Showing posts with label मराठी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ. Show all posts
Showing posts with label मराठी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ. Show all posts

Monday, August 29, 2022

वाक्प्रचार व त्यांचा अर्थ


    


      


      वाक्प्रचार व त्यांचे अर्थ 

 1.डोळे दिपणे - आनंदाने डोळे चमकणे.

 2.जाहीर करणे - सर्वांना सांगणे.

 3. आभार मानणे- कृतज्ञता व्यक्त करणे,            धन्यवाद देणे.

 4. खजील होणे - शरम वाटणे.

 5. आश्चर्यचकित होणे - नवल वाटणे.

 6. मान्य करणे - कबूल करणे.

 7. स्वैर हिंडणे - मोकाट फिरणे.

 8. भक्ष्य मिळवणे - अन्न मिळवणे.

 9. बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.

 10. मन मोहून टाकणे - मन गुंतून पडणे.

 11. स्वाधीन करणे - देणे सुपूर्द करणे.

 12. साह्य करणे - मदत करणे.

13. काया झिजवणे -

         दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट करणे.


 14. गौरव करणे - सन्मान करणे.

 15. भान हरपणे - गुंग होणे.

 16. सौजन्य दाखवणे -

             चांगुलपणा दाखवणे.

 17. आज्ञा पाळणे - आदेश मानणे.

 18. वंदन करणे - नमस्कार करणे.

 19. वेळ खर्च करणे -

            वेळ सत्कारणी लावणे.

 20. पसार होणे - पळून जाणे, निघून जाणे.

 21. रंगून जाणे -

           गुंग होणे, मग्न होणे, गर्क होणे.

 22. पांगापांग होणे - गर्दी विरळ होणे.

 23. भडीमार करणे - जोराचा मारा करणे.

 24. बाजू घेणे - कड घेणे,म्हणणे पटणे.

 25. हुशारी येणे - तरतरी येणे, बरे वाटणे.

 26. तणतणणे - रागाने बडबडत जाणे.

 27. अभिवादन करणे - नमस्कार करणे.

 28. स्वागत करणे -

         चांगल्या प्रकारे या म्हणणे.

 29. मार्ग काढणे - 

           रस्ता काढणे बाहेर पडणे.

 30.  मलूल होणे  - निस्तेज होणे कोमेजणे.

 31. करुणा उत्पन्न होणे - दया उत्पन्न होणे.

 32. अपशब्द वापरणे -

             वाईट शब्द उच्चारणे.

 33. सल्लामसलत करणे -

             विचारविनिमय करणे.

34.  दर्शन घेणे - पाहणे, भेटणे.

 35. हात पाय हलवणे - काम करणे.

 36. ऐट दाखवणे - रुबाब दाखवणे.

 37. शरीर राबवणे - कष्ट करणे.

 38. खांद्याला खांदा लावून काम करणे

    - एकमेकांना सहकार्य करून काम करणे.

 39.अभिमान वाटणे -

       योग्य असा गर्व वाटणे.

 40. निश्चय करणे - ठाम निर्धार करणे.

 41. वसाहत करणे -  वस्ती करणे.

42.धारण करणे - अंगीकारणे.

 43.हौस असणे - आवड असणे.

 44.नाद लागणे -

       आवड निर्माण होणे, छंद जडणे.

 45. हट्ट धरणे -  हेका धरणे.

 कौतूक वाटणे - अप्रूप वाटणे.

 स्फूर्ती मिळणे - प्रेरणा मिळणे.

 



Saturday, October 30, 2021

मराठी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ

 



                    वाक्प्रचार व त्यांचा अर्थ  : -

    1. आभाळ गच्च भरणे - आभाळात पावसाचे ढग भरणे.
    2. खंत करणे- काळजी करणे,विवंचना करणे .
    3. पुटपुटणे – स्वतःशी बोलणे .
    4. दिड़्.मूढ होणे – चकित होणे .
    5. मोहात पाडणे- भुरळ पाडणे.
    6. पक्का निर्धार करणे- ठाम निश्चय करणे.
    7. धक्का बसणे – मनाला हादरा बसणे.
    8. हळहळणे – वाईट वाटणे.
    9. स्वप्नात हरवणे- मनोमन गुंग होणे.
    10. थक्क होणे – आश्चर्यचकित होणे,नवल वाटणे .
    11. वळण लागणे – वर्तनात अनुकूल बदल होणे.
    12. स्वतःच्या पायावर उभे राहणे – स्वावलंबी होणे .
    13. अंतःकरण भरून येणे – सद्गदित होणे.
    14. जाणीव होणे- कळणे,समजणे.
    15. तोंडाला पाणी सुटणे- हाव सुटणे ,मोह पडणे.
    16. माफी मागणे – क्षमा मागणे ,दिलगिरी व्यक्त करणे.
    17. खाली मान घालणे – शरम वाटणे .
    18. संधी हुकणे – मोका निसटणे .
    19. वादावादी होणे – भांडण होणे.
    20. मैदान गाजवणे – खेळात प्राविण्य मिळवणे.
    21. एका पायावर तयार असणे- सदैव तत्पर असणे .
    22. आपला वाटणे- जवळचा वाटणे.
    23. वारे वाहू लागणे – सारखी चर्चा होणे.
    24. हिरमुसणे – उदास होणे,नाराज होणे,निराश होणे.
    25. आनंद गगनात न मावणे- खूप आनंद होणे.
    26. कपाळावर आठ्या पसरणे- खटकणे.
    27. बजावून सांगणे – निक्षून सांगणे .
    28. पाल चुकचुकणे – वाईट गोष्टींचा संकेत मिळणे.
    29. मन खट्टू होणे- वाईट वाटणे,नाराज होणे.
    30. उत्साह ओसंडून वाहणे – खूप आनंद होणे.
    31. पाय मुरगळणे- पाय वाकडा होणे.
    32. अपशकून मानणे – वाईट शंका येणे .
    33. पाठीवर हात ठेवणे – दिलासा देणे .
    34. धमाल करणे- मजा करणे.
    35. पोट धरून हसणे- खूप हसणे .
    36. खळखळून हसणे – मोठ्याने खो खो हसणे.
    37. चलबिचल होणे- मनात अस्वस्थ होणे.
    38. कावराबावरा होणे – भयभीत होणे , गोंधळने .
    39. डोक्यात लख्ख प्रकाश पडणे – पूर्णपणे समजणे.
    40. मत परिवर्तन होणे – विचारात बदल होणे.
    41. ताब्यात घेणे – सर करणे.
    42. माहिती पुरवणे – तपशील देणे .
    43. विस्तार करणे – वाढवणे, विस्तृत करणे.
    44. निरीक्षण करणे – नीट पाहणी करणे .
    45. वास्तव्य करणे – एका जागी राहणे .
    46. दर्शन घेणे – डोळ्यांनी पाहणे .
    47. ऊर अभिमानाने भरून येणे – मनात अभिमान दाटणे.
    48. मुकणे – संधी न मिळणे .
    49. उदरनिर्वाह करणे – पोट भरणे.
    50. श्रीगणेशा होणे – सुरुवात होणे, आरंभ होणे.
    51. चीत करणे – प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टेकवणे.
    52. पट काढणे – प्रतिस्पर्धी मल्लाची टांग खेचणे .
    53. धडे आत्मसात करणे – कौशल्य मिळवणे .
    54. तमा न बाळगणे – न जुमानणे,पर्वा न करणे.
    55. डोक्याला हात लावून बसणे – हताश होणे.
    56. ध्यानात येणे – लक्षात येणे .
    57. मरण ओढवणे – मृत्यू येणे .
    58. आक्रीत घडणे – वाईट होणे.
    59. उपदेश करणे – शिकवण देणे .
    60. मनासारखे घडणे – हवे ते मिळणे .
    61. वाट्याला येणे – नशिबी येणे .
    62. भोगावे लागणे – सहन करावे लागणे .
    63. बोटे मोडणे – दोष देणे .
    64. टस की मस न होणे – काहीही फरक न पडणे.
    65. प्रथा पडणे – रिवाज असणे,रीत लागू होणे.
    66. बट्ट्याबोळ होणे – फासणे.
    67. बोट ठेवणे – दोष दाखवणे .
    68. फैर झाडणे – सरबत्ती सुरु होणे.
    69. आलबेल असणे – ठाकठीक असणे .
    70. अवसान गोळा होणे – धीर गोळा होणे .
    71. कळवळणे – वेदना होणे.
    72. हात चोळत गप्प बसणे – नाईलाजाने गप्प होणे.
    73.  डावा निघणे – कमी प्रतीचा निघणे.
    74. डावे उजवे मानणे – भेद करणे.
    75. अंतःकरण जड होणे – दुःख होणे.
    76. भ्रमनिरास होणे – विश्वास उडणे.
    77. मन हलके होणे – मनावरील ओझे उतरणे.
    78. पळ काढणे – पळून जाणे.
    79. पोटात गोळा येणे – घाबरणे,धास्तावणे.
    80. शिरोधार्य मानणे – अग्रक्रम देणे.
    81. ताठा कमी करणे – अहंकार कमी करणे.
    82. हात कपाळाला लावणे – हताश होणे.
    83. तोंडात बोट घालणे – आश्चर्य वाटणे.
    84. हैराण करणे – त्रास देणे .
    85. झुंबड उडणे – खूप गर्दी होणे.
    86. मान्यता मिळणे – परवानगी मिळणे.
    87. धाकधूक होणे – भीती वाटणे.
    88. बिघाड होणे – नादुरुस्त होणे.
    89. आवर्जून सांगणे – मुद्दामहून सांगणे .
    90. भर घालणे – आहे त्यात अधिक जोडणे.
    91. मार्गदर्शन करणे – योग्य माहिती देणे.
    92. संकल्प करणे – निश्चय करणे, निर्धार करणे.
    93. शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचविणे – शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करणे.
    94. धन्यवाद देणे  – आभार मानणे.
    95. विचारांचा पगडा असणे – विचारांचा प्रभाव असणे.
    96. बारीक लक्ष असणे – बारकाईने न्याहाळणे .
    97. प्रोत्साहन देणे – उत्तेजन देणे .
    98. आस्था असणे – कळकळ असणे, आवड असणे.
    99. अभिवादन करणे – वंदन करणे.
    100. हातभार लावणे – मदत करणे.
    101. संदेश देणे – बहुमोल विचार देणे ,शिकवण देणे .
    102. स्थापन करणे – निर्माण करणे .
    103. अहोरात्र झटणे – रात्रंदिवस कष्ट करणे.
    104. न डगमगणे – न घाबरणे .
    105. स्थानापन्न होणे – (खुर्चीवर) बसणे.
    106. भूमिका पार पाडणे – दिलेले कार्य व्यवस्थित पार पाडणे.
    107. संपन्न होणे – पार पडणे.
    108. आकाशाला गवसणी घालणे – अश्यक्य गोष्ट प्राप्त करण्यास धडपडणे .
    109. खडकातून पाणी काढणे – कठीण व अशक्य वाटणारी गोष्ट करणे.
    110. डोंगर रचणे – खूप मेहनत करणे.
    111. मनस्ताप सहन करणे – मानसिक त्रास सोसणे.
    112. राखण करणे – रक्षण करणे.
    113. पाठ टेकवणे – आराम करणे , झोपणे.
    114. सोन्याचे दिवस येणे – समृद्धी येणे .
    115. मनाला वेडावून टाकणे – मन मोहून टाकणे .
    116. निरुपाय होणे – उपाय नसणे,इलाज न चालणे .
    117. टिपून मारणे – नेम धरून मारणे.
    118. समीकरण मांडणे – सूत्रबद्ध रचना करणे.
    119. वारसा लाभणे – परंपरागत अधिकार मिळणे.
    120. शोध घेणे – मागोवा घेणे .
    121. प्रेरणा घेणे – स्फूर्ती घेणे .
    122. दाद देणे – वाहवा करणे.
    123. मान देणे – आदर दाखवणे .
    124. पाचारण करणे – बोलावणे .
    125. प्रकट करणे – उघड करणे.
    126. मोहोर उमटणे – ठसा उमटणे .
    127. टुमणे लावणे – सतत मागणी करणे.
    128. कान भरणे – उलट-सुलट सांगणे.
    129. दोन हात करणे – सामना करणे ,लढाई करणे.
    130. प्राणाचे मोल देणे – प्राण गमावणे.
    131. पाठ दाखवणे – पळून जाणे.
    132. अचूक वेध घेणे – न चुकता नेम साधणे.
    133. प्रतिकार करणे – विरोध करणे.
    134. प्राणाची पर्वा न करणे – मरणाची भीती न बाळगणे.
    135. उड्डाण करणे – झेप घेणे .
    136. निर्दालन करणे – समूळ नाश करणे .
    137. प्रदान करणे – सन्मानाने बहाल करणे/ देणे.
    138. प्राणाची आहुती देणे – प्राणाचे बलिदान करणे.
    139. वंदन करणे – नमस्कार करणे.
    140. सेवा बजावणे – सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडणे .
    141. परिधान करणे – अंगात घालणे.
    142. मन उल्लसित करणे – मन प्रसन्न करणे.
    143. झुंबड उडणे- खूप गर्दी होणे.
    144. थाप पडणे- पाठिंबा मिळणे.
    145. आठवणींना उजाळा देणे – पुन्हा स्मरण होणे.
    146. अंथरूण धरणे- आजारात अंथरुणाला खिळून राहणे.
    147. जीव तीळ तीळ तुटणे – खूप काळजी वाटणे.
    148. बलिदान देणे – प्राण समर्पित करणे.
    149. अंतरंगाचा ठाव घेणे – मनात खोलवर जाणवणे.
    150. ढसाढसा रडणे – ओक्साबोक्शी जोराने रडणे.
    151. डोळ्यांतले पाणी न हटणे – सतत अश्रू वाहत राहणे.
    152. जीव घाबराघुबरा होणे – खूप भीती वाटणे.
    153. मन सैरभैर होणे – मनात बेचैनी दाटणे.
    154. मन हेलावणे – मन गलबलणे.
    155. कुशीत घेणे – पोटाशी घेणे,माया करणे.
    156. लाड करणे – कौतुक करणे.
    157. विचारांचे काहूर माजणे – विचारांनी मन घेरणे.
    158. विपरीत घडणे – वाईट घडणे.
    159. कानोसा घेणे – अंदाज घेणे , मागोवा घेणे .
    160. मन आतुरणे – मन उत्सुक होणे .
    161. पुळका येणे – बाजू घेणे .
    162. भरती होणे – दाखल होणे .
    163. हात पसरणे – मदत मागणे .
    164. हायसे वाटणे – समाधान वाटणे .
    165. ध्यान देणे – लक्ष देणे .
    166. विचारात गढणे – खूप विचारात बुडणे.
    167. हरखून जाणे – आनंदी होणे .
    168. भान हरपणे – जाणीव न उरणे .
    169. हट्ट करणे – आग्रह धरणे.
    170. उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे .
    171. प्रभाव असणे – ठसा असणे.
    172. सामील होणे – सहभागी होणे.
    173. आढेवेढे घेणे – अनिच्छा व्यक्त करणे.
    174. त्याग करणे – सोडून देणे .
    175. रखडत चालणे – अडखळत चालणे .
    176. दुखापत होणे – इजा होणे.
    177. धडा शिकणे – अद्दल घडणे , समज येणे.
    178. हातभार लावणे – मदत करणे.
    179. धूम ठोकणे – पळून जाणे .
    180. दम लागणे – धाप लागणे .
    181. कटकट वाटणे – त्रास वाटणे .
    182. बचत करणे – भविष्यासाठी संग्रह करणे.
    183. वणवण करणे – उन्हात पायपीट करणे , भटकणे .
    184. नष्ट होणे – नाहीसे होणे .
    185. खालावत जाणे – कमी होत जाणे.
    186. वाया न घालवणे – फुकट जाऊ न देणे .
    187. अपव्यय टाळणे – दुरुपयोग न करणे .
    188. रूढ होणे – कायम होणे.
    189. तुटवडा असणे – कमतरता असणे .
    190. पटाईत असणे – तरबेज असणे.
    191. शपथ घेणे – प्रतिज्ञा करणे.
    192. बेधुंद होणे – बेभान होणे.
    193. धरतीवर कोसळणे – मरण पावणे .
    194. दुःख गिळणे – दुःख पचवणे.
    195. कथा लावणे – प्रवचन करणे.
    196. आसमंतात घुमणे – अवकाशात नाद फिरत राहणे .
    197. दणाणून सोडणे – सतत आवाज होत राहणे .
    198. रिंगण धरणे – फेर धरणे .
    199. आभाळाकडे डोळे लावून बसणे – पावसाची आतुरतेने वाट पाहणे .
    200. आभाळाची कुऱ्हाड पडणे – मोठे संकट येणे.
    201. काळीज दगडाचे होणे – मन घट्ट करणे.
    202. ओस पडणे – भकास होणे, उजाड होणे.
    203. जीव वरखाली होणे – काळजी वाटणे.
    204. अप्रूप वाटणे – कौतुक वाटणे .
    205. विचारपूस करणे – चौकशी करणे.
    206. थैमान घालणे – उच्छाद मांडणे.
    207. हलकल्लोळ उडणे – हाहाकार माजणे .
    208. युद्धापातळीवर हालचाली करणे – ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे.
    209. हेळसांड करणे – दुर्लक्ष करणे.
    210. वाईट दिवस येणे – हलाखीची परिस्थिती निर्माण होणे.
    211. उत्तेजन देणे – प्रोत्साहन देणे.
    212. सुळावर चढवणे – फासावर लटकावणे .
    213. कडेलोट करणे – उंच कड्यावरून ढकलून देणे.
    214. हसून हसून पोट दुखणे – खूप हसू येणे, बेफाम हसणे.
    215. तोंड सुकणे – चेहरा निस्तेज होणे,चेहरा फिका पडणे.
    216. जळून खाक होणे – जळून नाश पावणे.
    217. तहानभूक हरपणे- तहानभूक विसरून गुंग होणे.
    218. फसगत होणे- फसवणूक होणे.
    219. ऐटी मिरवणे – तोरा मिरवणे,रुबाब करणे.
    220. तोंडावर हसू फुटणे – पटकन हसू येणे.
    221. वाहवा मांडणे – स्तुती करणे ,कौतुक करणे.
    222. हेवा करणे – मत्सर किंवा द्वेष करणे .
    223. तोंडात बोट घालणे – आश्चर्य वाटणे, नवल वाटणे.
    224. हात बसणे – पक्का सराव होणे ,कुशलता येणे .
    225. उदरनिर्वाह करणे – पोट भरणे.
    226. ध्यान लावणे – डोळे मिटून एकाग्र होणे.
    227. निरुत्तर होणे – उत्तर न सुचणे.
    228. गुजराण करणे – पोट भरणे.
    229. आत्मसात करणे – मिळवणे.
    230. तल्लीन होणे – गुंग होणे,मग्न होणे.
    231. सहभागी होणे – सामील होणे.
    232. गौरव करणे – सन्मान करणे.
    233. व्याकूळ होणे – कासावीस होणे.
    234. ठावठिकाणा नसणे – पत्ता न सापडणे.
    235. हात जोडणे – नम्रपणे विनंती करणे.
    236. प्रसंगावधान राखणे – तत्परतेने निर्णय घेणे.
    237. निपचित पडणे – हालचाल न होता पडून राहणे.
    238. काळजात धस्स होणे – खूप घाबरणे .
    239. भेदरलेल्या नजरेने पाहणे – घाबरलेल्या नजरेने पाहणे .
    240. हायसे वाटणे – समाधान वाटणे.
    241. डोळे पाणावणे – डोळ्यात अश्रू येणे,रडवेले होणे.
    242. प्रसंगाचे गांभीर्य जाणणे- परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे.
    243. मार्गी लागणे – नीट व्यवस्थित करणे.
    244. अश्रूला वाट मोकळी करून देणे – मोकळेपणाने रडणे.
    245. कुरवाळणे – अंगावरून प्रेमाने हात फिरवणे.
    246. पाय धरणे- लीन होऊन नमस्कार करणे,क्षमा मागणे.
    247. कंबर धरणे – कंबर दुखणे .
    248. वाट वाकडी करणे – वाट बदलून दुसरीकडे जाणे .
    249. रात्रंदिवस घाम गाळणे – दिवसरात्र खूप कष्ट करणे.
    250. चिटपाखरू नसणे – नीरव शांतता असणे.
    251. झेंडू फुटणे- भीतीमुळे तोंडाला फेस येणे.
    252. धाबे दणाणणे – खूप भीती वाटणे.
    253. जीवात जीव नसणे – खूप घाबरणे.
    254. अंग घामाने थबथबणे – घाबरल्यामुळे घामाघूम होणे.
    255. तोंडावाटे शब्द न फुटणे – खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे.
    256. कालवा उडणे – कोलाहल माजणे,गडबडगोंधळ होणे.
    257. धाप लागणे – खूप पळाल्यामुळे दम लागणे.
    258. दूम नसणे – ठावठिकाणा नसणे ,पत्ता नसणे.
    259. विसर पडणे – विस्मरण होणे .
    260. पोटात खड्डा पडणे – खूप भीती वाटणे .
    261. जिवाचा धडा करणे – धीर एकवटणे .
    262. पाठबळ असणे – आधार असणे .
    263. घास मोडणे – जेवणे .
    264. पोटात घाबरा पडणे – खूप घाबरणे .
    265. पायाखालची जमीन हादरणे – भीतीने सुचेनासे होणे .
    266. नाराज होणे – निराश होणे , वाईट वाटणे ,हिरमुसणे .
    267. सार्थकी लागणे – धन्यता पावणे .
    268. गणती करणे – मोजणी करणे .
    269. प्रफुल्लित होणे – आनंदित होणे .
    270. माग काढणे – वाट काढणे , रस्ता शोधणे .
    271. तत्पर असणे – तयार असणे .
    272. पळ काढणे – पळून जाणे.
    273. दाह होणे – आग होणे ,जळजळणे .
    274. ताव मारणे – खूप खाणे ,खाण्यावर तुटून पडणे.
    275. सुगावा लागणे – मागोवा लागणे , अंदाज लागणे.
    276. दिलासा मिळणे – धीर मिळणे .
    277. कणखर बनणे – काटक बनणे .
    278. ओढाताण होणे – कष्टदायक ,त्रासदायक धावपळ होणे.
    279. गराडा पडणे – घेराव पडणे .
    280. नात्यातील वीण गहिरी असणे – नाते घट्ट असणे .
    281. वणवण सहन करणे – त्रासदायक भटकंती सहन करणे.
    282. समजूत काढणे – गैरसमज दूर करणे .
    283. नाव उंच करणे – कीर्ती संपादन करणे ,मानाचे स्थान मिळवणे .
    284. दबदबा निर्माण करणे – दरारा निर्माण करणे.
    285. हिऱ्याला पैलू पाडणे – तरबेज करणे.
    286. सांभाळ करणे – पालनपोषण करणे.
    287. राब राब राबणे – खूप कष्ट करणे.
    288. परिस्थितीशी झगडणे – वाईट स्थितीचा मुकाबला करणे.
    289. कमीपणा वाटणे – अपमान वाटणे.
    290. खंत वाटणे – खेद वाटणे, वाईट वाटणे.
    291. कसूर न करणे – चूक न करणे,दुर्लक्ष न करणे.
    292. खंड पडणे – मध्येच थांबणे .

 

 

 

 

 

 

Thursday, October 21, 2021

मराठी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ


नमस्कार विद्यार्थीमित्रांनो,
मराठी वाक्प्रचार व त्यांचा अर्थ अभ्यासताना त्यांचा वाक्यात उपयोग कसा करावा? यासाठी अत्यंत उपयुक्त व्हिडीओ पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.
 


 


वाक्प्रचार  व त्यांचा अर्थ –
 वाक्प्रचार  हा शब्दशः सरळ असलेल्या  अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो.
उदा.  रमाताईंनी  त्यांच्या अमरला  डोक्यावर बसवून ठेवल्यामुळे ,दिवसेंदिवस तो अधिकच हट्टी होत चालला आहे .
वरील वाक्यातील ‘डोक्यावर बसवून ठेवणे’ याचा अर्थ ‘डोक्यावर बसवणे’ असा शब्दशः सरळ अर्थ न होता ;
 तर ‘ शेफारून ठेवणे’ , ‘लायकीपेक्षा अधिक महत्व देणे’ ,असा होतो.खोडी उलटणे – आपण केलेली खोडी अंगाशी येणे .
  1. शाळा बुडवणे – शाळेला दांडी मारणे .
  2. परवानगी मिळणे – मोकळीक मिळणे .
  3. रक्ताचे पाणी करणे – खूप कष्ट करणे .
  4. आभाळ ठेंगणे होणे – खूप आनंद होणे .
  5. निरुत्तर होणे – एखाद्याच्या प्रश्नाने अबोल होणे .
  6. पोटतिडकीने बोलणे – मनापासून कळकळीने बोलणे .
  7. अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे ,नवल वाटणे .
  8. डोळे पाणावणे – डोळ्यांत अश्रू दाटणे.
  9. गहिवरून येणे – हृदय भावनेने भरून येणे .
  10. कित्ता गिरवणे – एखादा वागेल तसे वागणे .
  11. झटत राहणे- सतत प्रयत्न करणे
  12. कडकडून भेटणे – घट्ट मिठी मारणे .
  13. मायेचा वर्षाव करणे – खूप प्रेम करणे .
  14. थंडीने कुडकुडणे – खूप थंडी वाजणे.
  15. डोळा लागणे – झोप लागणे .
  16. पोटात कावळे ओरडणे – खूप भूक लागणे .
  17. टाळाटाळ करणे – एखादी गोष्ट करायची टाळणे .
  18. कडाक्याची थंडी पडणे – खूप कडक थंडी पडणे .
  19. आग्रह करणे – हट्ट करणे , हेका धरणे .
  20. अंधार पडणे – रात्र होणे .
  21. पाठ थोपटणे – शाबासकी होणे .
  22. घामाघूम होणे – खूप घाम येणे .
  23. काळजी वाटणे – खंत वाटणे .
  24. शोध घेणे – हुडकणे .
  25. देहभान विसरणे – स्वतःची जाणीव विसरणे ,गुंग होणे .
  26. पाठलाग करणे – पाठोपाठ जाणे.
  27. पदर पसरणे – दुवा मागणे .
  28. मन भरून येणे – भावना दाटून येणे .
  29. मन लालचावणे- एखादी गोष्ट हवीहवीशी वाटणे .
  30. गायब होणे – नाहीसे होणे .
  31. मनावर ताबा मिळवणे – संयम बाळगणे .
  32. धुडकावून लावणे – नकार देणे .
  33. नावाचा जप चालणे – सारखी सारखी एखादी गोष्ट आठवणे .
  34. आनंद उतू जाणे – खूप आनंद होणे .
  35. मोलमजुरी करणे – कष्टाची कामे करून पैसे मिळवणे .
  36. धाडस दाखवणे – हिम्मत दाखवणे .
  37. झुंज देणे – लढणे .
  38. संवर्धन करणे – काळजीपूर्वक वाढवणे .
  39. खडानखडा माहिती असणे – संपूर्ण माहिती असणे .
  40. वावर असणे – हिंडणे –फिरणे .
  41. गौरव करणे – सन्मान करणे .
  42. गायब होणे – अदृश्य होणे .
  43. डोळे टिपणे – अश्रू पुसणे .
  44. रस्ता पार करणे – रस्ता ओलांडणे .
  45. खुशीत मान डोलवणे – आनंदाने होकार देणे.
  46. गलबलून येणे – गहिवरणे , मन भरून येणे .
  47. छाती धडधडणे – जीव घाबराघुबरा होणे .
  48. आर्जव करणे – विनंती करणे ,विनवणी करणे .
  49. टिंगल करणे – मस्करी करणे ,खोडी करणे ,चेष्टा करणे .
  50.  निरीक्षण करणे – नीट पाहणे .
  51. कुतूहल वाटणे – उत्सुकता निर्माण होणे .
  52. आश्चर्य वाटणे – नवल वाटणे .
  53. जोपासणे – निगा राखणे ,काळजी घेणे .
  54. पाळत ठेवणे – नीट लक्ष ठेवणे .
  55. सुळकी मारणे – सूर मारणे , झेप घेणे .
  56. फन्ना उडवणे – पदार्थ खाऊन लगेच संपवणे .
  57. फस्त करणे  - सगळे खाऊन संपवणे .
  58. आधार देणे – आश्रय देणे .
  59. परोपकार करणे – दुसऱ्यांची मदत करणे .
  60.  उधळून देणे – विखरून टाकणे .
  61. पसार होणे – पळून जाणे.
  62. भरारी घेणे – झेप घेणे .
  63. कानोसा घेणे – अंदाज घेणे .
  64. वीरगती प्राप्त होणे – वीरमरण येणे .
  65. रवानगी करणे – पाठवणे.
  66. कारावास ठोठावणे – कैदेची शिक्षा देणे .
  67. बंड पुकारणे – विरोधात उठाव करणे .
  68. टिकाव लागणे – निभाव लागणे .
  69. जेरीस आणणे – हैराण करणे .
  70.  संकल्प करणे – दृढ निश्चय करणे .
  71. असंतोष निर्माण होणे – प्रचंड नाराजी निर्माण होणे ,चीड येणे .
  72. रस घेणे – विशेष आवड असणे .
  73. उरत धडधडणे – भीती वाटणे .
  74. नजर चुकवणे – डोळ्याला डोळा न देणे , शरम वाटणे .
  75. पोटात खड्डा पडणे – भीती वाटणे .
  76. पाय लटलटू लागणे – घाबरून पाय थरथरणे .
  77. कबूल करणे – मान्य करणे .
  78. जीव भांड्यात पडणे – दिलासा मिळणे .
  79. चलबिचल होणे – जीवाची घालमेल होणे .
  80. ठणकावून सांगणे – ठामपणे सांगणे .
  81. ऐपत नसणे – कुवत नसणे .
  82. ढसाढसा रडणे – खूप रधूम ठोकणे – जोराने  पळणे.
  83. भरून येणे – गहिवरणे.
  84. बदला घेणे – वचपा काढणे .
  85. निर्धार करणे – ठाम निश्चय करणे.
  86. भूमिगत होणे – लपून राहणे .
  87. अटक करणे – कैद करणे.
  88. बाळकडू मिळणे – लहानपणापासून संस्कार होणे.
  89. प्रभाव असणे – ठसा असणे ,छाप पडणे.
  90. सुगावा लागणे – माग मिळणे, पत्ता कळणे.
  91. पाळत ठेवणे- मुद्दाम नजर ठेवणे.
  92. अवगत होणे- माहित असणे.
  93. सहभाग घेणे – सामील होणे.
  94. धमकावणे – धमकी देणे.
  95. प्रोत्साहित करणे- उत्तेजन देणे.
  96.  अवलंब करणे – अंगीकारणे ,स्वीकारणे.
  97. प्रत्यय येणे – अनुभवास येणे .
  98. प्राणांची आहुती देणे – बलिदान करणे.
  99.  अजरामर होणे- कायम स्मरणात राहणे .
  100. दंग होणे- गुंग होणे ,मग्न होणे, गर्क होणे.
  101. एकटक पाहणे – एकाच जागी स्थिर नजरेने पाहणे.
  102. उगम होणे – सुरुवात होणे.
  103. भेट घेणे – भेटायला जाणे (मुद्दाम ).
  104. स्वागत करणे- सन्मानाने बोलावणे.
  105. ओळख करून देणे – परिचय करून देणे.
  106. पार पडणे – एखादे काम  नीट पूर्ण होणे.
  107. अभिनंदन करणे – कौतुक करणे ,शाबासकी देणे.
  108. पोट धरून हसणे – मनमुराद खूप हसणे .
  109.  छंद लागणे – अति  आवड निर्माण होणे .
  110. नजरेत येणे – लक्षात  येणे.
  111. प्रोत्साहन मिळणे – उत्तेजन मिळणे .
  112. परिवर्तन घडणे - बदल  घडणे .
  113. वळण मिळणे – कलाटणी मिळणे .
  114. मुग्ध होणे- गुंग होणे .
  115. संकल्प करणे – निश्चय करणे .
  116. घरदार सोडणे – कुटुंबीयांपासून दूर राहणे.
  117. त्याग करणे – सोडून देणे .
  118. वनवास सोसणे – हालअपेष्टा सोसणे.
  119.  अधीर होणे- उत्सुक होणे.
  120. सामसूम होणे – शांतता पसरणे.
  121. सफल होणे – यशस्वी होणे.
  122. फस्त करणे – खाऊन संपवणे.
  123. आश्चर्य वाटणे – नवल वाटणे .
  124. कूच करणे – पुढे निघणे.
  125. कपाळावर हात मारणे – निराश होणे,हताश होणे.
  126. काबाडकष्ट करणे – खूप मेहनत करणे.
  127. जीव तुटणे – प्राण कळवळणे .
  128. ऋण काढून सण करणे – ऐपत नसताना कर्ज काढून उत्सव करणे.
  129.  जीव तोडून सांगणे- तळमळीने बोलणे.
  130. शब्दाला वजन नसणे – सांगण्याला किंमत नसणे.
  131. त्याग करणे – सर्व सोडून देणे.
  132. दंड भोगणे – शिक्षा भोगणे.
  133. पसार होणे- पळून जाणे.
  134. घाम गाळणे – कष्ट करणे.
  135. पत्ता न लागणे – मागमूस नसणे.
  136. पायावर डोके ठेवणे- नमस्कार करणे.
  137. झिम्मड उडणे- गर्दी उसळणे.
  138. पळ काढणे- पळून जाणे.
  139. पायाखाली घालणे- अंतर कापणे,हिंडणे.
  140. तडाखा देणे- मार देणे.
  141. हाताच्या अंतरावर असणे - अगदी जवळ असणे.
  142. भान सुटणे- लक्ष विचलित होणे,जाणीव नसणे.
  143. मोडून पडणे- कोलमडून जाणे.
  144. पंचाईत होणे- अडचण निर्माण होणे.
  145. थक्क होणे – आश्चर्यचकित होणे.
  146. पार करणे – पलीकडे जाणे.
  147. गलका करणे – आरडाओरडा करणे, गोंधळ करणे.
  148. लचांड निर्माण होणे – अडचण निर्माण होणे.
  149. निरोप घेणे – निघून जाणे.
  150. थरकाप उडणे – भीतीने अंग थरथरणे.
  151. थंडीने  काकडणे – थंडीमुळे अंग कापणे.
  152. हुज्जत घालणे – वाद घालणे.
  153. आरोप करणे – आळ घेणे,तक्रार करणे.
  154. मनाला लागणे – वाईट वाटणे.
  155. मनात घोळत राहणे – नेहमी आठवत राहणे.
  156. कमी लेखणे – कमी महत्व देणे.
  157. संधी चालून येणे – स्वतःहून मोका मिळणे.
  158. स्वप्न साकार होणे- स्वप्न प्रत्यक्षात येणे.
  159.  विलंब लावणे – उशीर करणे.
  160. रवाना करणे – पाठवणे.
  161. प्रोत्साहन देणे – उत्तेजन देणे.
  162. निधन होणे – मरण पावणे.
  163. गुबगुबीत होणे – बाळसे येणे.
  164. जीव गुंतणे- मन एखाद्या गोष्टीत अडकणे .
  165. कपाळावर आठ्या येणे – नाराजी व्यक्त करणे.
  166. वाया जाणे – फुकट जाणे.
  167. आतुर असणे – उत्सुक  होणे.
  168. मेळ बसणे – सांगड घालणे.
  169. कामाची कास धरणे – कामाला तयार असणे.
  170. पोटाला घास मिळणे- खायला अन्न मिळणे.
  171. अबाधित ठेवणे – बंधन न घालणे.
  172. अंतर न देणे – दूर न ठेवणे.
  173. पालनपोषण करणे – संगोपन करणे.
  174. कुरकुर करणे – तक्रार करणे.
  175. खंत न बाळगणे – काळजी न करणे.
  176. हरखून जाणे – थोड्याशा यशाने आनंदित होणे.
  177. न डगमगणे – न घाबरणे.
  178. संकटाचे डोंगर उभे राहणे – खूप मोठे संकट येणे.
  179. गाडा चालवणे – प्रपंच नेटाने करणे.
  180. जीवन वाहून घेणे – सर्वस्व देणे.
  181. नाव कमावणे – प्रसिद्ध पावणे.
  182. स्थापना करणे – निर्माण करणे.
  183. बेगमी करणे- भविष्यासाठी साठा करणे.
  184. भारावून जाणे – प्रभावित होणे.
  185. नियम पाळणे – अटी सांभाळणे.
  186. नियंत्रण ठेवणे – ताबा ठेवणे.
  187. आडवे होणे – झोपणे.
  188. चेहरा उतरणे – नाराज होणे , वाईट वाटणे.
  189.  बोटांनी ओठ झाकणे – हसू लपवणे.
  190. गाडग्यासारखे तोंड करणे - रुसून बसणे.
  191. आरंभ करणे – सुरुवात करणे.
  192. धूम पळणे – जोराने धावणे.
  193. झडप घालणे – पकडण्यासाठी उडी घेणे.
  194. नकार देणे – नाही म्हणणे.
  195. बट्ट्याबोऴ होणे – सगळे बिघडून जाणे .
  196. ठेंगा दाखविणे – चिडविण्यासाठी अंगठा दाखवणे .
  197. टाळाटाळ करणे- मुद्दाम दुर्लक्ष करणे.
  198. घाबरगुंडी उडणे- खूप घाबरणे.
  199. विचारपूस करणे – चौकशी करणे.
  200. कबूल करणे – मान्य करणे .
  201. देखभाल करणे – सांभाळ करणे.
  202. आकाश ठेंगणे वाटणे- खूप आनंद होणे.
  203. सामील करणे – सहभागी करणे.
  204. संमती दर्शवणे – मान्यता देणे.