबाइतका मोहक 

As fast as a hare

 सश्यासारखा चपळ 

As fat as a pig

 डुकराइतका लठ्ठ 

As fierce as a tiger

 वाघासारखा हिंस्र 

As firm as a rock

 खडकासारखा स्थिर 

As fit as fiddle

 व्हायोलिनसारखा धडधाकट 

As free as air

 हवेसारखा मुक्त 

As gentle as a lamb

 कोकरासारखे गरीब 

As good as gold

 सोन्यासारखा अस्सल 

As graceful as a Swan

 हंसासारखा डौलदार  

As grave as a judge

 न्यायाधीशासारखा गंभीर 

As greedy as a wolf

 लांडग्यासारखा अधाशी 

As green as grass

 गवतासारखा हिरवागार 

As hard as flint

 गारगोटी सारखा टणक 

As happy as a king

 राजा इतका सुखी 

As heavy as lead

 शिसासारखा जड 

As harmeless as a kitten

 मांजरीच्या पिलासारखा निरूपद्रवी 

As hoarse as a crow

 कावळ्यासारखा कर्कश 

As hot as fire

 अग्नीसारखा उष्ण 

As hungry as a wolf

 लांडग्यासारखा भुकेला 

As hasty as a hare

 सशासारखा धांदरट 

As innocent as a dove

 कबुतरासारखा निष्पाप 

As imitating as a parrot

 पोपटासारखा नकल्या 

As light as a feather

 पिसासारखा हलका 

As loud as thunder

 मेघगर्जने सारखा मोठा 

As merry as a cricket

 पतंगासारखा आनंदी 

As mad as a march hare

 मार्च महिन्यातील सश्यासारखा पिसाट 

As mute as a fish

 माशासारखा मूक 

As nimbal as a bee

 मधमाशी सारखा चपळ 

As nimble as a squirrel

 खारीसारखा चपळ 

As obstinate as a mule

 खेचरासारखा हटवादी  

As old as the hills

 टेकड्यांइतका प्राचीन 

As pale as death

 मृत्यूसारखा निस्तेज 

As playful as a kitten

 मांजरीच्या पिला सारखा खेळकर 

As plump as a partridge

 कवड्यासारखा गुबगुबीत 

As poor as a church Mouse

 चर्चमधील उंदरा इतका गरीब 

As proud as a peacock

 मोरासारखा गर्विष्ठ 

As quick as lightening

 विजेसारखा गतिमान 

As quick as thought

 विचारासारखा गतिमान 

A quite as a lamb

 कोकरासारखा शांत 

As red as blood

 रक्तासारखा लाल 

As red as a cherry

 चेरी फळासारखा लाल 

As read as a rose

 गुलाबासारखा लाल 

As a round as a ball

 चेंडू सारखा गोल 

As regular as a clock

 घड्याळासारखा नियमित 

As sharp as a razor

 वस्तऱ्यासारखा धारदार 

As silent as the grave 

 थडग्यासारखे स्तब्ध 

As silent as the Dead

 मृतासारखे स्तब्ध 

As silly as a sheep

 मेंढी सारखा निर्बुद्ध 

As smooth as velvet

 मखमली सारखे गुळगुळीत 

As soft as butter

 लोण्याइतके मऊ 

As soft as wax

 मेणासारखे मऊ 

As slow as a snail

 गोगलगायीसारखा मंदगतीचा 

As steady as a rock

 खडकासारखा अविचल 

As sweet as honey

 मधासारखे गोड 

As shy as a mouse

 उंदरासारखा बुजरा 

As stupid as a donkey

 गाढवासारखा मूर्ख 

As sure as death

 मृत्यूइतके अटळ 

As swift as an arrow

 बाणासारखे वेगवान 

As sour as vinegar

सिरक्याइतका आंबट 

As a tame as a chicken

 कोंबडीच्या पिलासारखा गरीब 

As timid as a hare

 सश्यासारखा भित्रा 

As tough as leather

 चामड्यासारखा चिवट 

As tricky as a monkey

 माकडासारखा चलाख 

As thin as a hair

 केसासारखा बारीक 

As treacherous as a shark

 शार्क माशासारखा दगलबाज 

As vain as a peacock

 मोरासारखा घमेंडी 

As warm as wool

 लोकरीसारखा उबदार 

As watchfull as a Hawk

 बहिरी ससाण्यासारखा सावध 

As weak as a Kitten

 मांजरीच्या पिला सारखा अशक्त 

As White as snow

 बर्फासारखा शुभ्र 

As yellow as saffron

 केशरासारखा पिवळा धमक 

As yellow as gold

 सोन्यासारखा पिवळा