Sunday, January 25, 2026

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी 19 4th standard scholarship exam guess paper

चौथी शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी









विषय - बुद्धिमत्ता 

घटक - समसंबंध 

उपघटक - शब्दसंग्रह  या  घटकांवर आधारित महत्वाचे 25 प्रश्न.

कोणत्याही दोन गोष्टींमध्ये किंवा वस्तूंमध्ये असलेला विशिष्ट संबंध ओळखण्यासाठी त्या वस्तूंबद्दल माहिती असणे ,ज्ञान असणे आवश्यक असते.या उपघटकातील प्रश्नांमध्ये तीन पदे दिलेली असतात.पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असतो.या घटकामध्ये पुढील चार उपघटक समाविष्ट केलेले आहेत :

1.शब्दसंग्रह

2.आकृत्या

3.संख्या व

4.इंग्रजी अक्षरमाला /वर्णमाला

समसंबंध -1- शब्दसंग्रह

या उपघटकातील प्रश्नांमध्ये दोन बाबी दोन शब्दांनी दर्शविलेल्या असतात.या दोन बाबी म्हणजे वस्तू,व्यक्ती,प्राणी यांच्यामधील आकार,रंग,रूप,चव,कार्य,क्रिया,रचना,स्थान,उपयोग,क्रम इत्यादींबाबत साम्य किंवा काही विसंगती असते.हे साम्य किंवा विसंगती ओळखून तिसऱ्या शब्दाशी अशाच प्रकारचे साम्य/विसंगती असणारा पर्याय ओळखायचा असतो.

या घटकाशी संबंधित लक्षात ठेवायचे काही मुद्दे यांची आपण थोडी माहिती घेऊ.

1.यामध्ये शब्दसंपत्तीची आवश्यकता असते.भाषा ,इतिहास,राज्यशास्त्र ,भूगोल,सामान्य विज्ञान यांचे तसेच अवांतर पुस्तकांचेही सखोल वाचन करा.

2.समानार्थी,विरुद्धार्थी शब्द ,आलंकारिक शब्द,विरुद्धलिंगी शब्द .

3.मराठी महिने,सण .

4.धर्म,धर्मगुरू,धर्मग्रंथ ,प्रार्थनास्थळे ,सण .

5.खेळ,खेळांचे प्रकार,खेळाडू.

6.दिनविशेष (जयंती,पुण्यतिथी,सण).

7.राज्य ,राष्ट्रीय प्रतिके,राजधानी,महत्वाची शहरे .

8.धान्यांचे प्रकार,वाद्यांचे प्रकार.

9.पाठ्यपुस्तकातील पाठ/कविता व लेखक/कवी .

10.नातेसंबंध ,चव व पदार्थ .

11.फळे,भाज्या,प्राणी,पक्षी,नद्या ,उपनद्या,उगम.

12.पाठ्यपुस्तकातील इतर माहिती इत्यादी .

वरील सर्व बाबींचा सराव करावा.

 महत्त्वाच्या सूचना :

1) विद्यार्थ्यांनी प्रथम आपले नाव लिहावे.

2) प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून खाली दिलेल्या उत्तरातील (पर्यायातील) योग्य उत्तराला टिक करावे.

3) आपले नाव लिहिणे व सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक.

4) प्रश्न सोडवून झाल्यावर Submit (सबमिट ) या बटनावर क्लिक करावे.

5) स्क्रीन वरती स्क्रोल करून View Score या बटनावर क्लिक करून आपले गुण पाहावेत.

6) अधिक सरावासाठी टेस्ट पुन्हा पुन्हा सोडवावी.

7) चाचणी सोडवण्यासाठी पालकांनी/ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.


No comments:

Post a Comment