Wednesday, December 24, 2025

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार

इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार 










  1. शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 
  2. अंग चोरणे - फारच थोडे काम करणे.
  3. अंगाची लाहीलाही होणे - अतिशय संताप निर्माण होणे.
  4. अंगात वीज संचारणे - अचानक बळ येणे .
  5. अंगवळणी पडणे - सवय होणे.
  6. ऊर भरून येणे - गदगदून येणे.
  7. कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.
  8. कपाळमोक्ष होणे - मृत्यू येणे / अचानक झालेल्या अपघातामुळे उद्ध्वस्त होणे.
  9. कपाळाला हात लावणे - हताश होणे , नाराजी दाखवणे.
  10. काढता पाय घेणे - प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे .
  11. कानउघाडणी करणे - चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
  12. कान उपटणे - कडक शब्दात समज देणे.
  13. कान टोचणे - खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
  14. कान निवणे - ऐकून समाधान होणे.
  15. कान फुंकणे - चुगली / चहाडी करणे.
  16. कानाने हलका असणे - कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
  17. कानामागे टाकणे - दुर्लक्ष करणे.
  18. कानाला खडा लावणे - एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
  19. कानावर हात ठेवणे - नाकबूल करणे.
  20. कानीकपाळी ओरडणे - एकसारखे बजावून सांगणे.
  21. कानांवर घालणे - लक्षात आणून देणे.
  22. कानोसा घेणे - अंदाज घेणे , चाहूल घेणे .
  23. केसाने गळा कापणे - घात करणे .
  24. कंठ दाटून येणे - गहिवरून येणे.
  25. कंठस्नान घालणे - शिरच्छेद करणे.
  26. कंठाशी प्राण येणे - खूप कासावीस होणे.
  27. कंबर कसणे - जिद्दीने तयार होणे.
  28. कंबर खचणे - धीर सुटणे .
  29. खांद्याला खांदा भिडवणे - सहकार्याने , एकजुटीने काम करणे.
  30. गळा काढणे - मोठ्याने रडणे.
  31. गळा गुंतणे - अडचणीत सापडणे.
  32. गळ्यात गळा घालणे - खूप मैत्री करणे.
  33. गळ्यातला ताईत होणे - अत्यंत आवडता होणे.
  34. गळ्यापर्यंत बुडणे - डबघाईला येणे,कर्जबाजारी होणे.
  35. चेहरा खुलणे - आनंद होणे.
  36. चेहरा पडणे - लाज वाटणे, खजील होणे, शरम वाटणे.
  37. छाती दडपणे - घाबरून जाणे , भीती वाटणे.
  38. जिभेला हाड नसणे - अद्वातद्वा बोलणे, वाटेल ते बोलणे .
  39. जीभ सैल सोडणे - वाटेल तसे/ ते बोलणे.
  40. जीव की प्राण असणे - खूप आवडणे.
  41. डोक्यावर खापर फोडणे - निर्दोष माणसावर दोष टाकणे.
  42. डोक्यावर बसवणे - फाजील / कमालीचे लाड करणे.
  43. डोळा असणे - पाळत ठेवणे.
  44. डोळा लागणे - झोप येणे.
  45. डोळे उघडणे - अनुभवाने सावध होणे.
  46. डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे.
  47. डोळे निवणे - समाधान होणे , पाहून बरे वाटणे.
  48. डोळे पांढरे होणे - मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
  49. डोळ्यांत अंजन घालणे - चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
  50. डोळ्यांत खुपणे - मत्सर करणे , सहन न  होणे.
  51. डोळ्यांत धूळ फेकणे - हातोहात / डोळ्यांदेखत / खोटेनाटे सांगून फसवणे .
  52. डोळ्याला डोळा न लागणे - झोप न येणे.
  53. डोळ्यांचे पारणे फिटणे - समाधान होणे , पाहून आनंदित होणे.
  54. डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे.
  55. डोळ्यांतून थेंब न काढणे - (आघात, दुःख होऊनही ) न रडणे.
  56. तळपायाची आग मस्तकी जाणे - अतिशय संतापणे.
  57. तोंड काळे करणे - कायमचे निघून जाणे .
  58. तोंडघशी पडणे - विश्वासघात होणे , अडचणीत येणे.
  59. तोंडघशी पाडणे - विश्वासघात करणे .
  60. तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे.
  61. तोंड देणे - सामना करणे, ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे.
  62. तोंड फिरवणे - नाराजी व्यक्त करणे.
  63. तोंड भरून बोलणे - मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
  64. तोंड वेंगाडणे - याचना करणे.
  65. तोंड सांभाळून बोलणे - जपून बोलणे.
  66. तोंडसुख घेणे - दोष देताना वाटेल तसे बोलणे.
  67. तोंडाची वाफ दवडणे - वायफळ बडबड करणे.
  68. तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.
  69. तोंडात शेण घालणे - पराकोटीची निंदा करणे .
  70. तोंडाला कुलूप घालणे - गप्प बसणे , तोंडातून ब्र सुद्धा न काढणे.
  71. तोंडाला तोंड देणे - भांडणे.
  72. तोंडाला पाणी सुटणे - हाव निर्माण होणे.
  73. दातओठ खाणे - चीड व्यक्त करणे.
  74. दात धरणे - सूड घेण्याची भावना बाळगणे.
  75. दात विचकणे - निर्लज्जपणे हसणे, वेंगाडणे , चिडवणे.
  76. दाताच्या कण्या करणे - वारंवार विनंती करणे.
  77. दाटी तृण  धरणे - सर्वार्थाने शरण जाणे.
  78. नजर चुकवणे - न दिसेल अशी हालचाल करणे , फसवणे .
  79. नवल वाटणे - आश्चर्य वाटणे , चकित होणे .
  80. नाक उडवणे - थट्टा / उपहास करणे.
  81. नाक कापणे - घोर अपमान करणे .
  82. नाक खुपसणे - नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे.
  83. नाक घासणे - लाचार होऊन माफी मागणे.
  84. नाक मुरडणे - नापसंती दाखवणे , उपहास व्यक्त करणे .
  85. नाकाने कांदे सोलणे - आगाऊपणे  शहाणपणा दाखवणे.
  86. नाकी नऊ येणे - फार दगदग होणे , दमणे.
  87. पाठ थोपटणे - शाबासकी देणे , कौतुक करणे .
  88. पाठ दाखवणे - समोरून पळून जाणे.
  89. पाठ पुरवणे - सारखे मागे लागणे , पिच्छा पुरवणे .
  90. पाठबळ असणे - आधार असणे .
  91. पाठीला पोट लागणे - उपाशी राहिल्याने हडकुळा होणे.
  92. पाय काढणे - प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे.
  93. पाय घसरणे - तोल जाणे , मोहात फसणे .
  94. पाय धरणे - शरण जाणे , माफी मागणे.
  95. पायबंद घालणे - आळा घालणे.
  96. पाय मोकळे करणे - फिरायला जाणे.
  97. स्वतःच्या पायावर उभे राहणे - स्वतंत्र होणे , स्वावलंबी होणे.
  98. (हसून हसून ) पोट दुखणे - खूप हसणे .
  99. पोटात आग पडणे - खूप भूक लागणे.
  100. पोटात कावळे कोकलणे - खूप भूक लागणे.
  101. पोटात ठेवणे - काहीही उघड न करणे , गुपित सांभाळणे.
  102.  पोटात शिरणे - मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे.
  103. पोटाला चिमटा घेणे - अत्यंत काटकसरीने राहणे.
  104. पोटावर पाय देणे - रोजंदारी बंद करणे.
  105. पोटाशी धरणे - माया करणे , कुशीत घेणे.
  106. प्राणापेक्षा जपणे - स्वतःच्या जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे.
  107. बोटावर नाचवणे - हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे.
  108. मांडीवर घेणे - दत्तक घेणे.
  109. मुठीत असणे - ताब्यात असणे.
  110. रक्त आटवणे - अतिकष्ट करणे.
  111. रक्ताचे पाणी करणे - अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे.
  112. हाडाची काडे करणे - अतिकष्ट करणे,अतिशय मेहनत करणे.
  113. हाडे खिळखिळी करणे - भरपूर चोप देणे.
  114. हात आखडणे - देण्याची क्षमता असूतानाही कमी देणे.
  115. हातघाईवर येणे - मारामारीची पाळी येणे.
  116. हातचा मळ असणे - एखादी गोष्ट सहज करता येणे.
  117. हात झटकणे - नामानिराळा होणे.
  118. हात टेकणे - नाईलाजाने शरण येणे .
  119. हात दाखवणे - मार देणे , फसवणे .
  120. हात देणे - मदत करणे.
  121. हात मारणे - ताव मारणे , भरपूर खाणे.
  122. हातातोंडाशी गाठ पडणे - जेमतेम खाण्यास मिळणे.
  123. हातापाया पडणे - लाचारीने विनवण्या करणे.
  124. हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून पळणे.
  125. (दोन)  हात करणे -  सामना करणे, टक्कर देणे .
  126. हृदय भरून येणे - गदगदून येणे, गहिवरून येणे.
  127. अभय देणे - भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे.
  128. अन्नान्न दशा येणे - अत्यंत दारिद्रयामुळे खायला न मिळणे.
  129. अन्नाला मोताद होणे - खायला न मिळणे.अन्नास जागणे - उपकार स्मरणे.
  130. आकाशपाताळ एक करणे - प्रयत्नांची परिसीमा गाठणे .
  131. आग पाखडणे - अतोनात संतापणे.
  132. आगीत उडी घेणे - स्वतःहून संकटात पडणे.
  133. आगीत तेल ओतणे - आधीच्या भांडणात आणखी भर घालणे.
  134. आभाळ कोसळणे - मोठे संकट येणे.
  135. आभाळ फाटणे - सर्व बाजूंनी संकटे येणे.
  136. आगेकूच करणे - निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे.
  137. आडवे होणे - झोपणे.
  138. आढेवेढे घेणे - इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे.
  139. उंटावरून शेळ्या हाकणे - प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे.
  140. आहुती देणे - बलिदान देणे.
  141. ओहोटी लागणे - उतरती कळा लागणे.
  142. अंत पाहणे - अखेरची ,मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे, सतत त्रास देऊन हैराण करणे.
  143. कणीक तिंबणे - खूप मारपीट करणे.
  144. कळ लावणे - भांडण लावणे.
  145. कचाट्यात सापडणे - तावडीत सापडणे.
  146. कडेलोट करणे - त्रास देण्याची परिसीमा गाठणे.
  147. करामत करणे - चमत्कार करणे.
  148. काट्याने काटा काढणे - दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे.
  149. कुरघोडी करणे- दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे .
  150. कुंपणाने शेत खाणे - ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे.
  151. कोंड्याचा मांडा करणे - हालाखीच्या परिस्थितीतही काटकसरीने ; समाधानाने राहणे.
  152. खजील होणे - केलेल्या चुकीची लाज वाटणे, शरम वाटणे.
  153. खडे चारणे - पराभव करणे.
  154. खडे फोडणे - दुसऱ्याला दोष देत राहणे.
  155. खळगी भरणे - पोट भरणे.
  156. खाजवून खरुज काढणे - भांडण उकरून काढणे.
  157. खो घालणे - एखाद्या कामात विघ्न आणणे.
  158. खोड मोडणे - अद्दल घडवणे.
  159. 'ग' ची बाधा होणे - गर्व होणे.
  160. गंध नसणे - अजिबात ज्ञान / माहिती नसणे.
  161. गर्क असणे - गुंतून राहणे,मन रंगाने, मग्न राहणे.
  162. गट्टी जमणे - मैत्री होणे.
  163. गहिवरून जाणे -  मनातून गलबलून जाणे.
  164. घर चालणे - कुटुंबाचा निर्वाह होणे.
  165. घरोबा असणे - जिव्हाळ्याचे संबंध असणे.
  166. घर डोक्यावर घेणे - खूप गोंगाट करणे.
  167. घाम जिरवणे - खूप कष्ट करणे, घाम गाळणे.
  168. घोकंपट्टी करणे - पाठांतर करणे, तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणणे.
  169. चाल करून येणे - हल्ला करणे.
  170. चाहूल घेणे - अंदाज घेणे,लक्ष देऊन ऐकणे,कानोसा घेणे.
  171. चीज होणे- घेतलेली मेहनत सफल होणे.
  172. चुळबूळ करणे -अस्वस्थ होऊन हालचाल करणे.
  173. चंग बांधणे - निश्चय करणे.
  174. जीवाचे रान  करणे - प्रयत्नांची पराकाष्ठा करणे.
  175. जीवात जीव येणे - हायसे वाटणे, सुटकेची भावना निर्माण होणे.
  176. जिवाला जीव देणे - वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे.
  177. जीव तिळतीळ तुटणे - खूप हळहळणे .
  178. जीव भांड्यात पडणे - सुटकेची भावना निर्माण होणे.
  179. जंग जंग पछाडणे - कसून शोध घेणे.
  180. जळून खाक होणे - पूर्ण जळणे , राख होणे.
  181. झुंबड उडणे - गर्दी होणे .
  182. टेंभा मिरवणे - ऐट दाखवणे.
  183. टोमणा मारणे - खोचक बोलणे.
  184. टंगळमंगळ करणे - काम टाळणे,चालढकल करणे.
  185. डाव साधणे - संधी मिळताच जिंकणे,मतलब साधणे.
  186. डाल न शिजणे - काम न साधणे .
  187. तणतणत निघून जाणे - रागाने निघून जाणे.
  188. तमा नसणे - पर्वा नसणे.
  189. तावडीतून सुटणे - कचाट्यातून सुटणे.
  190. ताकास तूर लागू न देणे - थांगपत्ता लागू न देणे.
  191. तिखट बोलणे - जहाल बोलणे.
  192. तिळपापड होणे - अतिशय संताप होणे.
  193. तोड नसणे - योग्यतेचे दुसरे नसणे.
  194. दवंडी पिटणे - जाहीर करणे, सर्वांना सांगणे.
  195. दिवस पालटणे - परिस्थिती बदलणे.
  196. दिवस फिरणे - वाईट दिवस येणे.
  197. दुथडी भरून वाहणे - मोठ्या प्रमाणात विपुलता असणे.
  198. धडकी भरणे - खूप भीती वाटणे.
  199. धडगत नसणे -  संकटातून सुटण्याची आशा न उरणे.
  200. धाबे दणाणणे - खूप घाबरणे.
  201. धारातीर्थी पडणे - लढता लढता वीरमरण येणे.
  202. धुळीला मिळणे - नाश होणे, दुर्दशा होणे.
  203. धूम ठोकणे - पळून जाणे.
  204. धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.
  205. नाव मिळवणे - कीर्ती मिळवणे.
  206. नाव सोनेरी अक्षरात उमटवणे - चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे,अजरामर होणे,नाव कायमचे कोरले जाणे.
  207. निपचित पडणे - स्थिर,हालचाल न करता पडलेले राहणे.
  208. पदरमोड करणे - स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे.
  209. पराचा कावळा करणे - अतिशयोक्ती करणे.
  210. पसार होणे - पळून जाणे ,गायब होणे.
  211. पाचावर धारण बसणे - भयभीत होणे.
  212. पाणी पडणे - वाया जाणे.
  213. पाणी पाजणे - पराजित करणे.
  214. पाणी सोडणे - त्याग करणे.
  215. पाण्यात पाहणे - द्वेष करणे.
  216. पारडे फिरणे - परिस्थिती एकदम बदलणे.
  217. पारा चढणे - संताप होणे.
  218. पित्त खवळणे - खूप राग येणे.
  219. पोपटपंची करणे - अर्थ न समजता पाठ करणे.
  220. पोबारा करणे - पळून जाणे.
  221. पोरका / पोरकी होणे - अनाथ होणे.
  222. पैसे झाडाला लागणे - सहजपणे अतोनात पैसे मिळत राहणे.
  223. फडशा पाडणे - खाऊन टाकणे , ठार मारणे,नाश करणे.
  224. बस्तान बसवणे - स्थिरस्थावर होणे.
  225. बाजी मारणे - विजयी होणे, यशस्वी होणे.
  226. बुचकळ्यात पडणे - गोंधळ होणे,गोंधळून जाणे.
  227. भान हरपणे - गुंगून जाणे , तल्लीन होणे.
  228. भीतीने थरथर कापणे - खूप घाबरणे , थरकाप होणे.
  229. भंडावून सोडणे - गोंधळून टाकणे , सतावून सोडणे.
  230. मरणाला मिठी मारणे - स्वतःहून मरण ओढवून घेणे.
  231. माशी शिंकणे -  कामात विघ्न येणे.
  232. माश्या मारणे - काहीही न करता वेळ घालवणे.
  233. माग काढणे - शोध घेणे.
  234. मागावर असणे - शोधत असणे , पाळतीवर असणे.
  235. मात करणे - विजय मिळवणे.
  236. मात्रा न चालणे - इलाज न चालणे .
  237. मूग गिळणे - दुर्लक्ष करून गप्प बसणे.
  238. मेतकूट जमणे - खूप मैत्री होणे.
  239. रंगत येणे - खूप मजा येणे.
  240. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे - निष्कारण नको त्या उठाठेवी करणे.
  241. लालूच दाखवणे - मोहात पाडणे.
  242. वचपा काढणे - बदला घेणे , सूड घेणे.
  243. वाट लागणे - नष्ट होणे , नुकसान होणे.
  244. वाटेस जाणे - खोडी काढणे.
  245. वाकुल्या दाखवणे - चिडवणे.
  246. वाली भेटणे - आधार देणारा माणूस भेटणे.
  247. वीरश्री संचारणे - विजयाची उमेद निर्माण होणे.
  248. शोभा करणे - वाभाडे काढणे , निर्भर्त्सना करणे.
  249. शोभा होणे - नाचक्की होणे.
  250. शंख करणे - आरडाओरडा करणे.
  251. सळो की पळो करणे - सतावून सोडणे.
  252. सवड मिळणे - मोकळा वेळ मिळणे.
  253. सुसाट पळणे - वेगात पळणे , जोरात पळणे.
  254. सुळसुळाट होणे - अमर्याद वाढ होणे.
  255. सुळावर चढवणे - फाशी देणे.
  256. सैरावैरा पळणे - वाट मिळेल तिकडे पळणे.
  257. हट्टास पेटणे - स्वतःचे खरे करण्यासाठी वाट्टेल ते करणे .
  258. हमरीतुमरीवर येणे - वादाला भांडणाचे स्वरूप येणे.
  259. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करणे.
  260. हाती काही न लागणे - काहीच फायदा न होणे.
  261. हाय खाणे - धास्ती घेणे, मोठ्या दुःखामुळे मन खचत जाणे .
  262. हां हां म्हणता पसरणे - अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे.
  263. हुलकावणी देणे - फसवणे , चकवणे .
  264. हेळसांड करणे - आबाळ करणे. 
  265. होळी करणे  - चांगल्या गोष्टींचा नाश करणे .