Showing posts with label let's learn english. Show all posts
Showing posts with label let's learn english. Show all posts

Sunday, January 8, 2023

English Proverbs with Marathi meaning

In this post, we are going to learn some important English proverbs and their Marathi meaning.

-----------------------------------

Let's learn some important english proverbs with their marathi meaning.

-----------------------------

Action speak louder than wordplay

उक्तीपेक्षा  कृती श्रेष्ठ.

A bad workman quarrels with his tools.

नाचता येईना अंगण वाकडे.

The bird in hand is what two in the bush.

हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.

Drowning man catches at a straw.

बुडत्याला काडीचा आधार.

A friend in need is a friend indeed.

गरजेला हात देतो तोच खरा मित्र.

A penny saved is a penny gained.

वाचवलेला पैसा म्हणजे मिळवलेला पैसा.

A rolling Stone gathers no moss.

अस्थिर मनुष्य यशस्वी होत नाही.

A stitch  in time saves nine.

वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते.

A word is enough for the wise.

शहाण्याला शब्दाचा मार.

All is fair in love and war.

प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असते.

All is well that ends well.

ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.

All that glitters is not gold.

जे चकाकते ते सर्व सोनेच नसते.

All work and no play makes jack a dull boy.

योग्य विश्रांती वाचून सतत काम केल्यास काम करणारा व त्याचे काम या दोघांचेही नुकसान होते.

An apple a day keeps the doctor away.

दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा.

An empty vessel makes much noise.

उथळ पाण्याला खळखळाट फार.

Barking dogs seldom bite.

भुंकणारी कुत्रे चावत नसतात.

Beggars cannot be choosers.

भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी का?

Better late than never.

कधीही न करण्यापेक्षा उशिरा का होईना करणे श्रेयस्कर. 

Birds of feather flock together.

एकाच माळेचे मणी.

Blood is thicker than water.

कातड्यापेक्षा आतड्याची ओढ अधिक असते.

Bones for latecomers.

हाजीर तो वजीर.

Charity begins at home.

औदार्याची सुरुवात आपल्या घरापासूनच करावी.

Contentment is happiness.

संतोष हेच परमसुख.

Cut your coat according to your cloth .

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

Don't count your chickens before they are hatched.

बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी.

Don't cross a bridge until you come to it.

संकटे येण्यापूर्वीच त्यांची चिंता करीत बसू नका.

Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise.

लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य,संपत्ती भेटे.

Every cloud has a silver lining.

संकटांच्या सागराला सुखाचा किनारा असतोच.

 किंवा

प्रत्येक काळया ढगाला सोनेरी किनार असते.

Every dog has its day.

चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.

Every house has its skeleton.

घरोघरी मातीच्या चुली.

Example is better than precept.

प्रत्यक्ष कृती ही केवळ उक्तीपेक्षा श्रेयस्कर होय.

Experience is the best teacher.

अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु होय.

Familiarity breeds contempt.

अतिपरिचयात अवज्ञा.

First Come First served.

हाजीर तो वजीर.

Fortune favours the Brave.

साहसे श्री: प्रतिवसति. 

God helps those who helps themselves.

जे स्वतः कष्ट करतात, त्यांना परमेश्वर सहाय्य करतो.

Half loaf is better than none.

उपास घडण्यापेक्षा अर्धी भाकरी बरी.

Health is wealth.

आरोग्य हीच संपत्ती.

Honesty is the best policy.

प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण.

It is never too late to mend.

उशीर झाला तरी सुधारणा करणे चांगले.

It is no use crying over spilt milk.

गतकाळाचा शोध फुकाचा.

It never rain but it pours.

संकटे ही एकटीदुकटी  येत नसतात.

It takes two  to make a quarrel.

टाळी एका हाताने वाजत नाही.

Laugh and grow fat.

हसा आणि लठ्ठ व्हा.

Listen to people but obey your conscience.

ऐकावे जनाचे करावे मनाचे.

Little things please little minds.

कोल्हा काकडीला राजी.

Look before you leap.

पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नका.

Make hey while the sun shines.

तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या.

Man proposes  God disposes.

मनुष्य योजतो एक, देवाच्या मनात असते निराळेच.

Many hands make light work.

अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते.

Might is right.

बळी तो कान पिळी.

Money bigets money. 

पैशापाशी पैसा जातो.

Money makes the mare go.

दाम करी काम.

More haste less speed.

फार घाई कमी वेग.

Necessity is the mother of invention.

गरज ही शोधाची जननी आहे.

No pains no gains.

कष्टाशिवाय फळ नाही.

No rose without thorn.

काट्या वाचून गुलाब नाही.

No smoke without fire.

विस्तवाशिवाय धूर नाही.

One good turn deserves another.

उपकाराची फेड उपकारानेच करावी.

One swallow does not make a summer.

एखाद्या उदाहरणावरून नियम सिद्ध होत नाही.

Out of site out of mind.

दृष्टिआड सृष्टी.

Out of the frying pan, into the fire.

आगीतून फुफाट्यात.

Penny wise pound foolish.

बारीकसारीक बाबतीत काटकसर, मोठ्या बाबतीत उधळ्या.

Practice makes perfect.

सरावाने पूर्णत्व येते.

Prevention is better than cure.

उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला.

Reap as you sow.

पेरावे तसे उगवते./ करावे तसे भरावे.

Rome was not built in a day.

महत्त्वाची कार्यें तडकाफडकी होत नसतात. 

Set a thief to catch a thief.

चोराच्या वाटा चोरालाच माहीत.

Slow and steady wins the race.

सावकाश आणि सातत्याने काम केल्यास यश मिळते.

Spare the rod and spoil the child.

छडी लागे छम छम,विद्या येई घमघम.

Strike while the iron is hot.

तवा तापलेला आहे तोवर पोळी भाजून घ्या.

The child is father of the man.

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.

The wearer knows where the shoe pinches.

ज्याचे जळते त्यालाच कळते.

Tit for tat.

जशास तसे.

To err is human.

चुकणे हा मनुष्यधर्म आहे.

Too many cooks spoil the broth.

पाच-पन्नास आचारी,वरणामध्ये मीठ भारी.

Truth will be out.

सत्याला वाचा फुटतेच.

Two hands are better than one.

एक से दो भले.

Union is strength.

एकी हेच बळ./ ऐक्य हेच सामर्थ्य.

When the cats away the mice will play.

मांजरीच्या अनुपस्थितीत उंदीर बिनधास्त खेळतात.


 

Saturday, November 12, 2022

English Grammar - Singular and Plural





यामध्ये आपण पाहणार आहोत , 

इंग्रजी व्याकरणमधील महत्वाचा घटक 

Numbers - Singular and Plural 

एकवचन आणि अनेकवचन 

वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्या 

नामावरून कळते त्याला वचन (Numbers) म्हणतात.

Singular - ज्या नामावरून एकाच वस्तूचा 

बोध होतो , त्या नामाला एकवचनी(Singular )

नाम असे म्हणतात.

Plural - ज्या नामावरून एकापेक्षा अनेक 

वस्तूंचा बोध होतो त्या नामाला अनेकवचनी

(Plural )नाम असे म्हणतात.

नामाचे एकवचन व अनेकवचन कसे 

करतात ,त्यासंबंधी काही नियम आहेत 

ते आपण उदाहरणासहित पाहणार 

आहोत.

1) सामान्यतः नामाचे अनेकवचन 

करताना 's' हा प्रत्यय लावतात.

Singular - Plural 

book   - Books 

Dog - Dogs 

Rose - Roses 

Boy - Boys 

Ball - Balls 

Bat - Bats 

2) नामाच्या शेवटी 's' 'sh' ,ch,x 

किंवा 'z' ही अक्षरे असल्यास 

त्यांना 'es' हा प्रत्यय लागतो.

Class - Classes 

Kiss - Kisses 

Dish - Dishes 

Bush - Bushes

Batch - Batches 

Bench - Benches 

Fox - Foxes 

Quiz - Quizes 

3)नामाच्या शेवटी 'o' हे अक्षर 

असल्यास त्या नामाचे बहुवचन 

'es' हा प्रत्यय जोडून करतात.

Hero - Heroes

Mango -Mangoes

Negro -Negroes

Potato - Potatoes

Mosquito - Mosquitoes

Buffalo - Buffaloes

अपवाद :-

Radio - Radios

Kilo - Kilos

Solo - Solos

Studio - Studios

Bamboo - Bamboos

Piano - Pianos

Ratio - Ratios

Cuckoo - Cuckoos

4) नामाच्या शेवटी 'y ' हे अक्षर 

असेल व 'y' पूर्वी एखादे व्यंजन 

येत असेल, तर 'y' काढून 'ies' 

प्रत्यय लावावा.

City - Cities

Baby - Babies

Lady - Ladies

Story - Stories

Cry - Cries

Body - Bodies

Army - Armies

Country - Countries

परंतु नामाच्या शेवटी 'y' आणि 

त्यापूर्वी एखादा स्वर असल्यास

 's' जोडून बहुवचन केले जाते.

Day - Days

Valley - Valleys

Toy - Toys

Donkey - Donkeys

Key - Keys

Boy - Boys

5) नामाच्या शेवटी 'f' किंवा 'fe' 

ही अक्षरे येत असतील तर 'f' 

किंवा 'fe' ऐवजी 'ves ' वापरून 

बहुवचन करतात.

Wife - Wives

Life - Lives

Knife - Knives

Leaf - Leaves

Thief - Thieves

Wolf - Wolves

अपवाद :-

Roof - Roofs

Belief - Beliefs

Safe - Safes

Proof - Proofs

Hankerchief - Handkerchiefs

6) अनियमित बहुवचने

Foot - Feet

Ox - Oxen

Man - Men

Mouse - Mice

Tooth - Teeth

Child - Children

Woman - Women

Goose - Geese

7) एकवचन व बहुवचन सारखीच

 असणारी नामे.

People - People

Hair - Hair

Deer - Deer

Cattle - Cattle

Sheep - Sheep

Police - Police

8) ठराविक एकवचन

व बहुवचन सारखीच

असणारी पुस्तकांची नावे.

Mathematics- Mathematics

Physics - Physics

Civics - Civics

Economics - Economics

Atheletics - Atheletics

Politics - Politics

9) सामासिक नामांचे     

    अनेकवचन

खालीलप्रमाणे करतात.

Brother-in-law - Brother-in-law 

Son -in-law - Son -in-law 

सरावासाठी आणखी
काही शब्द.
Cup - Cups
Tree - Trees
Cap - Caps
Hour - Hours
Bus - Buses
Match - Matches
Lorry - Lorries
Way - Ways
Shelf - Shelves
Half - Halves
Fish - Fish
Music - Music
Guard - Guards
Bird - Birds
Step son - Step sons
Table - Tables
Egg - Eggs
Chick - Chicks
Mark - Marks
Result - Results
Coin - Coins
Lake - Lekes
Doll - Dolls
Girl - Girls
Eye - Eyes
House - Houses
Brush - Brushes
Branch - Branches
Hobby - Hobbies
Key - Keys
Leaf - Leaves
Loaf - Loaves
Chief - Chiefs
Dozen - Dozens
Swine - Swine
Monkey - Monkeys
Apple - Apples
Cake - Cakes
Tomato - Tomatoes
Apple - Apples
Cake - Cakes
Chart - Charts
Feather - Feathers
Wing - Wings
Fruit - Fruits
Lesson - Lessons
Gutter - Gutters
Year - Years



चौथी प्रज्ञाशोध परीक्षा 
सराव परीक्षा 03 

4th Standard 

Talent Search Exam 

Test 03 


नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, या 

पोस्टमध्ये इयत्ता चौथी प्रज्ञाशोध 

परीक्षा सराव संच 02 दिला आहे. 

आपण तो नक्की सोडवा .

तो कसा सोडवावा याच्या सूचना

 खाली दिल्या आहेत .

 पूर्ण नाव - -------------------------

या ठिकाणी विद्यार्थ्याने आपले 

नाव लिहावे.

नाव लिहिल्यानंतर Next या शब्दावर 

क्लिक करावे.

सर्व प्रश्न सोडवावे .

एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर 

आपल्या पालकांना विचारून किंवा 

समजून घेऊन सोडवावा .

(सर्व प्रश्न सोडवल्याशिवाय आपली

 उत्तरे   Submit   होत नाहीत.) 

शेवटी Submit करून 

View Score वर क्लिक करून 

आपले गुण पाहा.

बरोबर व चुकीची उत्तरे तपासा.

पुन्हा Test सोडवा.

ऑनलाईन टेस्ट येथे सोडवा .


Saturday, November 5, 2022

English Idioms इंग्रजी वाक्प्रचार व त्यांचा मराठी अर्थ

 




English Idioms –

इंग्रजी वाक्प्रचार व त्यांचा मराठी अर्थ

1. Account for – च्या साठी योग्य कारण देणे .

2. Answer somebody back –उलट उत्तर देणे.

3. Ask after –चौकशी करणे,कुशल विचारणे.

4. Bear with – शांतपणे ऐकणे.

5. Break down – बिघाड होणे, भावनाविवश होणे.

6. Break into – जबरदस्तीने घुसणे.

7. Break up – संपणे, विसर्जन होणे.

8. Bring about – घडवून आणणे .

9. Bring up – संगोपन करणे .

10. Call off –मागे घेणे.

11. Call on –  अल्पकाळ भेट देणे, आवाहन करणे.

12. Carry on –  चालू ठेवणे.

13. Carry out – पार पाडणे ,अंमलात आणणे.

14. Come about – घडणे.

15. Come across – भेटणे, अचानक गाठ पडणे.

16. Come round –  बरे होणे, सहमत होणे.

17. Cut out for – च्यासाठी योग्य .

18. Deal in – चा धंदा करणे.

19. Deal with – च्या शी वागणे , व्यवहार करणे.

20. Fall out – भांडणे.

21. Get over – आजार्तून बरे होणे .

22. Get through – पास होणे, उत्तीर्ण होणे.

23. Give away – वितरण करणे.

24. Give up – व्यसन सोडणे.

25. Go on – चालू ठेवणे.

26. Go through – बारकाईने तपासणे.

27. Jump at – उत्साहाने स्वीकारणे.

28. Keep back – चोरून ठेवणे , गुप्त ठेवणे .

29. Keep on –  चालू ठेवणे.

30. Look after – काळजी घेणे.

31. Look for – शोधणे.

32. Look forward to – उत्सुकतेने अपेक्षा करणे.

33. Look into – चौकशी करणे.

34.Look on – मानणे.

35. Look down upon – तुच्छ लेखणे.

36. Make up one’s mind – निश्चय करणे.

37. Make up for – भरपाई करणे.

38. Pull down – पाडणे, नष्ट करणे.

39. Put off – पुढे ढकलणे .

40. Put out – विझवणे.

41. Pull up-  कानउघाडणी करणे.

42. Put up with – सहन करणे.

43. Run out of – संपणे.

44. Stand by-  पाठींबा देणे, आधार देणे.

45. Send for – बोलावणे पाठवणे.

46. Set in – सुरु होणे .

47. Set out – प्रवासाला सुरवात करणे.

48. Take after- सारखे असणे.

49. Take down –लिहिणे.

50.Take off – उड्डाण करणे.