Showing posts with label English Speaking Course. Show all posts
Showing posts with label English Speaking Course. Show all posts

Saturday, November 5, 2022

English Idioms इंग्रजी वाक्प्रचार व त्यांचा मराठी अर्थ

 




English Idioms –

इंग्रजी वाक्प्रचार व त्यांचा मराठी अर्थ

1. Account for – च्या साठी योग्य कारण देणे .

2. Answer somebody back –उलट उत्तर देणे.

3. Ask after –चौकशी करणे,कुशल विचारणे.

4. Bear with – शांतपणे ऐकणे.

5. Break down – बिघाड होणे, भावनाविवश होणे.

6. Break into – जबरदस्तीने घुसणे.

7. Break up – संपणे, विसर्जन होणे.

8. Bring about – घडवून आणणे .

9. Bring up – संगोपन करणे .

10. Call off –मागे घेणे.

11. Call on –  अल्पकाळ भेट देणे, आवाहन करणे.

12. Carry on –  चालू ठेवणे.

13. Carry out – पार पाडणे ,अंमलात आणणे.

14. Come about – घडणे.

15. Come across – भेटणे, अचानक गाठ पडणे.

16. Come round –  बरे होणे, सहमत होणे.

17. Cut out for – च्यासाठी योग्य .

18. Deal in – चा धंदा करणे.

19. Deal with – च्या शी वागणे , व्यवहार करणे.

20. Fall out – भांडणे.

21. Get over – आजार्तून बरे होणे .

22. Get through – पास होणे, उत्तीर्ण होणे.

23. Give away – वितरण करणे.

24. Give up – व्यसन सोडणे.

25. Go on – चालू ठेवणे.

26. Go through – बारकाईने तपासणे.

27. Jump at – उत्साहाने स्वीकारणे.

28. Keep back – चोरून ठेवणे , गुप्त ठेवणे .

29. Keep on –  चालू ठेवणे.

30. Look after – काळजी घेणे.

31. Look for – शोधणे.

32. Look forward to – उत्सुकतेने अपेक्षा करणे.

33. Look into – चौकशी करणे.

34.Look on – मानणे.

35. Look down upon – तुच्छ लेखणे.

36. Make up one’s mind – निश्चय करणे.

37. Make up for – भरपाई करणे.

38. Pull down – पाडणे, नष्ट करणे.

39. Put off – पुढे ढकलणे .

40. Put out – विझवणे.

41. Pull up-  कानउघाडणी करणे.

42. Put up with – सहन करणे.

43. Run out of – संपणे.

44. Stand by-  पाठींबा देणे, आधार देणे.

45. Send for – बोलावणे पाठवणे.

46. Set in – सुरु होणे .

47. Set out – प्रवासाला सुरवात करणे.

48. Take after- सारखे असणे.

49. Take down –लिहिणे.

50.Take off – उड्डाण करणे.

 

Friday, September 23, 2022

Use of - I am --- We are



नमस्कार विद्यार्थीमित्रांनो , 

आज आपण  I am व We are चा वापर कसा करावा याबद्दल पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला 

I am व We are ची अनेक वाक्ये सरावासाठी दिलेली आहेत.त्यांचा अभ्यास करा. या घटकावरील  व्हिडीओ पाहण्यासाठी वरील चित्राला क्लिक करा.

I (आय) म्हणजे मी -

 बोलणारी व्यक्ती स्वतःबद्दल I हा शब्द वापरते. I हा शब्द एकवचनी आहे.

I चे अनेकवचन We (वी ) - म्हणजे आम्ही. I आणि We यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात.


Be ( बी ) - असणे . हे क्रियापद आहे.

वर्तमानकाळात I या कर्त्याबरोबर 

am ( अम  ) हे रूप वापरले जाते 

आणि We ( वी ) -

या कर्त्याबरोबर are ( आर ) हे रूप वापरले जाते .

उदाहरणार्थ - 

I am ---

We are -----

 I am किंवा We are एवढेच म्हणून पूर्ण अर्थ 

कळत नाही .त्यासाठी या शब्दांच्या पुढे

 मी काय किंवा कोण आहे तसेच आम्ही 

काय किंवा कोण आहोत , हे म्हणावेच लागते.

I am व We are ची सोपी वाक्ये.

ही वाक्ये एकवचन व अनेकवचन या 

स्वरूपात आपण पाहुयात.

I am a farmer.

आय ऍम अ फार्मर.

मी शेतकरी आहे.

We are farmers.

वी आर फार्मर्स.

आम्ही शेतकरी आहोत.

I am a peon.

आय ऍम अ प्यून.

मी चपराशी आहे.

We are peons.

वी आर प्यून्स.

आम्ही चपराशी आहोत.

I am an engineer.

आय ऍम अन इंजिनियर.

मी अभियंता आहे.

We are engineers.

वी आर इंजिनिअर्स.

आम्ही अभियंते आहोत.


I am an artist.

आय ऍम अन आर्टिस्ट.

मी कलाकार आहे.

We are artists.

वी आर आर्टिस्ट्स.

आम्ही कलाकार आहोत.



I am an architect.

आय ऍम अन आर्किटेक्ट.

मी एक वास्तूरचनाकार आहे.

We are architects.

वी आर आर्किटेक्ट्स.

आम्ही वास्तूरचनाकार आहोत.

I am a nurse.

आय ऍम अ नर्स.

मी परिचारिका आहे.

We are nurses.

वी आर नर्सेस.

आम्ही परिचारिका आहोत.

I am a lawyer.

आय ऍम अ लॉयर.

मी वकील आहे.

We are lawyers.

वी आर लॉयर्स.

आम्ही वकील आहोत.


I am a blacksmith.

आय ऍम अ ब्लॅकस्मिथ.

मी लोहार आहे.

We are blacksmiths.

वी आर ब्लॅकस्मिथ्स.

आम्ही लोहार आहोत.

I am a hunter.

आय ऍम अ हंटर.

 मी शिकारी आहे.

We are hunters.

वी आर हंटर्स.

आम्ही शिकारी आहोत.

I am a gardener.

आय ऍम अ गार्डीनर.

मी माळी आहे.

We are gardeners.

वी आर गार्डीनर्स.

आम्ही माळी आहोत.




I am a chemist.

आय ऍम अ केमिस्ट.

मी औषधविक्रेता आहे.

We are chemists.

वी आर केमिस्ट्स.

आम्ही औषधविक्रेते आहोत.

I am a soldier.

आय ऍम अ सोल्जर.

मी सैनिक आहे.

We are soldiers.

वी आर सोल्जर्स.

आम्ही सैनिक आहो

I am a sailor.

आय ऍम अ सेइलर.

मी खलाशी आहे.

We are sailors.

वी आर सेइलर्स.

आम्ही खलाशी आहोत.

I am a teacher.

आय ऍम अ टिचर.

मी शिक्षक आहे.

We are teachers.

वी आर टिचर्स.

आम्ही शिक्षक आहोत.

I am a milkman.

आय ऍम अ मिल्कमन.

मी गवळी आहे.

We are milkmen.

वी आर मिल्कमेन.

आम्ही गवळी आहोत.


I am a doctor.

आय ऍम अ डॉक्टर.

मी वैद्य आहे.

We are doctors.

वी आर डॉक्टर्स.

आम्ही वैद्य आहोत.

I am a tailor.

आय ऍम अ टेलर.

मी शिंपी आहे.

We are tailors.

वी आर टेलर्स.

आम्ही शिंपी आहोत.

I am a potter.

आय ऍम अ पॉटर.

मी कुंभार आहे.

We are potters.

वी आर पॉटर्स.

आम्ही कुंभार आहोत.

I am a watchman.

आय ऍम अ वॉचमन.

मी पहारेकरी आहे.

We are watchmen.

वी आर वॉचमेन.

आम्ही पहारेकरी आहोत.


I am a girl.

आय ऍम अ गर्ल.

मी मुलगी आहे.

We are girls.

वी आर गर्ल्स.

आम्ही मुली आहोत.

I am a boy.

आय ऍम अ बॉय.

मी मुलगा आहे.

We are boys.

वी आर बॉईज.

आम्ही मुलगे आहोत.

I am a merchant.

आय ऍम अ मर्चन्ट.

मी व्यापारी आहे.

We are merchants.

वी आर मर्चन्ट्स.

आम्ही व्यापारी आहोत.

I am a pedlar.

आय ऍम अ पेडलर.

मी फेरीवाला आहे.

We are pedlars.

वी आर पेडलर्स.

आम्ही फेरीवाले आहोत.


I am a carpenter.

आय ऍम अ कार्पेन्टर.

मी सुतार आहे.

We are carpenters.

वी आर कारपेंटर्स.

आम्ही सुतार आहोत.

I am a painter.

आय ऍम अ पेंटर.

मी चित्रकार आहे.

We are painters.

वी आर पेंटर्स.

आम्ही चित्रकार आहोत.

I am a mason.

आय ऍम अ मेसन.

मी गवंडी आहे.

We are masons.

वी आर मेसेन्स.

आम्ही गवंडी आहोत.







Monday, November 8, 2021

Conversation Skill संभाषण कौशल्य

 Conversation Skill –     

( संभाषण कौशल्य भाग 01 )  

01.What’s your name , please ?

     कृपया ,आपले नाव काय आहे ?

02.What’s your father’s name ?

     आपल्या वडिलांचे नाव काय आहे ?

03.What’s your surname ?

     तुमचे आडनाव काय आहे ?

04.Where do you live ?

     तू कोठे राहतोस ?

05.Where do you work ?

     तू कोठे काम करतोस ?

06.How many brothers are you ?

    तुला किती भाऊ आहेत ?

07.How old are you ?

    तुझे वय काय ?

08.How tall are you ?

    तुझी उंची किती आहे ?

 

Conversation Skill –   

  ( संभाषण कौशल्य भाग 02 )  

09.How much do you weight ?

    तुझे वजन किती आहे ?

10.What is your birth date ?

     तुझी जन्मतारीख काय आहे ?

11.On which date were you born ?

     तुझा जन्म कोणत्या तारखेला झाला आहे ?

12.How do you go to school ?

      तू शाळेत कसा जातोस ?

13.Do you go by car or by bus ?

     तू मोटारीने जातोस की बसने ?

14.When do you go to school ?

     तू शाळेत केव्हा जातोस ?

15.When is your school over every day ?

     तुझी शाळा दररोज केव्हा सुटते ?

16.Do you like the city life ?

     तुम्हाला शहरी जीवन आवडते का ?

 

  Conversation Skill –   

   ( संभाषण कौशल्य भाग 03)  

17.Don’t you  like to live in the countryside ?

     तुम्हाला ग्रामीण भागात राहायला का आवडत नाही ?

18.When do you go to bed ?

     तुम्ही केव्हा झोपता ?

19.When do you sleep ?

     तुम्ही केव्हा झोपता ?

20.When do you wake up ?

    तुम्ही केव्हा जागे होता ?

21.When do you get up ?

     तुम्ही केव्हा निजून उठता ?

22.What’s your monthly salary ?

      तुमचे मासिक वेतन किती आहे ?

23.When are you going to retire ?

       तुम्ही सेवानिवृत्त केव्हा होणार आहात ?

24.Have you applied for voluntary retirement ?

     तुम्ही ऐच्छिक सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे का ?

 

   Conversation Skill –     

( संभाषण कौशल्य भाग 04 )  

25.Why did you cancel your plan of going abroad ?

     परदेशात जाण्याची तुमची योजना तुम्ही रद्द का केली ?

26.Haven’t you any chance of getting a better job than this one ?

     यापेक्षा अधिक चांगले काम मिळण्याची तुम्हाला संधी नाही का ?

27.What are you suffering from ?

     तुम्हाला काय त्रास होत आहे ?

28.What ails you ?

     तुम्हाला काय त्रास होत आहे ?

29.Aren’t you feeling well ?

     तुम्हाला बरे वाटत नाही का ?

30.Haven’t you yet consulted your family doctor ?

    तुम्ही अद्याप तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेला नाही का ?

31.Can you take a decision in this matter ?

      तू या बाबतीत निर्णय घेऊ शकतोस का ?

32.Why don’t you live in your village ?

     तुम्ही तुमच्या खेडेगावात का राहत नाही ?

 

Conversation Skill –   

     ( संभाषण कौशल्य भाग 05)  

33.Where are you coming from ?

     तुम्ही कोठून येत आहात ?

34.Are you going to join our team ?

      तुम्ही आमच्या संघात सामील होणार आहात का ?

35.Is she going to accompany you to America ?

     ती तुझ्याबरोबर अमेरिकेला येणार आहे का ?

36.Why didn’t you attend yesterday’s meeting ?

      कालच्या सभेला तू का हजार नव्हतास ?

37.Were you unwell ?

      तुला बरे नव्हते का ?

38.Is that man your colleague ?

     तो मनुष्य तुझा सहकारी आहे का ?

39.Don’t you know him at all ?

    तुम्ही त्याला अजिबात ओळखत नाही का ?

40.What is your father ?

      तुझ्या वडिलांचा व्यवसाय काय आहे ?

 

Conversation Skill – 

      ( संभाषण कौशल्य भाग 06 )

41.Are you satisfied with what you get ?

      तुला जे मिळतं त्यात तू समाधानी आहेस का ? 

42.Have you been to London ?

     तू लंडनला गेला आहेस का ?

43.What’s the population of this city ?

     या शहराची लोकसंख्या किती आहे ?

44.Which of these pens is yours ?

      या पेनांपैकी तुझे कोणते आहे ?

45.Which sport are you particularly interested in ?

      कोणत्या खेळामध्ये तुला विशेष गोडी आहे ?

46.Which medium do you prefer ,English or Marathi ?

      कोणते मध्यम तुला अधिक पसंत आहे ,इंग्रजी की मराठी ?

47.What are you worried about ?

      तुला कशाची काळजी वाटत आहे ?

48.Which college do you attend ?

       तू कोणत्या महाविद्यालयात जातोस ?

 

 

Conversation Skill –  

     ( संभाषण कौशल्य भाग 07 )

49.What are your qualifications ?

      तुझी शैक्षणिक अर्हता काय आहे ?

50.What is your mother tongue ?

      तुमची मातृभाषा कोणती आहे ?

51.o you know Urdu ?

      तुला उर्दू येते का ?

52.Can you speak the French language ?

      तुला फ्रेंच भाषा बोलता येते का ?

53.Which is the better exercise ,

running or swimming ?

       कोणता व्यायाम अधिक चांगला आहे ,

धावणे की पोहणे ?

54.What is wrong with that machine ?

       त्या यंत्रात काय बिघाड झाला आहे ?

55.Is this machine in working order ?

      हे यंत्र चालू स्थितीत आहे का ?

56.Are you going to appear for

 that examination ?

       तू त्या परीक्षेला बसणार आहेस का ?

 

 

Conversation Skill –

      ( संभाषण कौशल्य भाग 08 )

57.Must you go today ?

     तुला आज गेलेच पाहिजे का ?

58.Are you afraid of darkness ?

      तुला काळोखाची भीती वाटते का ?

59.Is it necessary for you to go today ?

      तुला आज जाणे आवश्यक आहे का ?

60.Why were those students 

absent yesterday ?

    काल ते विद्यार्थी गैरहजर का होते ?

61.Why are the children shouting ?

     मुलं का ओरडत आहेत ?

62.Are you qualified for that post ?

     तुम्ही त्या जागेसाठी पात्र आहात का ?

63.How far is Nehru planetarium

 from here ?

      नेहरू तारांगण येथून किती दूर आहे ?

64.What kind of a man is he ?

      तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे ?

 

 

Conversation Skill –  

     ( संभाषण कौशल्य भाग 09 )

65.What is your complaint

 against him ?

      तुझी त्याच्याविरुद्ध काय तक्रार आहे ?

66.Why don’t you lodge a 

complaint against your 

quarrelsome neighbour ?

   तुम्ही तुमच्या भांडखोर शेजाऱ्याविरुद्ध 

तक्रार का दाखल करत नाही ?

67.Did she complain about

 the food in that hotel ?

       तिने त्या हॉटेलमधील अन्नाबाबत 

तक्रार केली का ?

68.Why do you hate that 

person ?

       तू त्या व्यक्तीचा द्वेष का करतोस ?

69.Are you acquainted with 

that man ?

      तुमचा त्या माणसाशी परिचय आहे का ?

70.Do you know her ?

     तुम्ही त्यांना ओळखता का ?

71.Does she know you ?

     ती तुम्हाला ओळखता का ?

72.How long have you been 

living in Maharashtra ?

    तुम्ही महाराष्ट्रात किती काळ 

राहत आहात ?

 

Conversation Skill –

     ( संभाषण कौशल्य भाग 10)

73.Is this your car ?

    ही तुमची मोटार आहे का ?

74.Is this car yours ?

     ही मोटार तुमची आहे का ?

75.Whose car is that ?

     ती मोटार कोणाची आहे ?

76.Whose books are these ?

     ही पुस्तके कोणाची आहेत ?

77.Are these your books ?

     ही पुस्तके तुझी आहेत का ?

78.How much sugar do 

you take in tea ?

     तुम्ही चहात किती साखर घेता ?

79.Who doesn’t understand 

that passage ?

      तो उतारा कोणाला समजत नाही ?

80.Why don’t you work hard 

to achieve your goal ?

      तुझे ध्येय साध्य करण्यासाठी तू खूप 

परिश्रम का करत नाही ?

 

 

Conversation Skill – 

    ( संभाषण कौशल्य भाग 11 )

81.How can he account for

 his huge wealth ?

     त्याच्या प्रचंड संपत्तीचा 

खुलासा तो कसा करतो ?

82.Can you sing well ?

    तू चांगला गाऊ शकतोस का ?

83.Do you suspect any

 foul play in this matter ?

     या बाबतीत काही दगाफटका आहे 

असा तुम्हाला संशय आहे का ?

84.In which book have you 

read such things ?

     तू कोणत्या पुस्तकात अशा गोष्टी 

वाचल्या आहेत ?

85.Where did you find his 

books ?

     तुला त्याची पुस्तके कुठे सापडली ?

86.For whom are you working 

so hard ?

     तू इतके परिश्रम कोणासाठी करत आहेस ?

87.What do you know about 

such matters ?

      अशा गोष्टीबद्दल तुला काय माहित आहे ?
88.Why are you trying to mollify 

his anger ?

      तुम्ही त्यांचा राग शांत करण्यात प्रयत्न

 का करत आहात ?

 

 

Conversation Skill –

     ( संभाषण कौशल्य भाग 12 )

89.Are you angry with me ?

      तू माझ्यावर रागावला आहेस का ?

90.What do you mean ?

      तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे ?

91.What steps are being taken 

to improve the condition ?

     परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते उपाय 

केले जात आहेत ?

92.What happened when you 

opposed him ?

      तू त्याला विरोध केलास तेव्हा काय झालं ?

93.What do you want from me ?

      तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे ?

94.How are you going to pass

 your time here ?

      तू तुझा वेळ येथे कसा घालवणार आहेस ?

95.Since when has he been

working in that factory ?

    तो त्या कारखान्यात केव्हापासून काम करत आहे ?